Author Topic: याच साठी केला होता अट्टाहास...... [ 2 ]  (Read 2624 times)

Offline archana sawant

 • Newbie
 • *
 • Posts: 5
याच साठी केला होता अट्टाहास......

पुढे चालू....


शेवटचं वाक्य मात्र मला आवडला....
असेच दिवस भुर्कन निघून जात होते.मला मात्र काहीच सुधरत नव्हतं. रोजचा नवा  दिवस माझ्या साठी नवी स्वप्ने घेऊन यायचा.
 
कॉलेज मध्ये खूप  मुली होत्या, पण पहिल्याच  नजरेत समोरच्याचा  जीवघेणा अंत पाहणारी ... तू एकटीच.

त्या दिवशी तू घरात आलीस तेव्हाचीच गोष्ट आहे....
बहुतेक रविवार असावा, मी रानातल्या कांद्याला पाणी पाजत  होतो, तू आलीस आणि एकदम घरात गेलीस, ( हे स्वप्नात  मी अनेकदा पाहिलंय, उंबरा ओलांडून तू माझ्या जीवनात येतीस ते.....) , माझी आई स्वयंपाक करत होती,  ' अरं म्हाद्या तुझ्याकडं कोण आलंय बघ ? 'मी तसाच पाटात हात धुवून  घरात शिरलो तर पुढे तू...चुलीपाशी बसलेली..... ( काय होणार माझं.. देवालाच माहित. )मी तसाच बाहेर पडलो.तुझ्या आणि आईच्या  गप्पा संपल्या, तुला ACCOUNT  ची वही पाहिजे होती काय ? ( खोटारडी कुठली..) , आई मी हिला घरापर्यंत सोडून येतो गं, मी बाहेर आलो. तू आई -आबांच्या पाया पडलीस....

तू  काहीच बोलत नव्हतीस , मला पण कोठून सुरवात करायची हे कळत नव्हतं.
तुला खूप काही विचाराव,खूप काही सांगावं असं वाटत होतं, पण शब्द सापडत नव्हते. माझं मन सांगत होतं ' बोल म्हाद्या, बोल हीच वेळ आहे. हाच क्षण आहे, हा निसटून देऊ नकोस, माझ्या सैरभैर मनाला जोरजोरात धडकणार  हृदय साथ देत होतं...
 
" आज अचानक माझ्या घरी ?" - तोंडातून एवडेच शब्द बाहेर पडले.
'आ.. ACCOUNT ची वही हवी होती..'
" पण तूझं ACCOUNT  तर सगळ्यात चांगलं आहे, ... माझ्यापेक्षाही.." मी तिच्या कडे बघीतलं.
' तू चित्र काढतोस ना ? मला नाही दाखवलीस....' तिनं विषय बदलला....
" हा बसतो काहीतरी रंगवत......"
' मी तुला भेटायला आले होते, ' तिने एकदा खोलवर माझ्या डोळ्यात  बघीतलं,  ' त्या दिवशी तुला  पहिल्यांदा बघीतलं  तेव्हाच मला जाणवला कि मी तुझ्या प्रेमात पडलेय, '  तुला कधी असं वाटला नाही.....?
   
 माझ्याकडे उत्तर होतं ? -
"हो, मलासुद्धा आज हेच सांगायचं होतं... माझं पण तुझ्यावर  खूप प्रेम आहे.... '
     " माझ्या आयुष्यात तू प्रेमाचे रंग  भरशील ? "
तू बोलली काहीच नाहीस.....


म्हाद्या, कोण रं ती ? आई जेवताना विचारात होती....
'रंगराव पाटलांच्या घरातली आहे...'
" किती ग्वाड हाय, नाव काय र ? "- माझी आई थांबायलाच तयार  नव्हती....... शेजारचे  आबा एकदा आई कड आणि एकदा माझ्याकडं बघत होते...
' लक्ष्मी ...' - मी ताटातला घास उचलला.... ( आज दुपारपासून नुसतं खुलल्यागत  होत होतं....)
" का ? सून करून घायचा विचार आहे ? " - आबांचा धारधार आवाज आला.....
' आक्शी माझ्या मनातला बोललासा.....' - आई काय  गप्प बसत नव्हती....
आबांच्या  कपाळाला आठी चढली. 
" काय  रे दिवट्या, महिन्यातले किती तास कालेजात जातोस....?,
" जरा तोंड बघा लेकाचं आरशात...." मुकाट्यानं जेवा आता...." आबा भडकले....


