Author Topic: डायरीतून .. (४)  (Read 830 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
डायरीतून .. (४)
« on: August 17, 2014, 01:19:47 AM »
डायरीतून ... (४)
.
.
" hi gm :) "
" Gm :) "
" कुठेय ..?"
" लेक्चर ला आहे "
" ठिक आहे मी नंतर बोलते "
" नाही बोल ना, लेक्चर बोरींग आहे,  तु बोल .."
" काय बोलू ..?"
" बोल आता काहीतरी "
.
किती ओढ असते ना बोलायची
त्या २ मिनीट च्या बोलण्यासाठी आपण कित्येक प्रयत्न करत असतो,  ईतर जणांना रिप्लाय देणार नाही पण तिच्या रिप्लेची वाट पाहीन, फोन ची चार्जिंग संपणार म्हणून चार्जर सोबत घेऊन फिरतो, त्यात चार्जर ची वायर बारीक त्यात च्यँटिंग साठी चाललेल्या आटापिटा,  त्यात चँट करताना कधी तो फोन बेड वरून खाली पडतो तर कधी चेहरयावरच
किती जिव जात असतो समोरच्या सोबत बोलण्यासाठी. 
लेक्चर, जेवन,  टिव्ही पाहताना,  घरात काम करताना,  गाणी ऐकताना कुठले न कुठले काम करत असताना त्या चँट बाँक्स ला माञ आराम नसतो
.
" ठिक आहे मी नंतर बोलते "
" नाही बोल ना,  लेक्चर बोरींग आहे,  तु बोल .."
" काय बोलू ..?"
" बोल आता काहीतरी "
" रश्मीचा फोन आला होता,  तिचा bf लग्न करतोय "
" Cool,  so wish her yar "
" तो दुसरया मुली सोबत लग्न करतोय "
" का  ..?"
" त्याला त्याच्या घरच्यांचा पुढे जायचे नाहीये  "
" मग रश्मीला सांग,  कि तुझ्या बाबांना सांग मला तो आवडतो,  मला लग्न करायचं त्याच्या सोबत "
" तुला वाटत तितक सोप्प नाहीये हे,  मुलांच सोप्प असतं,  मुलींना नाय जमत असं काही "
" तिच सोड आपलं बोल, तुझा काय विचार आहे "
" दुसरे बोल "
.
मी दरवेळी प्रयत्न करत असतो, पण विषय लगेच बदलला जातो
का...?
तिला या विषयावर बोलायच नाही का तिला हे बोललेलच आवडत नाही
.
मी पुन्हा बोलणार
.
बोलशील का  ..?
.
नको यार परत तिला आवडल नाही तर,  तिन माझ्या सोबत बोलण टाळलं तर
.
जाऊदे नको विचारू
.
©  चेतन ठाकरे

Marathi Kavita : मराठी कविता