Author Topic: प्रेम करण्याचे कारण!  (Read 2174 times)

Offline prachidesai

 • Jr. Member
 • **
 • Posts: 117
 • Gender: Female
प्रेम करण्याचे कारण!
« on: January 01, 2011, 03:32:17 PM »
एका ई मेल मधुन आलेली गोष्ट, जमला तसा अनुवाद केला. आपल्या सगळ्यांसाठी इथे देत आहे. आमच 'पहीलं प्रेम' चर्चेमुळे हा अनुवाद करावा वाटला पहिल्या प्रेमाशी जरी या कथेचा संबंध नसला तरी 'प्रेमाशी' नक्कीच आहे :)एकदा एक प्रेयसी तिच्या प्रियकराला विचारते,प्रेयसी : तुला मी का आवडते? तुझं माझ्यावर प्रेम का आहे?प्रियकर : मला नाही सांगता येत पण माझं खरच तुझ्यावर खूपखूप प्रेम आहे.प्रेयसी : तुझं जर खरच माझ्यावर येवढं प्रेम आहे तर मग तुला एक साधं कारण नाहीसांगता येत? छे, मग तु कसा असा दावा करतोस की तुझं माझ्यावर प्रेम आहे?प्रियकर : खरंच मला नाही सांगता येत की, मी तुझ्यावर येवढं प्रेम का करतो. पणतु म्हणतच असशील तर मी तुला सिध्द करून दाखवेन.प्रेयसी : काय सिध्द करून दाखवणारेस. साधं एक कारण सांगत नाहीस आणि सिध्द कायकरणार... छे! :(माझ्या मैत्रिणीचा प्रियकर बघ, तिला किती काय काय सांगत असतो ... तिच्यासौंदर्याचे किती पूल बांधत असतो आणि तुला साधं एक कारण नाही सांगता येत. :(प्रियकर : ठीक आहे बाबा... उम्म्म ... सांगतो तुला, की मी का तुझ्यावर प्रेमकरतो ...- कारण तु खूप खूप सुंदर दिसतेस- तुझा आवाज खूप गोड आहे.- तु खूप प्रेमळ आहेस, माझी काळजी घेतेस...- तु खूप सुंदर विचार करतेस- तुझे हास्य अगदीच लोभस आहे..- तुझ्या प्रत्येक हालचाली मुळे (अदा : अगदी येग्य वाटते...)प्रेयसीची कळी आता एकदम खुलते.काही दिवस आनंदात जातात. आणि असाच एक दुदैवी दिवस उजाडतो. प्रेयसीला अचानकअपघात होतो आणि ती कोमात जाते.प्रियकर तिच्या जवळ येतो. तिच्या बाजुला एक पत्र ठेवतो. त्यामध्ये लिहिलेलेअसते,प्रिये,तुझा आवाज गोड होता म्हणुन मी तुझ्यावर प्रेम करत होतो.पण तु आता बोलू शकत नाहीस. म्हणुन मी आता तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.तु माझी फ़ार काळजी घ्यायचीस. म्हणुन मी प्रेम करायचो.पण आता तु माझी काळजी घेवू शकत नाहीस, म्हणुन मी तुझ्यावर प्रेम नाही करू शकत.तुझ्या लोभस हास्यामुळे, तुझ्या प्रत्येक गोष्टींमुळे मी तुझ्यावर प्रेम करतहोतो.पण आता तु हसु शकत नाही, इकडे तिकडे फ़िरू शकत नाहीस. त्यामुळे मी तुझ्यावरप्रेम नाही करू शकत.जर प्रेम करण्यासाठी काहीतरी कारणच लागत असेल तर मग आता मी तुझ्यावर प्रेमकरावे असे तुझ्यात काहीच नाही.खरच का प्रेम करण्यासाठी काही कारण लागते?....- मुन्ना बागुल

Marathi Kavita : मराठी कविता

प्रेम करण्याचे कारण!
« on: January 01, 2011, 03:32:17 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: प्रेम करण्याचे कारण!
« Reply #1 on: January 05, 2011, 05:11:08 PM »
प्रेम हि व्याख्याच मला जमत नाही    पण माझे सांगायचे झले तर,   मी अशा प्रकारे कुणावर  प्रेम करू शकलो असतो....        रेषांना झुगारून चीत्तार्लेल्या प्रतिमेस   देताना आलिंगन कधी मिटलीस  का   शब्दांपुर्वी शब्दांचे अर्थ ज्या भूमीत कळतात   त्या भूमीत कधी प्रवेश केलास का ?.................................................................. 8)

Offline ravindra.pawar

 • Newbie
 • *
 • Posts: 6
 • Gender: Male
 • Discovering thing called as LIFE.
Re: प्रेम करण्याचे कारण!
« Reply #2 on: January 15, 2011, 03:50:11 PM »
khupach chan

WE CANT EXPRESS EVERYTHING :)

Offline yog123

 • Newbie
 • *
 • Posts: 1
Re: प्रेम करण्याचे कारण!
« Reply #3 on: January 27, 2011, 11:31:59 PM »
हे अगदी खर आहे की सगळयाच गोष्टी व्यक्त  करता येत नाहीत.

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):