Author Topic: [Health] पथ्याचा बागुलबुवा  (Read 1036 times)

Offline madhura

 • Jr. Member
 • **
 • Posts: 271
 • Gender: Female
 • I am Simple
[Health] पथ्याचा बागुलबुवा
« on: November 08, 2009, 09:08:40 PM »
'डॉक्टर, मला तुमच्याकडे औषधाला यायचंय हो, पण आयुवेर्दात पथ्यच जास्त असतात ना.' समीरा आपल्या आयुवेर्दिक डॉक्टरांना सांगत होती. खरंतर आयुवेर्द म्हटलं की पथ्य आणि पथ्य म्हटलं की आयुवेर्द, असं समीकरणच अनेकांच्या मनात पक्कं असतं. हे आपल्या मनात इतकं ठामपणे रुजवलेलं असतं की त्यामुळे गुणकारी असूनही अनेकजण आयुवेर्दाकडे वळायला घाबरतात.

बंधनं तशी कोणालाच आवडत नाहीत, विशेषत: खाण्यावरची बंधनं. आजूबाजूला बघितलं तर हजारो लोक मधुमेहाने ग्रस्त असल्याने साखरविरहित पदार्थ आणि हृदयविकाराच्या भयाने तेल-तुपाच्या पदार्थांना सोठचिठ्ठीच देतात. एवढंच कशाला वजन वाढू नये म्हणून वडे, समोसे, पिझ्झा, बर्गरकडे पाठ फिरवणारेही खूप जण आहेत. जिमला जाणारा प्रत्येकजण आज 'फॅड डाएटिंग'चा आदर्श नमुनाच असतो. म्हणजेच जरी 'पथ्य' हे नाव नसलं तरी प्रत्येकालाच जिभेवरची बंधनं पाळायची सवय, गरज किंवा सक्तीला सामोरं जावं लागतं. अशावेळी जरा 'पथ्य' म्हणजे नेमकं काय आणि आयुवेर्दाने त्याला एवढं महत्त्व का दिलं आहे हेही बघायला हवं.

पथ्य म्हणजे योग्य मार्गावर नेणारं. म्हणजे आरोग्याच्या मार्गावर नेणारं ते सर्व 'पथ्य'. मात्र हेच 'पथ्य' आरोग्यला बाधा आणणारं असेल तर ते अपथ्य किंवा कुपथ्य!

आपण घेत असलेला आहार, आपलं वागणं, खेळणं, काम करणं या सगळ्यांचा शरीरावर चांगला-वाईट काहीतरी परिणाम होत असतो. गाडीचा शॉक अॅबझॉर्बर रस्त्यातले खड्डे किंवा धक्के शोषून प्रवाशांना त्रास होऊ देत नाही तसंच आपला पाचकाग्नि अन्नाचे होणारे ९९ टक्के दुष्परिणाम आपल्या क्षमतेने शोषून घेतो. पण ताण अति झाला तर मात्र त्याच्या क्षमता संपतात. त्यावेळी पचनाची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी 'पथ्य' गरजेचं ठरतं.

पथ्य एवढं सोपं आहे. आपल्याला बऱ्याचदा शरीरही रोगापूवीर् सिग्नल देत असतं. ताप येण्यापूवीर् खावंसं वाटत नाही किंवा तोंडाची चव जाते. सदीर् झाल्यावर गोड, आंबट नकोसं होतं. गरम पाणी, चहा किंवा तिखट खाण्याची इच्छा होते. ही सगळी शरीराची धडपड असते रोगापासून दूर होण्याची आणि आपलं आपण पुन्हा बरं होण्याची. अशावेळी त्याला मदत करणारं, मार्गावर आणून सोडणारं 'पथ्य' म्हणजे 'लंघन'. खाणं-पिणं कमी करणं किंवा औषधी काढा जसं गवती चहा घेणं म्हणजे अनुक्रमे ताप आणि सदीर्साठीचं 'पथ्य'. एवढं ते सोपं असतं. म्हणून आयुवेर्दाची औषधं जेव्हा रोगाचा प्रतिकार करत असतात तेव्हा त्यांना पथ्याची जोड दिल्यास रोग पटकन आटोक्यात येतो.

एकूणच पथ्य म्हणजे मन मारून तोंडाला कुलूप लावणं नसून शरीराच्या प्रतिकारशक्ती, पचनशक्तीला साहाय्यक अस्त्र आहे. साखर, तेल, तुपावर बंदी घालणं असा त्याचा विपर्यास न करता संयमाने याच गोष्टींचा गरचेनुसार चातुर्याने वापर करणं म्हणजे आयुवेर्द हे लक्षात ठेवलं तर 'पथ्याचा बागुलबुवा' न करता आपण आपलं आरोग्य अधिक आनंदी करू शकतो.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Re: [Health] पथ्याचा बागुलबुवा
« Reply #1 on: November 08, 2009, 09:52:33 PM »
Very Usefull.

Added 1 Popularity Point.

Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: [Health] पथ्याचा बागुलबुवा
« Reply #2 on: February 04, 2010, 02:25:55 PM »
thanks for this useful information....