Author Topic: ए लाइफ ऑन द ब्रिज!  (Read 2084 times)

Offline Siddhesh Baji

  • Jr. Member
  • **
  • Posts: 367
  • Gender: Male
ए लाइफ ऑन द ब्रिज!
« on: December 19, 2009, 03:54:13 PM »

दिलीप चित्र्यांच्याच एका लेखाचं हे शीर्षक आहे. चित्रेंच्या वाङ्मयीन आणि वैयक्तिक आयुष्याचं वर्णन करण्यासाठी हे शीर्षक सार्थ ठरेल. युरोपात मॉडनिर्टीची चर्चा किंवा मार्क्सवादाचा बोलबाला होता, त्या काळात चित्रेंचा जन्म झाला. आणि जागतिकीकरण आणि पोस्टमॉडनिर्टीच्या चचेर्ने साहित्यिक अवकाश झाकोळून गेलेल्या काळात त्यांचा मृत्यू!

मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराथी अशा चार भाषा अवगत असलेल्या आणि जगाच्या जवळपास प्रत्येक खंडाचा प्रत्यक्षदशीर् अनुभव गाठीशी असलेल्या चित्रेंना काही लोक कवी म्हणून ओळखतात, काही पत्रकार म्हणून ओळखतात, काही चित्रकार म्हणून, तर काही विचारवंत म्हणून ओळखतात. प्रत्येक क्षेत्रात त्या त्या क्षेत्रात चित्रेंनी उमटवलेल्या ठशाची ओळख पटलेली माणसं आढळतात.

राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्र्यांचं योगदान काय, ते त्या त्या क्षेत्रातले राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रवक्ते बघून घेतील. आपल्या दृष्टीने मराठीच्या आणि महाराष्ट्राच्या संदर्भात त्यांचं योगदान काय आहे, याचा विचार करणं इथे जास्त सुसंगत ठरेल.

महायुद्धोत्तर किंवा स्वातंत्र्योत्तर काळाचा पहिला चरण हा विचारसरणींच्या विघटनाचा होता. त्यातून जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक बंडे उभी राहिली. १९६० च्या आसपास उभी राहिलेली लघुनियतकालिकांची चळवळ ही त्यातलीच एक गणली जाते. अशा भूराजकीय परिदृष्यात चित्रे लिहिते झाले.

मढेर्कर-पु. शि. रेगे यांनी प्रस्थापित बाजारू अभिरूचीला छेद देण्याची परंपरा निर्माण केली. त्या परंपरेला पुढे नेण्याचे काम चित्रेंनी चिकित्सेच्या माध्यमातून केले. त्यातून चिकित्सेचे वातावरण निर्माण झाले आणि चिकित्सेला मान्यताही मिळू लागली. त्या आवेगातून एका एकसंध अभिरूचीची जडणघडण होऊन तिला आजचे खणखणीत स्वरूप मिळाले. त्यामुळे मध्यमवगीर्य माणसाच्या साहित्याबद्दल असलेल्या शाळकरी आणि बाळबोध समजुती उखडल्या गेल्या. रंजनवाद आणि बोधवाद यांच्या पेचात अडकलेली मराठी अभिरूची चित्र्यांच्या पिढीने चळवळीच्या माध्यमातून मोकळी केली.

अभिरूचीच्या आणि अभिव्यक्तीच्या दृ़ष्टीने अनवट सेन्सेबिलिटीजना मेनस्ट्रीममध्ये आणत राहणे आणि मासअपिलकेंदी मेनस्ट्रीमला जेन्युईनिटीची जाग देत राहणे, बौद्धिक वादसंवादासाठी स्वत:ला उपलब्ध ठेवणे-खुले ठेवणे, समाजाचा वाङ्मयीन कॉन्शस सतत सतर्क ठेवून तो टोकत राहणे, या गोष्टी घेऊन चित्रे या 'ब्रिज'वर ठामपणे उभे राहिले.

उच्चभ्रू मराठींना तुकारामापासून ते बोदलेयरपर्यंतचे कवी कळलेले नाहीत, याची जाणीव त्यांच्या समीक्षेतून झाली. दूधभातवादी खुळचट मध्यमवगीर्यांना डोळसपणा देणारी सुलभता त्यांच्या शैलीत होती. त्यामुळे लघुनियतकालिकातल्या साहित्याला समूहाची मान्यता आणि विद्याक्षेत्रीय स्वीकार मिळाला. नवसाक्षर नवसाहित्यिकांना आत्मविश्वास देत त्यांनी वेगवेगळ्या वर्गांतले लिहिते कवी नर्चर केले. काव्यसमीक्षेपासून ते चित्रकलेपर्यंतच्या सर्व आविष्कार शक्यतांच्या विविध पॉकेट्समध्ये त्यांना असलेली व्यावहारिक गती आणि त्यांची सक्रिय उपस्थिती ही त्या त्या क्षेत्रांतील अनेक भंपक लोकांना एकाचवेळी असह्य आणि आश्वासक वाटत असे...

