Author Topic: "अध्यात्म"  (Read 1791 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
"अध्यात्म"
« on: February 22, 2011, 08:50:55 PM »
"अध्यात्म"

आयुष्य म्हणजे खरं काय?एक नुसतं जन्मास येणं,शारीरिक रित्या स्वतःला पोसणं,प्रापंचिक भोग अस्वदाणं कि अजून काही पलीकडे पण?म्हणतात कि माणसाला नेहेमीच पुढच्या गोष्टींची उत्सुकता असते..पण मग स्वतःच्या आत्मिक जीवनाची ओढ खरच सगळ्यांना असते का?
आज एक संसारिक  आनंद मिळाला कि माणूस खुश होतो.,नव्हे तर तो त्याचा आनंदच असतो;काही अनपेक्षित पणे मिळाले तर त्याचा आनंद द्विगुणीत होतो कारण त्याला ते मिळणं अनपेक्षित असतं ,याला म्हणायचे स्वानंद,कारण तो अति खुश असतो.पण जेव्हा माणसाला असा आनंद मिळतो कि तो नाचू शकत नाही,हसू शकत नाही,व्यक्त करू शकत नाही आणि फक्त तो आनंद गहिवरून अश्रू गाळीतच व्यक्त होतो.त्या आनंदाला  काय म्हणायचे?अर्थात तोच खरा "परमानंद"....!!!!
हा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा कि कोणती असाध्य गोष्ट त्याला हाती आलेली दिसते..
तेव्हाच जेव्हा,कधीतरी माणूस स्वतःच्या विचारांमध्ये गुंतला असतो आणि एखादी आंतरिक इच्छा त्याला सतावते व तो ईश्वरा चरणी पूर्णतः एकाग्र होऊन विलीन होतो. व नकळतच एखादं फुल देवावरचं ,डोळे उघडल्या नंतर पडलेलं दिसतं...एक आशीर्वाद रुपात.त्या क्षणी त्याला  जे गहिवरून येतं,अथवा डोळ्यातून अश्रुधारा गळतात तेव्हा त्याला विचारून पहा..तो आनंद व्यक्त करू शकतो का.?
तो आनंद फक्त अनुभवत असतो..,याच आनंदाला म्हणायचे "परमानंद"....आणि हाच आनंद पहिल्या दोन आनंदापेक्षा मोठा आहे,सर्वात वरचा आहे नव्हे तर परम आहे.,कारण तो वर्णवूच शकत नाही म्हणजेच जो अवर्णनीय आहे जो फक्त पुनःपुन्हा आठवल्यांनी द्विगुणीत होत असतो तोच खरा आनंद...म्हणजेच "परमानंद".
हाच आनंद माणसाला जीवना पलीकडे काय या कडे बघण्याची दृष्टी देतो.त्याला मग दैनंदिन जीवन थोडं शुल्लकच वाटतं.त्याला पुढे काय याचीच ओढ लागते.
माणूस सर्वसाधारणतः जप करतो,पण जपात लक्ष नाही लागत कारण प्रापंचिक कामाचा विचार सतत मनी असतो.
"फक्त संख्यावारी “लक्ष “जप करतो ,पण “लक्ष” जपात नसतं "..!!
पण ज्यावेळेला एखादा दैवी अनुभव त्याला  येतो तेव्हा माळेचा प्रत्येक मणी हा ईश्वराचे तितक्या वेळेला  पाय पकडल्याचा अनुभव देतो..आणि पुन्हा प्रत्येक मण्या बरोबर तितके अश्रूही थेंब रुपी डोळ्यावाटे गळत असतात.हाच खरा त्याच्या चरणी केलेला प्रेमरूपी अभिषेक  असतो.कसा शब्दित करणार हा आनंद?इथूनच त्याची आंतरिक जीवनाची सुरवात होते,तो थोडं अंतर्मुख व्हायला लागतो.कारण त्याला स्वतःचा जग आता मिळालेलं असतं...!आणि बाहेरच्या जगाला अर्थात ज्यातच तो वावरत असतो,त्याला तो स्वच्छेनेच दूर सारायला लागतो.
ते एकाकीपणच त्याला आपलं ब्रम्हांड वाटत असतं.आणि जेव्हा तो पूर्णतः नामस्मरणात एकरूप होतो, तेव्हा त्याला देव नाही,कोणती मूर्ती नाही,फक्त एक शून्य नजरीत होतं..आणि त्या शून्यातच  त्याचं सर्वस्व त्याला दिसतं.....!हीच त्याची आंतरिक जीवनाची पहिली पायरी असते.तो त्या क्षणी जेव्हा त्या शून्य वालयाशी एकरूप होतो,आणि स्वतःच दैव असल्याचा अनुभव करतो,तीच स्तिथी त्याची प्रणायामित स्तिथी असते..!!अर्थात याच स्थितिला म्हणतात
"अहं ब्रम्हास्मि".
हि स्तिथी त्याला स्वयं तेजीत करते.त्याच्या भोवती एक तेजीत वलय("AURA") तयार करत असते.
इथूनच त्याला,भूत,वर्तमान,भविष्य हे सर्व एकंच वाटते.त्याला न राग,न लोभ,व अशा काहीच गोष्टी मोहू नाही शकत.कारण या भौतिक देहाच्या पुढचा देह त्याला प्राप्त होतो म्हणजेच सूक्ष्म देह.या देही तो एक परब्रम्ह असतो.
या परब्रम्हीत  अवस्थेतूनच तो स्वतःला स्वयं प्रकाशित करतो.हाच प्रकाश म्हणजे ओंकार.
हीच अवस्था त्याला ध्यानस्त करते.आणि इथूनच त्याचं आत्म्याचं अध्ययन सुरु होतं.
आणि हेच ते आत्म्याचं अध्ययन म्हणजेच "अध्यात्म "!!!
चारुदत्त अघोर.(२२/२/११)


Marathi Kavita : मराठी कविता