Author Topic: डायरीतून .. (९)  (Read 896 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
डायरीतून .. (९)
« on: August 17, 2014, 01:33:18 AM »
डायरीतून ... (९)
.
.
*तुमच्या जिवनात काही गोष्टी या अचानक समोर येतात
ज्या अगदी अनपेक्षीत असतात. ते म्हणतात जिवन
तुमच्या पुढ काय वाढून आणेल काय सांगता येत नाही,  ते असचं *
.
" हे ऐकणारे "
" बोल "
" लग्न ठरतय माझ,
" काय ...? "
.
*हे ऐकून पायाखालची जमिनच सरकून गेली होती, ह्रदयाचा ठोका अचानक  रेल्वेच्या ईंजीना सारखा पडत होता,  धड-धड, धड-धड ,  डोक चक्करायला लागलं होतं,  हे जे सर्व होतय ते अत्ताच का होतय ..? *
.
" तुला हे सर्व पहीले नाही सांगता आलं
" माझ्या बहीणीने मला आजच सांगितलं. "
" कधी ना कधी हे होणार माहीत होतं पण   ईतक्या लवकर हा बाँम्ब फोडशील वाटलं नव्हतं ग मला "
.
" अरे खरच,  मलाही माहीत नव्हतं पण जे होतय ते खुप घाईत होतयं, आणि मी काहीच करू शकत नाही "
" बरं मुलगा कोण आहे ..? "
" समीर आणि तुला तो एड पण आहे "
" मला ..?  "
.
*मुलगा पहायला गेल तर चुतियाच दिसत होता,  तिला अन त्याला ईमँजिन जरी केल तरी तो जोडा कुठच मँच नव्हता. *
.
*हि ईतकी सुंदर,  अन तो sss 
तो तर नुसता बुजगावणं *
.
*सुंदर मुलगी हि एक अशी लाँटरी आहे जि फक्त यड्या-गबाळ्यांनाच लागते *
.
" काय आहे ग त्याच्याकडं अस ह !  काय पाहीलं काय तुझ्या घरच्यांनी ..? "
.
" ते रिलेटिव्हज आहे "
" मग काय,  काहीपण गळ्यात मारायच का ".
" ते फिक्स करणारे डायरेक्ट "
" तुझ काय मत आहे,  तुला आवडतो का तो ..? "
" मला करावच लागेल .. "
" ठिक आहे कधी ठरवताय आता "
" माहीत नाही "
.
" माझ्या सोबत येशील का ..? "
" तु सेटल नाहीये,  अन मला पळून नाय करायचं "
.
" ठिक आहे,  लग्ना पर्यंत तरी सोबत राहशील का,  ..? "
" फेसबुक वर राहीन,  फोन वर नाही "
" ठिक आहे बाय "
.
*तिला मिळवण्याचा मला एकूण एक प्रयत्न करायचा होता तो ही शेवट पर्यंत,  परत माझे मन मला म्हणायला नको कि तू प्रयत्न नव्हते केले *
.
*पण कितीही प्रयत्न करा काही गोष्टी कधीच शक्य होत नाही*
.
©  चेतन ठाकरे

Marathi Kavita : मराठी कविता