Author Topic: 'तो', 'ती' आणि 'तो दुसराच'.  (Read 2188 times)

Offline Shraddha R. Chandangir

 • Jr. Member
 • **
 • Posts: 346
 • Gender: Female
'तो', 'ती' आणि 'तो दुसराच'.
« on: November 10, 2014, 11:58:28 AM »
                प्रेमात सालं असंच असतं. 'तीचं' 'त्याच्यावर'
जीवापाड प्रेम असतं, पण तीच्यावर
जीव ओतणारा 'दुसराच'
कोणीतरी असतो. ती त्याच्या
I  LOVE YOU च्या reply साठी तासनतास वाट बघते, पण
तीच्या एका Hii च्या sms साठी दुसराच
कोणीतरी झुरत असतो. तीला फोन
करायला त्याच्याकडे अजिबात वेळ नसतो, पण तीचा फक्त एक
आवाज
ऐकण्यासाठी कोणीतरी दुसराच
तरफडत असतो. तीने दीलेल्या Gift ला 'तो'
Thanku ही म्हणत नाही, पण
तीच्या एका साध्या Birthday wish वर 'दुसरच'
कोणीतरी गहीवरून येतं.
             प्रेमाचा साला हा भलताच लोचा असतो. 'तो', 'ती'
आणि 'तो दुसरा'. या love story मध्ये 'तो' आणि 'ती' हे
hero heroine. आणि 'तो दुसरा' मात्र Side hero.
'तो दुसरा' कोणीतरी बिचारा प्रेमवेडा.
'ती' आपली होणार नाही हे
माहीत असुनही तीच्यावर
जीव ओतणारा. शब्दांमध्ये
मैत्री आणि डोळ्यांमध्ये प्रेम लपवणारा. ओठांवर
शांतता आणि मनात
तीची काळजी वाटून घेणारा.
तीच्या साठी तो फक्त मीत्र, पण
तीला तो आपलं जीवन मानणारा.
           ईकडे 'तो' आणि 'ती' ची मात्र
वेगळी Love Story. ती त्याच्यावर
जीवापाड प्रेम करणारी, तो मात्र
तीला वेळ न देणारा. ती त्याला आपलं आयुष्य
मानणारी, तो मात्र चारचौघात
तीला मैत्रीण म्हणून फीरवणारा.
ती लग्नाचं स्वप्न सजवणारी, तो मात्र साधं
वचन ही देण्यास धजणारा.
असे हे 'तो', 'ती' आणि 'तो दुसराच'.
          ईकडे ती त्याला भेटण्यासाठी तासनतास वाट बघते.
तो मात्र कामाचं कारण पुढे करून वारंवार तीला टाळतो.
एकदा त्याची वाट बघत असतांना 'तो' येत नाही,
पण तीला 'तो दुसराच' अचानक मीळतो. अचानक
तीला समोर बघून त्या दुसर्याचही भान हरवतं.
'तीच्या' आणि 'त्या दुसर्याच्या' गप्पा होतात.
गोष्टी होतात.
त्या दुसर्याशी बोलतांना अचानक
तीचे अश्रू ओघळतात.
तीला हसवण्यासाठी मग 'तो दुसराच' खटाटोप
करतो. कशीबशी ती हसते.
तो दुसराही भानावर येतो.
तीलाही त्या दुसर्याशी बोलून बरं
वाटतं. 'त्यानेही' कधी ईतक्या प्रेमाने
तीचे अश्रू पुसले नसतात, जीतकं 'तो दुसराच'
नकळत पुसून चाल्ला जातो.
       काही दिवसांनी 'तो' अचानक
कामासाठी बाहेरगावी निघून जातो.
तीने त्याला फोन करताच, जातांना तुला सांगून जायला वेळच
मीळाला नसल्याचं कारण पूढे करतो.
ती जरा चिडताच सध्या कामात आहे म्हणून फोन कट करतो.
मग अचानक 'त्या दुसर्याचा' फोन तीला येतो.
तीचा mood आता कसा आहे अशी विचारपुस
'तो दुसरा' करतो. आता ती मात्र रडायचं टाळते.
तीच्या प्रेमाची 'त्याची'
