Author Topic: "आजची व्यस्त स्त्री आणि अपराध भाव"  (Read 1192 times)

Offline samantsuhas8

  • Newbie
  • *
  • Posts: 1
         काळाच्या बदलत्या प्रवाहाचा एक भाग म्हणून आजची स्त्री अर्थार्जनासाठी घराबाहेर पडली, पण ''स्त्री'' म्हणून तिच्यावर असलेली नैसर्गिक, कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी यत्किंचितही कमी झाली नाही म्हणून नोकरी व संसार ही तारेवरची कसरत व त्यातून अपराधभाव निर्माण झाला की मी कुठे कमी तर पडत नाही ना?
          असंख्य स्त्रियांनी यातून आपापल्या परीने मार्ग काढले असतील त्या सर्वांचे कौतुक करून मी प्रांजळपणे कबुल करते की मला कधीही कोणतीही कसरत करावी लागली नाही की विशेष असा अपराध भाव मनात राहिला नाही.
           काळाच्या थोडेसे पुढचे विचार असणारे सुविद्य सासू-सासरे लाभले! स्त्रीची नोकरी ही घराची गरज तसेच कुटुंबाचा तो भक्कम आधार व तिच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाची ओळख-शिक्षणाचा उपयोग होण्याचा तो एक घटक आहे हे त्यांना माहित होते! त्यांचा फार मोठा पाठींबा व आधार मला मिळाला - अगदी मुलं मोठी होईपर्यंत!
           अत्यंत आनंदाने व कुठलीही तक्रार न करता सकाळी लवकर उठून डबा करणे व नंतर सर्व घर आनंदाने सांभाळणे हे सर्व सासूबाईनी केले तर मुलांच्या शाळेची तयारी त्यांना नेणे-आणणे,फिरायला नेणे,सांभाळणे, संस्कार करणे व घरातील सर्वाना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असणारे सासरे,त्यांनी केले.
           म्हणूनच माझ्या मनात त्यांच्याविषयी सदैव आदर व कृतज्ञता आहे ती आज मी चतुरंगच्या माध्यमातून व्यक्त करते.    [/color][/color]
« Last Edit: July 19, 2014, 06:39:34 PM by samantsuhas8 »