Author Topic: एक प्रवास आगी सोबत... 1  (Read 497 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,212
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
एक प्रवास आगी सोबत... 1
« on: August 15, 2015, 03:58:26 PM »
एक प्रवास आगी सोबत...

२६ जलै २००५ च्या महाभयंकर पुरातुन नुकतेच सर्वजण सावरले होते, त्या आठवणी ताज्या असतांनाच पुन्हा तशीच वेळ येते कि काय असा प्रसंग ओढवला...

घटना, बरोबर १० वर्षा पुर्वीची, ६ सप्टेंबर २००५ ची संध्याकाळची वेळ, मुंबई सी.एस.टी वरून सुटणा-या ५.५५ च्या बदलापूर लोकल मधे आम्ही सर्व ग्रुप मेंबर्स स्थानापन्न झालो. नेहमी प्रमाणे  गाडी सुटल्याबरोबर आमची गाण्याची मैफल सुरू झाली, ज्या मैफलीला डब्यातील परीचित, अपरीचित प्रवाशांकडून उस्फुर्त दाद मिळत होती. आमच्यापैकी बहुतेक सर्वजण चांगले गायक असल्याने एका पेक्षा एक सुरेल गाण्यांची मैफल नेहमीच रंगत असे, गाणी गाता गाता प्रवासातला वेळ कसा जात असे हे अजिबात कळत नसे.

नोकरदारांना कोणत्याही परीस्थितीत घराबाहेर पडावेच लागते, त्या दिवशी सकाळ पासुन सारखा पाऊस पडत होता, आता सुध्दा बाहेर विजांच्या कडकडाटा सह पाऊस ब-यापैकि बरसत होता आणि आत डब्यात एकापेक्षा एक सुर बरसत होते, आमची गीत मैफल उत्तरोत्तर रंगत होती, एक तास दहा मिनिटांचा सी.एस.टी. ते अंबरनाथ हा प्रवास  कसा संपला हे कुणालाच समजले नाही, अंबरनाथ स्टेशनला गाडी नेहमी पेक्षा जरा जास्त वेळ उभी राहिल्याने सर्वाची चुळबुळ सुरू झाली होती, प्रत्येकजण काय झालं असेल याचे आडाखे बांधत होता, बाहेर पाऊस चांगलाच कोसळत असल्यामुळे प्रत्येकाने दरवाजे खिडक्या बंद करून घेतल्या होत्या त्यामुळे बाहेरची काहीच खबर कळत नव्हती, दरम्यान कशीबशी गाडी सुरू झाली होती.

ज्या ठिकाणी आम्ही बसायचो तो अकरावा डबा बदलापूरच्या दिशेकडचा प्लँटफाँर्म सोडायचा बाकी होता, पुढील दहा मिनिटात बदलापूरला उतरायचे या विचारात आम्ही सारे असतांना एका झटक्या सोबत जोरदार धमाका झाला, आणि डब्यासह प्लँटफाँर्म वरील सर्व दिवे गेले, सगळीकडे गर्द अंधार झाला आणि आगीचा एक भला मोठा लाल पिवळा लोळ उठला, आगीची तिव्रता एवढी होती कि खिडक्या दरवाजे बंद असतांना सुध्दा बाहेरचा सारा परीसर त्यात उजळुन गलेला आम्हाला दिसला व पापणी लवेस्तोवर पुन्हा मिट्ट काळोख पसरला, क्षणभर माझ्या काळजाचा ठोका चुकला, "आपुले मरण पाहीले म्या डोळा" अवस्था झाली होती, पण पुढच्या काही मिनिटातच सावरलो,  कसलाही अंदाज येत नव्हता, बाँम्बस्फोट झालाय कि काय अशी काळीज हादरवणारी शंका मनाला वाटली. इथे डब्यात नुसता गोंधळ, आरडा ओरडा ऐकू येत होता, त्यातच पुन्हा एक आगीचा लोळ दिसला, आमच्या डब्यावर जणु कुणीतरी दिवाळीतला अनार फोडतोय कि काय असाच भास होत होता, भिती मिश्रित आश्चर्य अशी काहीशी अवस्था बाकी मित्रांची सुध्दा झाली होती, बाहेरून कुणीतरी सागितले कि गाडीच्या पेंटोग्राफला आग लागली आहे, त्याचेच स्फोट होत होते, इकडे मनातुन मात्र सगळ्यांचीच पार तरतरली होती.

काही लोकांनी चालत्या गाडीतुन उडया टाकल्या, कुणी रडू लागले, काय न काय, परंतु आम्ही सारे समंजस पणे वागलो, मनातुन आठवतील त्या देवांचा धावा आम्ही करीत होतो. एकीच बळ काय असतं ते सर्वानी दाखवुन दिल, एकानेही उडी मारण्याची वा पळण्याची घाई केली नाही, महत्वाचं म्हणजे कुणीही पँनिक झाले नाही किंवा तसं कुणी दाखवल नाही, उलट एकदुस-याला धीर देवुन सावरत होते. बाहेर पावसाचा जोर वाढला होता, सोबत विजांचा कडकडाट आणि टपावर छोटे छोटे स्फोट सुध्दा. .....2


= शिवाजी सांगळे, बदलापूर, जि.ठाणे +919422779941-+919545976589 email:sangle.su@gmail.com
« Last Edit: August 15, 2015, 03:59:18 PM by शिवाजी सांगळे »

Marathi Kavita : मराठी कविता

एक प्रवास आगी सोबत... 1
« on: August 15, 2015, 03:58:26 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):