Author Topic: तीच उत्तर - बघू इतकच !  (Read 1431 times)

Offline Mayur Jadhav

  • Jr. Member
  • **
  • Posts: 68
  • Gender: Male
  • शब्द हेच जीवनातील खरे सोबती .
तीच उत्तर - बघू इतकच !
« on: May 07, 2014, 01:33:43 PM »
तीच उत्तर - बघू इतकच !

त्याचं तिच्यावर जीवापाड  प्रेम असतं , पण ते तिला माहित नसतं . त्या दोघांची मैत्री इतकी घट्ट की त्यात वेगळाच गंध असतो . तो गंध इतका त्याच्यात पसरतो की आता त्याला ते घुसमटनं सहन होत नसतं , त्याला त्याच्या मनातलं तिला सांगावस वाटतं पण तिला दुसरा कोणीतरी आवडतो हेही माहित असतं . आत्ता पर्यंत तो इथेच अडकायचा की एकतर्फी तर नाहीना होणार आपलं प्रेम ? मग जर तिला कोण आवडत असेल तर आपण तिला का आपल्या मनातलं सांगावं ? जर तिला सांगितलं नाही तर ते एकतर्फी होईल आणि ते झालेलं त्याला आवडणार नव्हतचं . तो तिला एकेदिवशी सर्व कळवतो . आता तिची वेळ असते उत्तर द्यायची तो खूप वाटही पाहतो , यात बरेच दिवस निघून जातात . दोघांच्या मैत्रीत एक तुटकपणा दोघांनाही जाणवू लागतो , तिचा हाच तुटकपणा त्याला जीवघेणा वाटू लागला . थोड्याच दिवसांनी दोघातील तणाव थोडासा कमी झाला, तीच उत्तर जरा वेगळच होत अन त्याचा प्रश्नही, तो तिला म्हणाला कितीही काहीही होउदे फाईनली मीच तुला जिंकणार , तुला जीवनभरासाठी मीच नेणार . त्यावर तिच उत्तरही तितकंच निराळं , फक्त बरं बघु येवडच. एकदिवशी तो मंदिरात जातो देवाकडे काय मागावं याचा विचार करतो , जर तिला मागावं तर ती आपल्याला मिळेल पण तिला जो आवडतो तो तिला मिळणार नाही अन तिला जो आवडतो तो मिळावा हे मागावं तर ती आपल्याला मिळणार नाही . शेवटी तो देवाकडे एवडचं मागतो की हे देवा ती दोघांपैकी जास्त सुखी आणि हसत राहील त्याला मिळूदे फक्त तो जर मी असेन तर तिला पाहिलं माझ्याशी प्रेम होउदे आणि नंतर मिळूदेत.

  मयुर जाधव
  कुडाळ ( सातारा )
+918888595857.
« Last Edit: May 07, 2014, 02:06:58 PM by Mayur Jadhav »

Marathi Kavita : मराठी कविता