Author Topic: तू तर हवासच!  (Read 1515 times)

Offline madhura

 • Jr. Member
 • **
 • Posts: 271
 • Gender: Female
 • I am Simple
तू तर हवासच!
« on: June 18, 2013, 12:40:47 PM »

' मी कशाला लागतो तुम्हाला , काही करणार नाही मी ,' असं म्हणणारा बाबा पाहिल्यावर घुसमटून जायला झालं . कुटुंबप्रमुख म्हणून धीराने वागणारा आणि खंबीरपणे पाठीशी उभा राहून कर्तव्य करणारा बाबा असा ढेपाळतो तेव्हा पोटात कसं तरी होतं . मग वाटतं , की बाबा पाहिजे तर मनाप्रमाणे वाग , पण रिटायर्ड वगैरे नको होऊस .. हक्काने एखाद्या गोष्टीचा हट्ट करून आमचं लहानपण अजूनही जपण्याची तेवढी एकच संधी आमच्यापाशी आहे ...

कधी नव्हे तो परवा बाबा चिडला ... खूप ! ' अरे , तुम्ही मुलं मला गृहीत धरता प्रत्येक गोष्टीत ; प्रत्येक वेळेला तुम्हाला हवा तसा मी वागतो ; मी तुम्हाला हवं ते आणून देणार , कायम तुमच्या मनाप्रमाणे वागणारं मशिन आहे की काय ? सगळं केलय तुमच्यासाठीच . आता तरी व्हा की स्वावलंबी ! कशाला लागतो मी .. काही करणार नाही आता मी .!!' बाप रे ! बाबाच्या तोंडून हे असे शब्द ऐकले आणि दचकायला झालं .. वाटलं बाबाला वेड लागलं की काय ? पण अंहं ... ही शक्यता फारच कमी ... कारण वेड लागावं अशी अत्यंत कठीण आणि बिकट परिस्थिती आलेली असताना आणि आईनं ' आता कसं होणार हो ..' अशा सुरात हतबलता व्यक्त केलेली असताना शांत असणारा आणि डोकं शाबूत असणारा आपल्या कुटुंबात फक्त तूच होतास ... तेव्हा हे असं टोकाचं बोलणारा बाबा पाहून थोडंसं धस्स झालं मनात .. वाटलं , हा वैताग करणारा बाबा माझा नाहीच ... आत्तापर्यंत प्रत्येक गोष्टीत आमच्यासोबत असणारा आणि कायम खंबीरपणे उभा असलेला बाबा असं म्हणूच शकत नाही .. अशा किती गोष्टी सांगू सांग ? शाळेत रंगपंचमी खेळल्यामुळे घरी तक्रार आली आणि तुला तातडीने शाळा गाठावी लागली .. ( वेळोवेळी आम्ही तुझ्यावर ही वेळ आणली होती ; पण तू तक्रार केली नाहीस ) तेव्हा , ' माझ्या मुलांना मी सांगेन , पण मुळात रंगपंचमीला सुट्टीच्या दिवशी क्लास ठेवणं आणि मुलांना रंग खेळू नका असं म्हणणं कितपत योग्य आहे हो सर ? माझ्या मुलाचं काही चुकलं आहे , असं मला नाही वाटत ..' असं तू सरांना सांगितलं होतंस . ' कसला भारी आहे माझा बाबा ' असं झालं होतं तेव्हा ... अर्थात , घरी आल्यावर तू ओरडशील असं वाटलं होतं ; पण तू इतकंच म्हणालास , ' रंग खेळायच्या आधी मला सांगितलं असतंस , तर जरा बरं झालं असतं .' याच्या उलट , एकदा वर्गातल्या दहा मुलांनी क्लास बुडवला होता आणि फक्त मी क्लासला गेले होते , त्यावर तू म्हणाला होतास , ' दहा मुलांसोबत राहता नाही का आलं ? काय गरज होती तुला एकट्यानंच क्लासमध्ये सिन्सिअरली बसायची ?' मला झेपलंच नाही तुझं तेव्हाचं वागणं .. मला , माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींसह तू फिरायला घेऊन जायचास . कारण आम्ही एकट्यानं जाणं शक्य नव्हतं .. मग आम्ही जरा मोठे झालो , ( तुझ्या भाषेत , आम्हाला शिंगं फुटली ) तेव्हा आमचे आम्ही फिरायला जायला लागलो . जाताना ' बाबा , पैसे दे ' असं म्हटल्यावर तू सांगायचास , ' घे खिशातले '.. घेतलेल्या पैशाचा तू हिशेब कधी विचारलाच नाहीस .. तुझा विश्वास आहे हे तू न बोलताच सांगून जायचास .. दहावीच्या अॅडमिशनपासून ते अगदी इंटरव्ह्यू आणि नोकरीच्या पहिल्या दिवशीपर्यंत सोडायला आणि आणायलाही तू प्रत्येक ठिकाणी हजर होतास . अगदी वाटलंही होतं , की ' काय हा बाबा , लहान आहे का मी आता '.. पण त्या रागाची पर्वा तू केली नाहीस .. आई नोकरी करणारी , तेव्हा घर सांभाळण्याची जबाबदारी तुझीच होती .. त्याचं तुला कधी वावगं वाटलंच नाही . त्यासाठीची प्रत्येक तडजोड तू हसत हसत केलीस .. आम्हाला सोबत व्हावी म्हणून भर बाजारातली तुझी व्यवसायाची जागा सोडून तू तुझा व्यवसाय घराच्या शेजारी आणलास . घरातल्या मोठ्यांची जबाबदारी तुझ्यावर होती . इतका मोठा असूनही कधी आजोबा तुझ्यावर चिडले , तरी तू शांतपणे घेत होतास ; पण आम्ही मात्र तू चिडलास किंवा एखाद्या गोष्टीला नकार दिलास , तर ताबडतोब तुला उलट बोलत होतो .. ( अजूनही हे चालू आहेच ) तुला राग येतच असेल , पण तरी तू त्या वेळेला , ' आमची अजून हिंमत नाही वडिलांसमोर बोलायची . नाही तर तुम्ही ...!' असं म्हणून कधी त्रागा केला नाहीस . आम्ही मोठे होत गेलो , तेव्हा ' बाबापण ' कायम राखून तू आमचा मित्रही झालास . बाबा आणि मित्र यातली सीमारेषा तू खूप मस्त सांभाळलीस . आमचे हट्ट , आमच्या प्रत्येक मागण्या , प्रत्येक गरज तू पुरवत गेलास . कठीण प्रसंगी न बोलता पा  ठिशी उभा राहिलास .. राहतोस .. तुझ्या असण्याची सवय झालीय ; कारण काहीही झालं , तरी बाबा आपल्यासाठी आहे ही सवय तूच लावली आहेस .. आजचा तुझा त्रागा पाहिला आणि मग वाटलं , की ' बाबा , दमला असशील ना , तर थोडी विश्रांती घे ; नको वागू आमच्या मनासारखं , आमची कोणतीही कामं नको करूस .. अगदी घरात बसून निवांतपणे पेपर वाच , फक्त आम्ही निघाल्यावर ' ये , जपून जा ... मी आहे रे ' इतकं मात्र जरूर म्हण .. कारण ' मी आहे रे ' हे तुझं म्हणणंही खूप मोठं बळ देणारं आहे ...'