किती रंग भरले नाही आपण आपल्या  स्वप्नात ?
" तुझ्या कपाळीचा लाल रंग, तुझ्या डोळ्यातला सोज्वळ भाव... तुझ्या  आवाजातलं संगीत  ... आणि माझ्यावरचं प्रेम...... कीती  सुंदर होतं ना स्वप्नं...."
 

" मी उद्या जाणार आहे, लगेच परत येईन, काही काळजी करू नकोस....."
तू  हे सांगत होतीस पण मला कुठेतरी आत जाणवत होतं... " हि  वेळ चुकीची आहे.....आज काहीतरी बिघडणार  आहे....."  पण नक्की काय  ते मला लक्षात  येत नव्हतं....
" तू लांब लांब जात आहेस असंच तेव्हा वाटलं..
तुला त्याच दिवशी थाब्वायला हवं होतं..... तू गेलीच नसतीस तर किती छान झालं असतं. मला काय माहित तू गेल्यावर परतणार नाहीस ते......
तुला त्या दिवशी थांबवलं असतं तर - थांबली असतीस ? आपल्या स्वप्नांची आठवण करून दिल्यावर तूझा पाय माघारी वळला असता ?


आज हे प्रश्नाचं काहूर डोक्यात माजलंय, आज आणि हिशोब केला, अपूर्ण राहिलेल्या आणि बेरंग झालेल्या स्वप्नांचा...
तूझा साधा पत्र हि आला नाही इतक्या वर्षात . काय वाटलं असेल मला ?...

" कुठे गेलीस तू ? ..
का गेलीस मला सोडून ? ...
माझी कधी आठवण तरी झाली का? ...
परत यावसं वाटलं नाही कधी ?..

किती किती प्रश्न......

तू बरी तर आहेस ना ?  मी पण तसा बराच  आहे.....

" पान्दितल्या  बैलगाडीतून जाणाऱ्या    त्या सुखी जोडप्याचा  आज अकारण हेवा वाटतो...  आणि स्वतःच्या  एकटेपणाचा दुःख ...
माझ्या चित्रातली ती बैलगाडी..... रिकामीच  आहे त्यात तुझ्या कपाळीच्या कुंकवाचा लाल रंगच नाही....."

सगळं रोज रोज पुन्हा पुन्हा आठवतं...
किती वर्ष झाली ना, तब्बल २२, सगळी  कालचीच तर गोष्ट वाटते नाही......

पांडुरंगाच्या देवळातून उठतो....आई-आबा कायमचे वारीला गेलेत...

घरी जायला पाहिजे.......
 
देवळात बुवांचा आवाज रोजच्यासारखाच घुमतो ,

" याच साठी केला होता अट्टाहास...... शेवटचा दिस गोड व्हावा..........."
समाप्त... 

 


Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,336
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
 अरे रे ... शेवट का असा झाला  :( ........... छान आहे लेख .........

Offline gaurig

 • Full Member
 • ***
 • Posts: 983
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
khupach chan....

Offline nirmala.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 385
 • Gender: Female
 • nirmala.
atishay sundar ahe lekh...............................

manatil sakhol bhawnani purna bharlela..........khup sundar ahe..................... :)

Offline Vaishali Sakat

 • Jr. Member
 • **
 • Posts: 161
Zhaan Aahe Lekh....Aayushyat Assa Ka Hota ??? Jya vyktila Thambavas vatat.......tyaveli ti agdi javal vatate......pan achnak assa kahis ghadat ki ti vyakti....itkya lamb jate..... punha disel ki nahi hach prashna padato........ :'(

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पन्नास गुणिले पाच किती ? (answer in English):