Author Topic: पुणेरी चपराक !!  (Read 2153 times)

Offline Parmita

  • Jr. Member
  • **
  • Posts: 246
पुणेरी चपराक !!
« on: November 25, 2009, 10:54:01 AM »
काही वेळेला " खोडी " काढायचं मनात नसतं . पण ग्राहकानं अनाठायी शंका विचारुन बेजार केलं तर " इरसाल पुणेरी उत्तराची " चपराक बसते . उदा .
शिट्टीवर सुरेल गाणं सादर करणारा मित्रवर्य अप्पा कुलकर्णी मुळात महाराष्ट्र बँकेत होता . त्याच्या बँकेसमोरचा रस्ता फक्त ओलांडायचा अवकाश , समोरच आणखी एक सहकारी बँक होती . तिथलाच " चेक " घेऊन आपल्यामहाराष्ट्र बँकेतल्या खात्यात भरण्यासाठी ग्राहक महाशय आले . नेमकं काउंटरवरच्या अप्पाला त्यांनी विचारलं . " कॅश कधी होईल ?"
अप्पा म्हणाला , " उद्या बँकेला सुट्टी आहे , परवा होईल ."
ग्राहाकानं विचारलं , " का पण ? समोरच्या बँकेचा तर चेक आहे . वेळ लागतोच कसा ?"
" अहो . उद्या सुट्टी आहे ...".. अप्पाचा नम्रपणा अद्याप सुटला नव्हता !
" पण समोरच तर बँक आहे ...." ग्राहक हेका सोडेना .
मग खट्याळ अप्पाला राहवेना . तो म्हणाला , " काका , काय आहे , केवळ रस्ता ओलांडल्यावरच्या बँकेचा चेक आहे म्हणुन लगेचच कॅश होतो असं नसतं . प्रोसिजर असते ... असं बघा .."
" काही सांगु नका , प्रोसिजर - बिसिजर !"
" ऐका तर काका ... वैकुंठ, स्मशानभुमीच्या दारातच .. समजा तुम्ही गेलात म्हणजे मेलात तर दारातच गेले म्हणुन सरणावर चढवतील का ? आधी ससुनला नेतील ..... चेक करतील .. घरी नेतील .. हार घालतील .. म्रुत्यु पास काढतील .. मग वैकुंठकडे ..!!"
" कळलं ..!" फणकारत ग्राहक महाशय निघुन गेले। अशा इरसाल प्रश्नोत्तरामुळे किंवा " न " विचारता केलेल्या - नोंदविलेल्या प्रक्रियेमुळेच पुण्याचा जिवंतपणा टिकुन आहे ... पुणं कधी ' डल ' होत नाही ..!   
 
 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,336
  • Gender: Female
  • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
    • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: पुणेरी चपराक !!
« Reply #1 on: November 26, 2009, 12:08:59 AM »
 :D :D :D

Offline nirmala.

  • Jr. Member
  • **
  • Posts: 385
  • Gender: Female
  • nirmala.
Re: पुणेरी चपराक !!
« Reply #2 on: December 18, 2009, 04:00:30 PM »
wahhhhhhhhh!!!!!!!!1 :D

Offline gaurig

  • Full Member
  • ***
  • Posts: 983
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: पुणेरी चपराक !!
« Reply #3 on: December 18, 2009, 04:19:37 PM »
Kharach khupach chan.........

Offline jyoti salunkhe

  • Jr. Member
  • **
  • Posts: 417
Re: पुणेरी चपराक !!
« Reply #4 on: April 07, 2012, 12:58:51 PM »
mastch..... :D :D :D

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
एकावन्न अधिक अकरा किती? (answer in English):