Author Topic: एक कथा.... गंध हरवलेल्या केतकी ची.... भाग 1  (Read 1219 times)

Offline Shraddha R. Chandangir

  • Jr. Member
  • **
  • Posts: 346
  • Gender: Female
केतकी, एक 14 वर्षांची मुलगी.
अतिशय हुशार. confident. Dashing. वर्गात
नेहमी पहील्या 5 मुलांमधून क्रमांक
पटकावणारी. घरची आर्थिक
परिस्थिती ही उत्तम. आई-
वडील दोघेही नौकरी करणारे. एक
उच्चशिक्षीत कुटूंब. सगळं एकदम सुरळीत
चाल्लेलं. अभ्यास, शिकवणी वर्ग, स्पर्धा, other
activities, result.... सगळं नेहमीप्रमाणे.
पण? पण 3 वर्षांनी...... अचानक...... अचानक
बातमी कळते.... की तीने
आत्महत्येचा प्रयत्न केला. colony मधल्या काकूंच्या कट्यांना एक गरम
Topic मीळतो. सकाळी morning walk
ला जातांना सगळ्या काकांच्या चर्चेला एक नविन उधाण येतं. सगळे आपापलं
मत मांडतात. कोणी म्हणतं
बीचारीला अभ्यासाचं pressure आलं असेल
हो. कोणी म्हणतं, मला तर
काहीतरी जादूटोण्याचा प्रकार वाटतो. तर
कोणी म्हणतं....
अहो कसली बिचारी??
एखाद्या मुलाशी लफड वगैरे होतं म्हणे तीचं.
सगळे आपापल मत मांडून मोकळे होतात. सुशिक्षित आणि सुसंस्कृत
म्हटल्या जाणार्या आपल्या समाजाचं एक उत्तम दर्शन या वेळेला घडतं.
आता थोडं Flashback मध्ये जाऊ. केतकी... 8 व्या वर्गात
शिकत असते. एक अतिशय हुशार, अभ्यासु
मुलगी अशी तीची image.
घरात एक 5 वर्षांनी लहान भाऊ. आणि आई-
वडील दोघेही शिक्षक. आई-
वडील दोघेही नौकरी करत
असल्यामुळे, मुलांना पाहीजे तसा वेळ त्यांना देता येत
नाही. बाबांचा स्वभाव एकदम शांत. याऊलट आईचा स्वभाव
अतिशय तापट. By professon दोघेही शिक्षक
असल्यामुळे घरात अभ्यासावर जरा जास्तच जोर टाकला जातो. घरातला time
table ही ठरलेला. सकाळी 6 वाजता उठणे.
दोघ मुलांनी आपापल्या शिकवणी वर्गाला जाणे.
9. 30 ला घरी परतणे. तोवर आई-बाबांची कामे
उरकून ते ही जाण्याच्या तयारीत लागलेले. 10.
30 पर्यंत सगळ्यांची जेवणं
आटोपली की जो तो आपापल्या कामाला निघालेला.
संध्याकाळी 5. 30 पर्यंत पुन्हा सगळे
घरी परत. आई
संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागलेली.
बाबा कीराणा, भाजीपाला, दळण या कामात लागलेले.
दोघेही मुलं अभ्यासात लागलेली. 9 वाजता जेवण
उरकून....... आपापली कामे पार पाडून..... सगळे अंथरूणावर
जाऊन नीजलेले. संपला दिवस. सोमवार ते शनिवार हेच
schedule. रविवार एकच दिवस
सुट्टी चा मीळतो, म्हणजे तो आई-
वडीलांचा आराभ करण्याचा दिवस,
आणि मुलांसाठी अधिक अभ्यास
करण्याची सुवर्ण संधी. आठव्या वर्गापर्यंत
केतकी चं जीवन हे असंच चालू असतं.
मुलगा कींवा मुलगी एका विशिष्ट वयात
आल्यावर त्यांच्यात शारीरिक आणि मानसिक बदल होत
असतात. त्यांच्यात एक स्वतंत्र विचारशक्ती निर्माण होते.
स्वतःच्या आवडीनिवडी कळू लागतात.
शारीरिक आकर्षण, प्रेम, सहवास
या सगळ्या जाणिवेची एक सुरुवात व्हायला लागते.
मीत्र, मैत्री ही केवळ Notes
आणि Books पर्यंत मर्यादीत न राहता जगण्या,
मरण्या पलीकडे घट्ट वाटू लागते. -अनामिका TO BE CONTINUED IN भाग 2
« Last Edit: November 07, 2014, 06:52:57 PM by @Anamika »