Author Topic: कुणी तरी आहे तिथे(गमन)  (Read 1125 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
संध्याकाळ संपून दिवे लागणीची  वेळ होत आली होती. मी भराभर घराकडे निघालो होतो. आज तसा उशीरच झाला होता म्हणा. त्यात माझा हा बंगला वस्ती पासून बराच लांब, आगदी एकांतातच म्हणाना. पण हा बंगला बघतां क्षणीच मी त्याच्या प्रेमात पडलो होतो. गावा पासून लांब, जंगलातच म्हणाना. बंगला असा दूर असल्या मुळे इथे फार कोणाचा वावर नसतो. मला सुध्धा एकांतच आवडतो आणि म्हणूनच हा बंगला बघितल्या क्षणीच मी त्याच्या प्रेमात पडलो होतो. मी आठवड्यातून एकदा दोनदा शहरातल्या माझ्या मित्रांना भेटायला जातो.  पण बाकी वेळ मी एकटाच ह्या बंगल्यात मजेत असतो. आज सुध्धा आसाच मित्रांना भेटायला गेलो होतो. त्यांच्याशी बोलताना मला समजलं कि  आता ह्या भागात सुध्धा काही नवीन बिल्डींग, कॉम्प्लेक्सेसच बांधकाम सुरु होणार आहे. तसं झालं तर हा भाग आड बाजूला न रहाता गर्दिनी भरलेला मोठं शहरच बनणार. आणि मग तेच आवाज, कलकलाट, ट्र्याफिक. म्हणजे आताची शांतता आणि एकांत पार नाहीशी होणार तर. बघू. ते होईल तेंव्हा होईल.
 
बंगल्याच्या पुढच्या लॉंनवरं गवत आणि इतर जंगली झाडं अस्ताव्यस्त वाढलेली होती. आधीच्या मालकांनी हा बंगला खास सौंदर्य दृष्टीनी बनवला होता. बंगल्या पुढे लॉंन, त्यात विविध झाडं, कारंजे, कृत्रिम तलाव, बहुतेक त्यात पूर्वी मासे सुध्धा असावेत. पण मी हा बंगला बघितला तेंव्हा त्याची राया पूर्ण गेलेली होती. लाऊन मधील झाडं वाढून त्याचं जवळ जवळ जंगलच झालं होतं. करंज केंव्हाच बंद पडलं होतं. बंगल्या कडे जाणारा रस्ता आता जेमतेम पाउल वाटच राहिला होता. बंगल्याच्या ह्या लुक मुळेच बंगल्याच्या आसपासही फिरकायची कोणी हिम्मत करत नसे. आणि कोणाच्या हि लक्षात न येता बंगल्यात राहायचं तर तोच लुक जपणं आवश्यक होतं. अर्थात मला सुध्धा बंगल्याचा हाच लुक आवडत होता म्हणा. आणि म्हणूनच मी ह्या बंगल्याच्या प्रेमात पडलो होतो.
 
घरा जवळ पोहचलो तेंव्हा अंधार पडला होता. बंगला पूर्ण पणे अंधारात बुडून गेला होता. मी घाईघाईत व्हरांड्या वरून पुढे आलो आणि अचानक दचकलो. बंगल्याचं दांर उघडं  होतं. अरेच्या! असं कसं होईल? मी गेलो तेंव्हा दार उघडच होता का? मी विचार करत जरा वेळ तसाच उभा राहून कोणाची चाहूल लागतेय का ते बघितलं. बराच वेळ झाला तरी कुठेच कसली हालचाल जाणवली नाही. मी हळूच आत गेलो. जमिनीवर, कपाटावर सगळी कडे धुळीचे थर साचले होते. पण साफसफाई करायला मला मुळातच आवडत नाही. त्यापेक्षा आहे तसंच मजेत राहावं. नाहीतरी मी एकटाच रहातोय. आणि इथे येतंय कोण बघायला नीटनेटके पणा आणि साफ सफाई. मी चालतच आत आलो. दिवे बंदच होते. पण मला अंधारात वावरायची सवय असल्यानी मी दिवा न लावताच आतल्या माझ्या खोलीत निघालो. चालताना मी सहज जमिनीवर बघितलं अन पुन्हा एकदा दाचकायाची पाळी माझ्यावर आली. जमिनी वरच्या धुळीवर कुणाचे तरी पायाचे स्पष्ट ठसे उमटले होते. नक्कीच कुणी तरी घरात आलं होतं आणि अजूनही घरातच असण्याची शक्यता होती. मी बारकाइनी आजूबाजूला बघितलं. पावलांचे ठसे सगळ्या खोल्यां मधून फिरले होते. मी सावध झालो.
 