परंपरेच्या आणि तिच्यात अंतर्भूत असणाऱ्या अनेक उपपरंपरांच्या प्रवाहीपणाची जाण त्यांना असल्याने काळाच्या भानावर अस्तित्व तोलण्याचे काम त्यांना शक्य झाले. परंपरेवर त्यांची श्रद्धा होती, की नाही, याचे काहीच माग आता मिळणार नाहीत. मात्र, परंपरेविषयी त्यांना आस्था होती, याचे पुरावे त्यांनी हाताळलेल्या विषयांवरून कळून येतात. इतके करूनही त्यांच्या समकालीनांप्रमाणे ते फंडामेण्टलिस्ट झाले नाहीत, याचे मूळ त्यांच्यावर झालेल्या मानवतावादी संस्कारांत असेल.

कलारूपांचे स्वरूप आकळण्याची मर्मदृष्टी त्यांच्यात सतत दक्ष असल्याने त्या त्या कलेतले बेसिक मेकॅनिझम्स आणि कॉमन डिनॉमिनेटर्स त्यांच्या हाती लागले होते. त्यामुळेच कलेची निमिर्ती, तिचे विश्लेषण आणि त्यातून प्रतीत होणारे तत्त्वज्ञान या सगळ्याचा आवाका पेलण्याचा प्रयास त्यांनी केला. कलाविष्कारासाठी लागणारे मूलभूत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पट्ट्यांवर आवाज लावणं आणि ते स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक ती गडबड करणं हे त्यांनी आपलं मिशन मानलं. उत्कृष्ट कलाकृतींना मरण नसतं, त्या स्वत:च्या ताकदीवर तगतात. पण सांस्कृतिक लोकशाहीच्या बहरासाठी निकृष्ट किंवा अर्धउत्कृष्ट कलाकृतींनाही अस्तित्वाचा अधिकार असायला हवा, असं त्यांचं मत होतं. अनेक चांगल्या किंवा वाईट कलाकृतींना आणि कलाकारांना समर्थन देऊन त्यांनी आपलं हे मत सिद्ध केलं.

त्यांनीच एका ठिकाणी म्हटलंय तसं, की 'मला कवी किंवा कलावंत म्हणवून घेण्यापेक्षा तुकारामाचा अनुवादक म्हणवून घेणं जास्त यथार्थ वाटेल.' असं असूनही त्यांनी त्यांच्या समीक्षेतून उभारलेला माहोल आज त्यांच्या अनेक समकालीन आणि उत्तरकालीनही कवींना उजळ माथ्यांनी कविपण मिरवण्याचं डेअरिंग देऊन गेलेला आहे.

त्यांच्या वयाची माणसं आधुनिक गॅजेट्सना घाबरून तरी असतात किंवा त्याबद्दल तुच्छता तरी दाखवतात. मात्र, त्यांच्यात असलेला कलाकार हा नवनवीन तंत्रज्ञान माहिती करून घेण्याबाबत जागरूक होता. त्यामुळेच कम्प्युटर, इंटरनेट, ई-विश्व याबद्दल त्यांना कुतूहल होतं. त्यासाठी ते ते तंत्रज्ञान त्यांनी हरहुन्नरीपणाने आत्मसातही केलं. मात्र, त्या तंत्रज्ञानाच्या आहारी न जाता, (उलट) त्यावर स्वार होऊन त्याचा आपल्या कलाव्यवहारासाठी कसा चपखल वापर करता येतो, याचं प्रत्यक्ष उदाहरण त्यांनी दाखवलं.

संचित आणि चैतन्य, भाषा आणि तिचं उपयोजन, सहृदयता आणि चिकित्सा अशा परस्परपूरक आणि द्वंद्वात्मक धुवांना, दोन टोकांना जोडणाऱ्या पुलावर थांबून, टिकून राहून, कलाकेंदी आयुष्य जगणाऱ्या प्रजातीतले महाराष्ट्रातले शेवटचं व्यक्तिमत्त्व आता आजपासून आपल्यात नाही

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा अधिक दोन किती ? (answer in English):