Author Topic: कर (हात )  (Read 1122 times)

Offline aap

  • Jr. Member
  • **
  • Posts: 94
कर (हात )
« on: October 01, 2013, 10:59:38 PM »
                           कर (हात )


//कराग्रे वसती लक्ष्मी करमध्ये सरस्वती
करमूले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम //
खरच या हाताचे किती सुंदर यथार्थ वर्णन या श्लोकामध्ये केले आहे . म्हणूनच सकाळी उठल्यावर हा श्लोक म्हणून या हाताचे प्रथम दर्शन घेतो व हात जोडून नमस्कार करतो  तर असे हे हात या करकमलावर लक्ष्मी आणि सरस्वती नांदत असते परमेश्वर रिक्त हस्ताने कुणालाच जन्माला घालत नाही प्रत्येकाच्या हाती काही न काही देऊन पाठवलेले असते आपल्या हातात नेमके काय दिले आहे हे समजायला उमजायला माणसाला कधी कधी उशीर होतो इतकेच . हे हात ज्ञानाचे आहेत , विज्ञानाचे आहेत, कलेचे आहेत ,वांग्मयचे आहेत. निर्मितीचे आहेत , तसेच दातृत्वाचे हि आहेत .
 कर देउनि करी म्हणून आपण आपल्या पुढच्या आयुष्याची वाटचाल करतो . या हातांनी आपण अंजारतो  गोंजारतो, लहान मुलांचा हात धरून चलायला शिकवतो , लिहायला शिकवतो, मायेने पाठीवरून हात फिरवतो , वेळ प्रसंगी मुलांना चुकले की हाताचा रट्टा पण देतो ,उदर भरणासाठी हाताचा उपयोग करतो ,कष्ट करून पॆसा उभा करतो ,अडीअडचणीत लोकांना मदतीचा हात देतो, दुसऱ्याच्या कामात हातभार लावतो, पाठीवर शाबासकीची थाप देतो ,टाळी वाजवून दाद देतो, हातात हात घेऊन अभिनंदन करतो, आशीर्वादाचा वरदहस्त ठेवतो, विद्यमान होतो, हस्तरेषेवरून भविष्य जाणतो, हातांनी भरभरून दान करतो, देणारे हात हजारो असतीलही पण घेणाऱ्या चे दोनच असतात पसाभरच ओंझळ होईल इतकेच पोटापुर्तेच घ्यावे कोणा एका जेष्ठ कवींनी म्हटले आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत रहावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे .
खर तर शरीरातील प्रत्येक गात्र न गात्र आपापल्या जागी वॆशिष्ठवत कार्यरत असतो मनुष्य जन्माचे भाग्य आपल्याला लाभले ज्यांनी तो दिला त्या ईश्वराला कोटी कोटी प्रणाम

सौ . अनिता फणसळकर                                                       

Marathi Kavita : मराठी कविता