Author Topic: तुमची आमची "ती"  (Read 1067 times)

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
तुमची आमची "ती"
« on: February 03, 2015, 09:13:40 AM »
आज मी शांत स्तब्ध निवांत चालतोय, फिरतोय, बसलोय........
एकटा...? नाही मुळीच नाही. ती आहेना सोबत शांत, निर्मळ कोमल हवी हवी शी वाटणारी....... आम्ही सगळेच बसलोय
कोजागीरी ची रात्र हवेतील थंडावा, टिपूर चांदणं आणि ती...... खरचं खुप छान वाटतयं आज, या आधी पुस्तकातून वाचलं होतं आज प्रत्यक्षात अनुभवतोय
कदाचीत आज ती सोबत आहे म्हणून.
तिचा तो सहवास हवाहवासा, तिचा स्पर्श कोमल निरागस, कपाळावरच्या केसांना तिने हळूवार उडवणं...... आज मी खुप खुश आहे
पण एक खंत वाटतेय मनाला आज ती असती तर खुप बरे झाले असते

आता ही दुसरी "ती" कोण? अहो ही ती म्हणजे? जीच्यावर मी खुप प्रेम करतो अरे? मग कधीपासून तु जिची प्रशंसा करतोस ती कोण? हा हा हा..... ती? जी मला हवी हवीशी वाटते ती. अरे काय बोलतोय तू ? तुला कळतयं का? एक हवी हवीशी वाटते आणि दुसरीवर तु प्रेम करतोस? हो दोघीही मला महत्वाच्या आहेत आणि दोघीही माझ्या जिवनाचा एक अविभाज्य घटक आहेत
दुसरी फक्त माझ्या कडे आहे पण पहीली मात्र तुमच्याकडेपण आहे पण तुम्ही कधी तीला जवळ केलतच नाही, कधी तीला अनुभवलतच नाही. ती मला जसा आनंद देते तसा तुम्हाला पण देते. फरक फक्त एवढाच आहे की मी तीला ओळखलं आणि तुम्ही नाही.......जी आयुष्यभर सोबत राहील की नाही ते माहीत नाही तीला इतक्या जवळ करता आणि जी तुम्हाला तुमच्या नकळत सुखावते ती जवळ असुन तुम्ही तीला ओळखत नाही?
जास्त ताणवणार नाही, माझी पहीली ती म्हणजे हवेची झुळूक आणि दुसरी ती......
हो आता मात्र बरोबर ओळखलात. दुसरी ती म्हणजे माझी प्रेयसी, माझी प्रियतमा.....
मित्रांनो माझ्या छोट्याश्या अनुभवातुन सांगतो, दुसरी ती आपल्याशी प्रामाणिक राहील की नाही ते माहीत नाय पण पहीली ती नक्की राहील. एकदा अनुभवून बघा तुम्हाला मी नक्की आठवेल. आजकलच्या धकाधकीच्या जिवनात आपण आपल्याच नादात असतो निसर्गाच्या अशा अनेक गोष्टी आपण विसरतो, म्हणून आपण निसर्ग संवर्धनात मागे पडतो. आता तुम्ही म्हणाल काय भाऊ कायपण सांगतो आजकल हवाच मिळणे कठीण झालीय झुळूक कुठून मिळणार? खरं आहे. पण हे असे कोणा मुळे झालं? आपल्यामुळेच ना?
मनुष्य प्राणी खुप स्वार्थी आहे. जर तो आपल्या स्वार्थासाठी निसर्गाचा नायनाट करू शकतो, व्रूक्षतोडी सारखी भयानक क्रूत्य करू शकतो तर आपल्या स्वार्थासाठी व्रूक्षारोपण का करू शकत नाही. जर तो निसर्गाच्या अशा गोष्टी अनुभवू लागला तर आपल्या स्वार्थासाठी का होइना तो निसर्गाचं संवर्धन करेल. निसर्गावर प्रेम करेल. त्याच्या या स्वार्थामुळे त्याचाच नाही तर इतरांचा पण फायदा होइल.
       निसर्गावर प्रेम करा तो तुम्हाला खुप खुश ठेवेल.........

©कुलदिप

Marathi Kavita : मराठी कविता


savita nare

 • Guest
Re: तुमची आमची "ती"
« Reply #1 on: February 25, 2015, 09:51:12 AM »
khupach sundar. ''nisarg vachava desh vachava''.

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
Re: तुमची आमची "ती"
« Reply #2 on: February 25, 2015, 11:39:18 AM »
Thank you savita ji