कोण आलं असेल बर ह्या आड बाजूच्या बंगल्यात ह्या अवेळी? हळूहळू मी आतल्या खोलीकडे गेलो. आधीच्या मालकाचं बरंच सामान इथे भरून ठेवलंय. ह्या खोलीत एक मोठं जुनं कपाट आहे. अर्थात ते साफ करायची तसदीही मी कधी घेतली न्हवती. मी सावध पणे आजूबाजूला बघितलं. ह्या खोलीतही कोणी तरी येऊन गेलं होतं कारण पावलांचे ठसे सगळी कडेच दिसत होते. बेड वरची चादरही थोडी विस्कटल्या सारखी वाटतेय का? मी उभा राहून कानोसा घेतला.
 
अता मला भीती वाटायला लागली होती. कुणी तरी बंगल्यात वावरत होतं हे नक्की. मी हळूच बाजूच्या खोलीत गेलो. ह्या खोलीत भिंतीवर एक मोठ्ठा आरसा आहे. मी आरश्या जवळ गेलो आणि नखशिखांत शहारलो. आरश्यावर कोणाच्या तरी हाताचा फरांटा उठला होता. आगदी स्पष्ट. कोणी तरी आरसा साफ केलेला वाटत होता. मी आरश्या पुढे उभा राहून विचार करण्यात गुंतलो होतो इतक्यात मला माझ्या मागे काही तरी हालचाल जाणवली अन त्याच क्षणी समोरच्या आरश्यात मला एका माणसाचं प्रतिबिंब दिसलं. मी गरकन वळलो. तो माझ्या मागे, आगदी बोटाच्या अंतरावर उभा होता. ज्या गोष्टीला मी घाबरत होतो तेच झालं होतं.
मी भयंकर घाबरलो. त्याच क्षणी माझ्या लक्षात आलं. मी आत आलो तेंव्हा दरवाजा उघडा असायला नको होता, कारण मला तर बाहेर जायला यायला दरवाजा उघडावाच लागत नाही. तेंव्हाच माझ्या लक्षात यायला हवंहोतं कुणी तरी माणूस बंगल्यात आलाय हे. तो माणूस माझ्यातून आरपार पलीकडच्या आरश्यात पहात होता. मी भयंकर घाबरलो अन हवेतून जोरात पुढे गेलो. तो अचानक आलेल्या थंड हवेच्या झोतांनी चांगलाच शहारलेला मला समजला. तरी सुध्धा, न थांबता मी अजूनच जोरात तरंगत जवळच्या खिडकीच्या काचेतून वेगानी बाहेर पडलो. मला शक्य तितक्या लांब त्या माणसाटकीच्या बंगल्या पासून लांब पळून जायचं होतं. बाहेर पडताना माझ्या मनात एकच विचार होता. मित्रांचं ऐकायला हवं होतं. भूतांना रहायला एखाद्या पडक्या विहिरी सारखी सुरक्षित जागा दुसरी असूच शकत नाही......

 
केदार..
(माझ्या गमन ह्या संग्रहातून)
 
  स्वप्नवेडा(गमन)
http://marathikavita.co.in/index.php/topic,9165.0.html
 


 
 
 
« Last Edit: July 30, 2012, 10:54:29 AM by केदार मेहेंदळे »

Marathi Kavita : मराठी कविता


Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline atulmbhosale

 • Newbie
 • *
 • Posts: 48
Re: कुणी तरी आहे तिथे(गमन)
« Reply #1 on: September 04, 2012, 10:17:01 AM »
mast

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: कुणी तरी आहे तिथे(गमन)
« Reply #2 on: September 05, 2012, 01:54:50 PM »
Bhari...

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):