Author Topic: सु (व) संवाद : नवरा-बायकोमधील संवाद -विषय-खरेदì  (Read 3996 times)

Offline Swan

 • Newbie
 • *
 • Posts: 48
बायको- अहो! पैसे द्या!
नवरा- कशाला?
बायको- खरेदीला जायचंय?
नवरा- काय खरेदी करणार?
बायको- किती प्रश्न विचारता? नवरा आहे का प्रश्नावली?
नवरा- पण तू उत्तर देऊ नकोस! तुला उत्तर न देण्याचा अधिकार आहे.
बायको- पैसे आहेत का खिशात?
नवरा- आहेत ना?

बायको- किती? शंभरच्या वर नसतीलच!
नवरा- बहुतेक नव्वाण्णव असतील.
बायको- नशीब एकोणपन्नास नाहीत! क्रेडिट कार्डही नाहीच ना?
नवरा- नाही ना! कुणी देतच नाही.
बायको- कसे देतील? तुमचं आडनावच बुडवे! बुडवेना कोण क्रेडिट देणार?
 नवरा- एवढं होतं तर कशाला केलंस लग्न बुडवेशी!
बायको- सगळे बडवे- बडवे म्हणत होते! म्हटलं बडवे तर बडवे बडवणार तर नाही. पण निघाला बुडवे.
नवरा- ऐकायला कमी येत होतं का?
बायको- प्रश्न विचारायचा नाही. खरेदीला जायचं आहे.
नवरा- जा! पण माझ्यासाठी काही आणणार असशील तर-
बायको- तुमच्यासाठीच आणणार आहे. वाढदिवस आहे ना तुमचा पुढच्या आठवडय़ात!
नवरा- व्वा! लक्षात आहे वाटतं?
बायको- त्याच दिवशी अमिताभ बच्चनचा वाढदिवस आहे ना- त्यामुळे नाइलाजाने राहतो लक्षात!
नवरा- एक सूचना सॉरी! विनंती आहे. माझ्यासाठी शर्ट आणणार असशील-
बायको- हो!
नवरा- माझं माप माहीत आहे ना! म्हणजे असेलच-
बायको- हो!
नवरा- नाहीतर मागच्या वेळेसारखं होईल. दोन शर्टावर दोन ब्लाऊज फ्री म्हणून तू शर्ट आणलेस आणि ते इतके लांडे झाले की बनियन घातल्यासारखंच वाटलं!
बायको- तुम्ही फेकून दिले की ते शर्ट! शिवाय मी आणलेले मागचे सारे शर्ट फेकून दिले.
नवरा- फेकून नाही दिले ! वाटले! शनिपाराच्या देवळासमोर भिकारी बसतात ना त्यांना वाटले.
बायको- किती पुण्याचं काम!
नवरा- अगं पण पुढच्या शनिवारी गेलो तर सगळ्या भिकाऱ्यांच्या अंगावर माझेच शर्ट! मला पाहून तर त्यांना चेवच आला होता.
बायको- तुमची स्तुती करत असतील.
नवरा- छे! पँट द्या म्हणत होते.
बायको- मी आता मोठ्ठा शर्ट आणते.
नवरा- हो! म्हणजे मरेपर्यंत कितीही आटला तरी ढिलाच!
बायको- काळजी करू नका! माझ्याबरोबर ढोलेबाई आहेत. त्यांचे आणि तुमचे माप एकच आहे तेव्हा त्यांच्या अंगाला लावूनच आणेन.
नवरा- नको! नको!
बायको- का?
नवरा- मागच्या वेळेस तू असाच काहीतरी प्रकार केला होतास आणि लेडीज शर्ट आणलास!
बायको- पण तुम्हाला कसं कळालं नाही! चक्क ऑफिसात घालून गेलात!
नवरा- दुसरा शर्टच नव्हता. बाकीचे शर्ट धुण्यात आणि उरलेले शनिपाराजवळ!
बायको- या वेळेला मस्त शर्ट आणते.
नवरा- काळा, तांबडा, निळा रंग नको.
बायको- का?
नवरा- अगं एवढे गडद रंगाचे शर्ट असतात. धुतले की रंग जातो. त्यामुळे सगळेच कपडे अशा रंगाचे होतात की, रंग ओळखताच येत नाही.
बायको- थोडक्यात काय मी शर्टच आणू नको तर?
नवरा- हो! तेच छान होईल! शिवाय नव्व्याण्णव रुपयेही वाचतील.
बायको- ते नाही वाचणार! पैसे द्या! एका पर्सवर दोन हेअरपिनाची पाकीट फ्री आहेत. मी आणते पर्स!
नवरा- अगं पण (खिसे चाचपडतो) अगं! पाकीट कुठे गेले!
बायको- आता खरी नाटकं सुरू झाली.

मधुकर देशपांडे
« Last Edit: December 05, 2009, 09:27:39 PM by talktoanil »

Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,511
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Very Good. 

Note : you can upload your image or any symbolic image you want as we do on orkut.

Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,336
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.

