Author Topic: डायरीतून .. (१)  (Read 983 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
डायरीतून .. (१)
« on: August 17, 2014, 01:12:00 AM »
डायरीतून ... (१)
.   
रोज तिच्या सोबत बोलताना तिची सवय होऊन गेली होती,  येणारा एक एक मिनीट तिच्या सोबत घालवण्या साठी जिव तूटत होता
.
 रोज २-३ वाजे पर्यंत तिच्या सोबत बोलायच अन सकाळ झाली की पहीला मेसेज सुद्धा तिलाच करायचा
.
तिचा एक जरी मेसेज आला तरी त्याला रिप्ले देण्यासाठीची जी धावपळ असते ति कुठली ही लोकल पकडण्याच्या अधिक होती.
.
 चहा नास्ता जेवण सगळ काय ते तिला सांगण्या पासून सूरू अन संपायचे हि तिथेच.  आणि मग दोघां मधे कुठल्यातरी छोट्या कारणा वरून भांडण सुरू
.
मग धरला अबोला दोघांनी, स्वत:हून मेसेज करण्यासाठी दोघांपैकी कोणाचीच तयारी नाही.
.
काssss ?  मी का करू मेसेज,  मी थोडी ना सुरवात केली ?  तिला गरज असेल तर ति करेल
.
तिला ...?
.
तिला गरज आहे का तुला ?
.
खर तर तिच्या पासून अबोला धरल्यावर माझाच जिव मला खायला ऊठतोय
.
पण मी ठरवलय, मी नाय करणार तिला मेसेज,  मी वाट पाहीन
.
तिचा मेसेज येतो
.
घरातून पहीले बाहेर पळतो
रेंज गेली तर, या भितीने,
खर तर बोलायचे खुप असते पण सुरवात कशी करावी तेच समजत नाही,  आणि मग ओळख असुन सुद्धा ते अनोळखी संभाषण सुरू होते.  आणि मग पुन्हा तेच दुखणं-तेच बोलणं. 
.
©   चेतन ठाकरे
« Last Edit: August 17, 2014, 01:12:52 AM by Çhèx Thakare »

Marathi Kavita : मराठी कविता