लोकं लग्न करताना विचार का नाही करत. कोणाशीही करून मोकळे होतात. तो जोडीदार आपल्याला, आपल्या family मध्ये सूट होतो कि नाही याचा विचार न करता कशी कोणाच्याही गळ्यात माळ घालू शकतात? इतकं कसं प्रेम आंधळ असू शकतं? हिंदू मुसलमानाशी, गोरी व्यक्ती काळ्या व्यक्तीशी, सुंदर व्यक्ती कुरूप व्यक्तीशी कशी लग्न करू शकते? प्रेमात माणूस आपली अक्कल गहाण टाकतो का? नाही प्रेम बीम हे सगळे मनाचे खेळ आहेत, आपण प्रेम करताना डोळे टक्क उघडे ठेवूनच करायचं. तीने मनाशी ठरवून टाकलं.
तिचा तो मोठ्या पगाराचा पहिलाच job होता. तिला करियर मध्ये आधी स्वताला सेटल करायचे होते लग्न, प्रेम वगैरे तर खूपच लांबची गोष्ट होती. ऑफिस मधली लोकं खूपच छान होती. ऑफिस छोटं असल्यामुळे सगळे एकमेकांना चांगले ओळखत होते. त्यांचा जणू एक छोटासा परिवारच बनला होता.
आणि एक दिवस त्यांच्या परिवारात तो आला...
दिसायला सुंदर, सगळ्यांमध्ये छान मिसळणारा तो...
त्याची अन तिची खूप छान मैत्री झाली. दोघे एकमेकांसाठी जेवायला थांबायचे एकत्र बाहेर पडायचे. त्यानेच तिला मेसेंजर कसा वापरायचा ते शिकवलं आणि install हि करून दिला. मग काय एकांतात बोलायला स्थळ काळ कशाला हवं? login केलं कि झालं.
chatting मध्ये त्यांचा पूर्ण दिवस जायचा. बर बोलून बोलून ते बोलायचे काय तर चक्क भांडायचे ते हि शुल्लक शुल्लक गोष्टींवरून. त्यांच्या रहाणीमानात आणि संस्कारांत जमीन आसमानाचा फरक होता, तरीही ते एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स होते.
दिड वर्ष लोटली होती त्यांची मैत्री होवून. प्रत्तेक गोष्टीला अंत असतो आणि या गोष्टीलाही होता. त्याला दुसरी नोकरी मिळाली होती मोठ्या कंपनीत आणि तीही मुंबई बाहेर. तीने खूप प्रयत्न केला त्याला थांबवायचा पण त्याचं जाणं अटळ होतं. त्याच्या फेअरवेलच्या आदल्या दिवशी तीने शेवटचं त्याला डोळ्यात साठवून घेतलं होतं. त्याच्या फेअरवेलला कशी येणार होती ती?
तिथे गेल्यावरही तो दिवसभर online असायचा. त्यामुळे त्याची कमी तिला विशेष जाणवत नव्हती. आतापर्यंत दोघांनाही समजलं होतं कि ते एकमेकांच्या प्रेमात पडलेयत. पण दोघेही एकमेकांना विचारत नव्हते याबद्दल. त्याला कारणही तसच होतं.
तो मुसलमान होता आणि ती ब्राह्मण.
नाही नाही म्हणता practical विचारांची ती जी डोळे उघडे ठेवून प्रेमात पडणार होती ती एका अशा व्यक्तीच्या प्रेमात पडली होती ज्याच्याशी लग्न करणं तिच्यासाठी अशक्यच नाहीतर कल्पनेच्या पलीकडलं होतं.
प्रेमाने पुन्हा एकदा आपली कामगिरी चोख बजावली होती!
"मोहाब्बत किसी ऐसे शक्स कि तलाश नही करती जीसके साथ रहा जाए,
मोहाब्बत ऐसे शक्स कि तलाश करती है जिसके बगैर न रहा जाए"
शीतलhttp://www.designersheetal.blogspot.com