सदैव तुमचीच ,
कन्या


Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: तू तर हवासच!
« Reply #1 on: June 18, 2013, 01:25:37 PM »
awadala lekh.....

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: तू तर हवासच!
« Reply #2 on: June 18, 2013, 02:15:18 PM »
जपून जा ... मी आहे रे......
बाबा असेच असतात …… छान लेख लिहिलास ….  :)

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: तू तर हवासच!
« Reply #3 on: June 18, 2013, 04:46:40 PM »
लेख छान लिहिलास पण मनाला एक गोष्ट खटकली की बाबांना एकेरी तू हा शब्द योग्य वाटतो का ऐकायला ?तुमची नवी ???????????पिढी बहुदा असेच म्हणत असतील .,पण मला नाही आवडत मोठ्यांना एकेरी हाक देणं ।भावना छान आहेत  मात्र लेखातल्या …….  ;)

Offline Maddy_487

 • Jr. Member
 • **
 • Posts: 145
 • Gender: Male
Re: तू तर हवासच!
« Reply #4 on: June 19, 2013, 12:08:08 AM »
Madhura zakkas khupch sundar.
Sunita ji "e baba or O baba" kahihi mhatale tari nate tech rahate ase mala watate.
kahi jananna e baba khup jawalacha watato rather than O baba.
pan kahihi asale tarihi baba shewati babach asatat.
mag to baba asu det kinwa te baba asu det

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: तू तर हवासच!
« Reply #5 on: June 19, 2013, 04:07:17 PM »
  असो. ।  :( :( :(

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: तू तर हवासच!
« Reply #6 on: June 19, 2013, 04:14:23 PM »
  असो. । बाबा असेच असतात
   मिलिंदने लिहिल्या प्रमाणे च आदरात्मक शब्दच येतात आणि ते योग्यही वाटतात

तू तर हवासच!
« on: June 18, 2013, 12:40:47 PM »
Quote

' मी कशाला लागतो तुम्हाला , काही करणार नाही मी ,' असं म्हणणारा बाबा पाहिल्यावर घुसमटून जायला झालं . कुटुंबप्रमुख म्हणून धीराने वागणारा आणि खंबीरपणे पाठीशी उभा राहून कर्तव्य करणारा बाबा असा ढेपाळतो तेव्हा पोटात कसं तरी होतं . मग वाटतं , की बाबा पाहिजे तर मनाप्रमाणे वाग , पण रिटायर्ड वगैरे नको होऊस .. हक्काने एखाद्या गोष्टीचा हट्ट करून आमचं लहानपण अजूनही जपण्याची तेवढी एकच संधी आमच्यापाशी आहे ...

कधी नव्हे तो परवा बाबा चिडला ... खूप ! ' अरे , तुम्ही मुलं मला गृहीत धरता प्रत्येक गोष्टीत ; प्रत्येक वेळेला तुम्हाला हवा तसा मी वागतो ; मी तुम्हाला हवं ते आणून देणार , कायम तुमच्या मनाप्रमाणे वागणारं मशिन आहे की काय

Offline Preetiii

 • Newbie
 • *
 • Posts: 44
Re: तू तर हवासच!
« Reply #7 on: June 20, 2013, 10:29:23 AM »
अतिशय सुंदर…खरच असेच असतात बाबा… न बोलताही आपल्यासाठी सगळा करणारे ...

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: तू तर हवासच!
« Reply #8 on: June 20, 2013, 02:43:24 PM »
e baba kiwa o baba mhananya peksha mala aho baba mhanayala awadate,an tyane baba parake wagaire watat nahit.atishay jawalachech watatat.asatatach.te ... :)