Author Topic: अनुप्रासाचा कळस!  (Read 2119 times)

Offline Rahul Kumbhar

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,539
  • Gender: Male
अनुप्रासाचा कळस!
« on: December 10, 2009, 10:54:15 AM »
Check out the K factor  :D

केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल  काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर
कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत
कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये
‘कजरारे-कजरारे’ कवितेवर कोळीनृत्य केले.

काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे
कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श
किंचाळून कलकलाट केला.

काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श
कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले.

कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी ‘कोलाज’
करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला.
काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा
कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले.

कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय
काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले.

केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या
कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले.

कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजने
केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू

केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या कागाळीखोर
केशवाला काळानेच केला ‘कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता’!

कथासार -

क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन, कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे!!


-Author Unknown (Received in a fwd mail)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline anitadsa

  • Newbie
  • *
  • Posts: 44
Re: अनुप्रासाचा कळस!
« Reply #1 on: December 11, 2009, 10:11:03 AM »
किती कष्ट करायचे? कमालच करताय कि !
 ;D ;D ;D

Offline madhura

  • Jr. Member
  • **
  • Posts: 270
  • Gender: Female
  • I am Simple
Re: अनुप्रासाचा कळस!
« Reply #2 on: December 13, 2009, 01:37:00 PM »
किती कष्ट करायचे? कमालच करताय कि !
 ;D ;D ;D

 :D

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पाच गुणिले पाच किती ? (answer in English):