Author Topic: मी कोण? कोठून आलो? कोठे जाणार आहे? माझ्या अस्त  (Read 4404 times)

Offline janki.das

  • Jr. Member
  • **
  • Posts: 76
मी कोण? कोठून आलो? कोठे जाणार आहे? माझ्या अस्तित्वाचे प्रयोजन काय?
हे व यासारखे मूलगामी प्रश्न प्रत्येक विचारी व संवेदनशील व्यक्तीला जीवनाच्या

कोणत्या ना कोणत्या वळणावर भेटतात आणि मग ती व्यक्ती आपल्या बुद्धीच्या, भावनांच्या, अनुभवांच्या परिघात त्यांची उत्तरे शोधू पाहते. ही उत्तरे शोधण्याकरिता माणसाने अनेक गोष्टींची निमिर्ती केली. उदा. साहित्य, कला, विज्ञान, योग व या सर्वांचे कदाचित सिन्थेसीस म्हणता येईल असे अध्यात्मशास्त्र! म्हणूनच 'अध्यात्मविद्या विद्यानाम्' असे श्रीमदभगवद्गीता का म्हणते किंवा 'स्पिरीच्युअल सायन्स इज द सम टोटल ऑफ ऑल सायन्सेस' असे बुंडाड (जर्मनी) का म्हणतो ते जाणून घेतले पाहिजे.

जगण्यासाठी आवश्यक वैयक्तिक मूलभूत गरजांपलीकडे जाऊन माणूस विचार करू लागला त्या वेळी प्रथम 'समाज' जन्माला आला. समाज हा त्याच्या वैयक्तिक अस्तित्वासाठी व सुखासाठीही आवश्यक होता. त्याही पलीकडे जाऊन तो आपल्या अस्तित्वाचा शोध घेऊ लागला. त्यावेळी विविध अनुभवांचा मामिर्क, ताकिर्क अर्थ लावण्याच्या दृष्टिकोनातून मन, बुद्धी, आत्मा, प्राण, परमात्मा, ईश्वर इ. संकल्पनांचा जन्म झाला. विकास झाला. यातील अनेक गोष्टींचे उदा. मन, प्राण, जाणीव यांचे भौतिक अस्तित्व दाखवता येत नाही; पण व्यावहारिक अस्तित्व नाकारता येत नाही. म्हणून असे मानण्यात येऊ लागले की, मन ही मेंदूची उन्निमिर्ती (इमर्जन्स), प्राण ही देहाची उन्निमिर्ती तर जाणीव ही मेंदूअंतर्गत उजेर्ची उन्निमिर्ती! मन, बुद्धी, प्राण या गोष्टी फक्त चेतन सृष्टीतच दिसून येतात व हा फरक चेतनेमुळे व चैतन्यामुळे येतो, असे दिसून येऊ लागले. या चैतन्यालाच आत्मा, परमात्मा, ईश्वर इ. नावे देण्यात आली.

सामान्य स्तरावर अमूर्त, निर्गुण, निराकार चैतन्य म्हणजे नेमके काय हे कळणे कठीण होऊ लागले, म्हणून सगुण साकार, वैयक्तिक देवाची निमिर्ती झाली. यातूनच पुढे अनेक देव-देवतांची निमिर्ती झाली. त्यातूनच पुढे विविध धर्मांची निमिर्ती झाली. तत्त्वज्ञानांचा ईश्वर मात्र या सगुण ईश्वरापासून वेगळा राहिला. जे जे भव्य, उदात्त, दिव्य, महान, मंगल आहे त्यांचे प्रतीक म्हणजे ईश्वर! या सर्वांचा वेध म्हणजे अध्यात्म!!

अस्तित्वाचा अर्थ लावताना मानवी संस्कृतीने साहित्य, कला, विज्ञान, योग व अध्यात्म अशा वरकरणी वेगवेगळ्या वाटणाऱ्या गोष्टींची निमिर्ती केली असली तरी त्यांचा मूळ उद्देश हा अस्तित्वाच्या कॅलिडोस्कोपचा वेध घेणे हाच असतो. त्यांच्यातही एक प्रकारचे मधुर आंतरिक नाते असते. एका छोट्या रूपकाने हे स्पष्ट होईल.

एका नयनरम्य बागेत एक सुंदर गुलाबपुष्प उमलले आहे. जवळून जाणाऱ्या एका रसिकाचे तिकडे लक्ष जाते आणि त्यालाच सुंदर काव्य स्फुरते. थोड्या वेळाने तिकडून जाणाऱ्या विज्ञानाच्या विद्यार्थ्याचे कुतूहल त्या फुलामुळे चाळविले जाते. त्या फुलाचा प्रकार कोणता, त्याची रचना कशी आहे, त्याचे पुनरुत्पादन कसे होते, त्याचे जैवरासायनिक गुणधर्म कोणते, त्याचा औषधी उपयोग आहे का इ. प्रश्न त्याच्या डोक्यात थैमान घालू लागतात व तो आपल्या प्रयोगशाळेकडे जातो. थोड्याच वेळात तेथे तिसरा माणूस येतो व बघता बघता 'भावातीत' अवस्थेत जातो. 'फूल' मध्यवर्ती कल्पून तो सबीज समाधी अवस्थेत जातो. थोड्या वेळात ते फूल, तो स्वत: व भोवतालचे वातावरण, विश्व यातील भेद हळूहळू वितळत जातो. त्या सर्वांतील एकात्मता त्याला जाणवू लागते. बागेतच एक तत्त्वचिंतक बराच वेळ या फुलाकडे ध्यान लावून बसला आहे. या फुलाच्या निमिर्तीमागे कोणती प्रेरणा कार्यरत आहे. या फुलाचे या विश्वाच्या अफाट पसाऱ्यात स्थान काय, प्रयोजन काय व हे फूल विशिष्ट समजावयाचे (द्वैत) की संपूर्ण अस्तित्वाचाच तो एक अंश समजावयाचा (अद्वैत) असे विविध विचार त्याला गुंगवून टाकत आहेत. या रूपकातला पहिला माणूस जे करत आहे ते साहित्य व कला, दुसरा आहे वैज्ञानिक, तिसरा योगी, तर चौथ्या तत्त्वचिंतकाचे कार्यक्षेत्र आहे 'अध्यात्म'!


आपण वरील चारपैकी वा अन्य कोणीही असा, आपण सर्व एक आहोत, अभिन्न आहोत, परस्परावलंबी आहोत आणि आपण 'आहोत' (एक्झिस्टिंग) हेच सर्वांत महत्त्वाचे नाही का?

- डॉ. उल्हास कोल्हटकर

डॉ. उल्हास कोल्हटकर हे प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि वैद्यकीय व तत्त्वज्ञान विषयाशी संबधित अनेक पुस्तकांचे लेखक आहेत. रोटरी मंडलासहित अनेक सामाजिक संस्थांशी ते जवळून निगडित आहेत. त्या संस्थांचे नेतृत्वही त्यांनी केले आहे.


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पाच गुणिले पाच किती ? (answer in English):