Offline Parmita

 • Jr. Member
 • **
 • Posts: 246
(No subject)
« Reply #3 on: December 08, 2009, 03:35:51 PM »
सु (व) संवाद nawe fakta वाद !!!

Offline PRASAD NADKARNI

 • Jr. Member
 • **
 • Posts: 373
 • Gender: Male
 • Life:-a combination of adjustments & compromises

Offline gaurig

 • Full Member
 • ***
 • Posts: 983
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....

Offline sudhirkadam99

 • Newbie
 • *
 • Posts: 1
बायको- अहो! पैसे द्या!
नवरा- कशाला?
बायको- खरेदीला जायचंय?
नवरा- काय खरेदी करणार?
बायको- किती प्रश्न विचारता? नवरा आहे का प्रश्नावली?
नवरा- पण तू उत्तर देऊ नकोस! तुला उत्तर न देण्याचा अधिकार आहे.
बायको- पैसे आहेत का खिशात?
नवरा- आहेत ना?

बायको- किती? शंभरच्या वर नसतीलच!
नवरा- बहुतेक नव्वाण्णव असतील.
बायको- नशीब एकोणपन्नास नाहीत! क्रेडिट कार्डही नाहीच ना?
नवरा- नाही ना! कुणी देतच नाही.
बायको- कसे देतील? तुमचं आडनावच बुडवे! बुडवेना कोण क्रेडिट देणार?
 नवरा- एवढं होतं तर कशाला केलंस लग्न बुडवेशी!
बायको- सगळे बडवे- बडवे म्हणत होते! म्हटलं बडवे तर बडवे बडवणार तर नाही. पण निघाला बुडवे.
नवरा- ऐकायला कमी येत होतं का?
बायको- प्रश्न विचारायचा नाही. खरेदीला जायचं आहे.
नवरा- जा! पण माझ्यासाठी काही आणणार असशील तर-
बायको- तुमच्यासाठीच आणणार आहे. वाढदिवस आहे ना तुमचा पुढच्या आठवडय़ात!
नवरा- व्वा! लक्षात आहे वाटतं?
बायको- त्याच दिवशी अमिताभ बच्चनचा वाढदिवस आहे ना- त्यामुळे नाइलाजाने राहतो लक्षात!
नवरा- एक सूचना सॉरी! विनंती आहे. माझ्यासाठी शर्ट आणणार असशील-
बायको- हो!
नवरा- माझं माप माहीत आहे ना! म्हणजे असेलच-
बायको- हो!
नवरा- नाहीतर मागच्या वेळेसारखं होईल. दोन शर्टावर दोन ब्लाऊज फ्री म्हणून तू शर्ट आणलेस आणि ते इतके लांडे झाले की बनियन घातल्यासारखंच वाटलं!
बायको- तुम्ही फेकून दिले की ते शर्ट! शिवाय मी आणलेले मागचे सारे शर्ट फेकून दिले.
नवरा- फेकून नाही दिले ! वाटले! शनिपाराच्या देवळासमोर भिकारी बसतात ना त्यांना वाटले.
बायको- किती पुण्याचं काम!
नवरा- अगं पण पुढच्या शनिवारी गेलो तर सगळ्या भिकाऱ्यांच्या अंगावर माझेच शर्ट! मला पाहून तर त्यांना चेवच आला होता.
बायको- तुमची स्तुती करत असतील.
नवरा- छे! पँट द्या म्हणत होते.
बायको- मी आता मोठ्ठा शर्ट आणते.
नवरा- हो! म्हणजे मरेपर्यंत कितीही आटला तरी ढिलाच!
बायको- काळजी करू नका! माझ्याबरोबर ढोलेबाई आहेत. त्यांचे आणि तुमचे माप एकच आहे तेव्हा त्यांच्या अंगाला लावूनच आणेन.
नवरा- नको! नको!
बायको- का?
नवरा- मागच्या वेळेस तू असाच काहीतरी प्रकार केला होतास आणि लेडीज शर्ट आणलास!
बायको- पण तुम्हाला कसं कळालं नाही! चक्क ऑफिसात घालून गेलात!
नवरा- दुसरा शर्टच नव्हता. बाकीचे शर्ट धुण्यात आणि उरलेले शनिपाराजवळ!
बायको- या वेळेला मस्त शर्ट आणते.
नवरा- काळा, तांबडा, निळा रंग नको.
बायको- का?
नवरा- अगं एवढे गडद रंगाचे शर्ट असतात. धुतले की रंग जातो. त्यामुळे सगळेच कपडे अशा रंगाचे होतात की, रंग ओळखताच येत नाही.
बायको- थोडक्यात काय मी शर्टच आणू नको तर?
नवरा- हो! तेच छान होईल! शिवाय नव्व्याण्णव रुपयेही वाचतील.
बायको- ते नाही वाचणार! पैसे द्या! एका पर्सवर दोन हेअरपिनाची पाकीट फ्री आहेत. मी आणते पर्स!
नवरा- अगं पण (खिसे चाचपडतो) अगं! पाकीट कुठे गेले!
बायको- आता खरी नाटकं सुरू झाली.
 :D :D :D :D :D

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा वजा दहा किती ?  (answer in English):