Author Topic: डायरीतून .. (२)  (Read 804 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
डायरीतून .. (२)
« on: August 17, 2014, 01:15:08 AM »
डायरीतून ... (२)
.
ति हि तुटलेली होती,  मि सुद्धा
अश्याच वाटेवर कुठेतरी भेटलो अन मग जुळून गेलो
.
जास्त काही नाही मला गरज होती अश्या व्यक्तीची जी मला समजून घेईल,  माझ्या भावनांचा आदर करेल,  मला वेळ देईल
.
 तिलाही असेच हवे होते
.
*आपण फक्त एकमेकांची गरज बणून असतो बाकी काही नाही
अठवण हि तेव्हाच काढतो जो पर्यंत काही काम आहे,  ते काम म्हणजे आपल्या मनाच सांत्वन म्हणा, गरज, ओढ म्हणा किवा काही वेगळ.*
.
विनाकारण कोणी तुम्हाला विचारत नाही ,  विचारण्यासाठी सुद्धा काहीतरी कारण लागत, कारण म्हणाल तर ओढ,  गरज,  सवय तेच.  या शिवाय तुम्ही कोणाच्या ऊपयोगीच पडू शकत नाही. 
.
 *तुम्ही लोकांशी कितीही चांगले
वागा लोक माञ त्यांची गरज पाहून
तुमच्या सोबत चांगले वागत असतात *
.
ईथे प्रत्येक जण खांदे शोधत असतो अन खांदे देत असतो. कुणी आपली गरज भागवण्यासाठी खांदा 'शोधत' असतो तर कुणी तिच गरज भागवण्यासाठी खांदा 'देत' असतो.  याच्या खांद्याच काम झालं कि याला डच्चू,  मग दुसरा खांदा सापडायचा.
.
हा खांदा देण्याघेण्याचा खेळ शेवट पर्यंत चाललेला असतो अगदी  स्मशानात प्रेत घेऊन जाणे पर्यंत.
.
यातून सुटका मिळते ति मेल्यावरच,  बाकी आयुष्यभर हा खेळ सुरूच असतो
.
©  चेतन ठाकरे

Marathi Kavita : मराठी कविता