लायकीच नाही म्हणून 'त्या दुसर्याला' सांगते.
मी माझा वेळ, feelings, प्रेम हे एका मूर्ख माणसावर
वाया घालवल्याचा पश्चाताप त्या 'दुसर्याजवळ' करते.
तो दुसरा तीला शांत करतो. प्रेमात चालतच असतं
अशी समजूत तीची काढतो.
ती मात्र 'त्याला' कायमचं विसरायचं ठरवते. ईकडे 'तो दुसरा'
एक मित्राच्या नात्याने रोज
तीची काळजी घेतो.
तीचा mood खराब असल्यास
तीला हसवण्याचा प्रयत्न करतो. आजपर्यंत जे 'तो'
नाही करू शकला, 'हा दुसराच' करून जातो.
आता तीलाही विचार पडायला लागतो. प्रेमासारखं
प्रेम हरलं पण मैत्री जींकल्याचं आश्चर्य
वाटायला लागतं. हे ती 'त्या दुसर्यापूढे' हसतहसत बोलून
देते.या वेळेस 'तो दुसरा' मात्र शांत न
राहता तीला मनातली हकीकत
सांगून देतो. आयुष्यभर काळजी करण्याचं आश्वासन
तीला देतो. ती म्हणेल तेव्हा लग्न करण्याचं
वचन तीला देतो.तीही आनंदाने
भारावून जाते. तीला जवळ घेऊन 'तो दुसरा' तीचे
अश्रू पुसतो. मी असल्यावर आता रडायचं
नाही म्हणून तीला हसत रागावतो.
       ईकडे काही दिवसात 'तो' परत येतो. 'तीला'
आणि 'त्या दुसर्याला' सोबत बघून तीच्यावर खवळतो.
धोका देतांना लाज
कशी नाही वाटली म्हणून
तीला जाब विचारतो. ती मात्र फक्त हसते. एक
शब्द ही न बोलता तीथून निघून जाते.
दिवसामागून दिवसं जातात. 'तो' ईकडे कामात Busy होतो. कळत-नकळत
त्याचा राग वाढलेला असतो. चिडचिड वाढलेली असते. आयुष्य
उदास वाटायला लागतं. पण त्याचं कारण मात्र
अजूनही कळलेलं नसतं.
काहीतरी हरवल्याची चूणचूण
त्याला भासते. नकळतच तीची आठवण येते.
अलगद डोळे पाणावतात. आयुष्यातून दुसरं
कोणी नाही तर तीच
हरवल्याची जाणीव होते. पण आता वेळ निघून
गेलेली असते. त्याच्याकडे फक्त पश्चाताप उरलेला असतो.

- अनामिका

connect with me by liking this page

https://m.facebook.com/profile.php?id=1500709300183536
« Last Edit: November 10, 2014, 04:44:07 PM by @Anamika »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline सतिश

 • Jr. Member
 • **
 • Posts: 127
 • Gender: Male
Re: 'तो', 'ती' आणि 'तो दुसराच'.
« Reply #1 on: November 10, 2014, 06:17:08 PM »
Fantastic Re..


Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
Re: 'तो', 'ती' आणि 'तो दुसराच'.
« Reply #3 on: November 11, 2014, 12:08:41 AM »
good one :)


Offline Sachin01 More

 • Jr. Member
 • **
 • Posts: 204
 • Gender: Male
Re: 'तो', 'ती' आणि 'तो दुसराच'.
« Reply #5 on: November 17, 2014, 10:20:50 PM »
Ekdam mast.


Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: 'तो', 'ती' आणि 'तो दुसराच'.
« Reply #7 on: January 20, 2015, 02:02:47 AM »
सुरेख मांडणी केली आहे.....