"मायबोली"
लेख क्रमांक-3
--------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज वाचूया, "मायबोली", या शीर्षकI-अंतर्गत, एक सामाजिक लेख. या लेखाचे शीर्षक आहे-"गुंता"
गुंता ...
------
लिखाणाची पण एक गम्मत असते. लिहावेसे वाटते तेव्हा लिहायला समोर काहीच नसते. किवा लिहिण्याची परिस्थिती नसून ड्रायव्हिंग किवा अशी काहीशी अस्थिर अवस्था असते. डोक्यात विचारांचे थवेच्या थवे उडू लागतात. एका मागोमाग एक.. लयबद्ध .. शिस्तीने. एखाद्या उघड्या खिडकीतून कोणा काळाचे प्रतिबिंब उमटते. गुंतता- गुंतता विचारांचे विषयवार लेखन करावेसे वाटते. परंतु लिखाण होत नाही. लिखाण होणार नाही हे पुर्वानुभ्वे लक्षात घेता ; हे लक्षात आले असल्याचेही नमूद करण्याची नोंद मन घेते. आणि पुन्हा विचार ..आणि पुन्हा एक " गुंता "
माझ्या एक पेशंट सांगायच्या ; रोज संध्याकाळी आणि हटकून रविवारीच शिंका येतात. विचारांचे देखील असेच असावे. विचारांची शिंक रोज रात्री झोपताना येतेच ! आणि झोपेची तल्लफ भल्यामोठ्या मौषा रजित विचारांची उब अनुभवते.
गुंता हा मनुष्य जीवनाचा वगरे म्हणण्यापेक्षा रोजच्या रुटीन चाच भाग आहे असे म्हणावे लागेल. हवी ती गोष्ट , शक्य असलेली गोष्ट प्रत्यक्षात येताना दिसत नाही. हव्या त्या वेळेस हवे तसे वागता-बोलता येत नाही. अशापासून ते अनंत पराकोटीच्या तीव्रतेचा गुंता असू शकतो. आणि गम्मत म्हणजे गुंता नाही असे समजणार्यांची गुंता होण्यास सुरुवात झालेली असते हे जाणावे. प्रत्येक जण गुंतत जातो ; " आपल्या " गोष्टी शोधायला. माझे प्रोफेशन , शरीर शास्त्र सांगते कि शरीरात कमतरता किवा आभाव असणार्या गोष्टी शिरीरल्या हव्याशा वाटू लागतात. आजच्या भाषेत त्याला क्रेव्हिंग म्हणावे. लहान मुले / बालान्तिनीने तांदूळआतले खडे खावेत ; किवा पाटीवरची पेन्सिल खावी तसेच हे. मन धावत असते " आपल्या " हव्याशा गोष्टी मिळविण्यासाठी.
पूर्वी "आपल्या" गोष्टी आणि आपले व्यक्तिगत आयुष्य यांचा मेळ बसे. हे वाक्य आज अगदीच खोटे म्हणता येणार नाही. मात्र नाण्याच्या चांगल्या वाईट बाजू प्रमाणे यातील काही गोष्टीच्या अतिरेकीप्नामुळे वा इतर कारणांमुळे आज याच "आपल्या" गोष्टींचा मेळ आजकाल व्यायसायिक आयुष्याशी लागतो. कधीतरी एकत्र येणे , जेवणावळी , मेजवान्या , पार्ट्या यांची निमित्ते बदलत गेली. पुन्हा एकदा तोच मुद्दा - पर्सनल लीफ मधली स्पेस वाढवून माणूस सोशल होऊ लागला. तसा प्रयत्न करू लागला. सोशल लीफ वाढताना माणूस अधिकाधिक खुजा आणि एकाकी होऊ लागला. एकाच प्याला - रोज होऊ लागला.( ह्याला सोशल होण्याची लक्षणे म्हणतात! )
वाळू किवा रेती दाबल्यावर सुटावी अशी प्रत्येक नाती (..ओह ! "Contacts " म्हणायचे हो ! )विश्वाचा दाब पडतच मुठीतून काहीसे निसटू लागले. समाजासमोर दाखविण्यासाठी किवा काहींना आपला " अहं " जपण्यासाठी असे काहीसे गुंतागुंतीने वागावे लागले. भावनिक गुंतागुंत बाजूला ठवून व्यावहारिक म्हणविणारे सोशल होण्यासाठी अधिकाधिक आत्मकेंद्री होवून " स्व" मध्ये गुरफटले. झाले का ते "सोशल".... !!!??
अहम आणि प्रथमा विभक्ती च्या ग्रहणामुळे माणसे सोशल होत दुरावू लागली. हक्काची अनु , जी भोंडल्या पासून ते आत्याच्या जावेच्या मुलाच्या मुंजीत सुद्धा आपल्या बरोबर असायची... ती अनु कुठेतरी लुप्त होऊन गेली. चौकोनी कुटुंबातल्या चौघांचे चार मोबाईल जास्त जवळचे झाले. पण हक्काने , अगदी कोणताही विचार न करता काहीसे हसू-रडू शेअर करायला Contact List शोधून तरी कोणी सापडेल का ह्याचे उत्तर देणे जरा कठीणच !
खूप नैराश्यवादी किवा विरोधीप्क्षासारखे लिहिण्याचा उद्देश नव्हे. पण घरातला सौवाद खजा होत मूक करणारा सोशलपणा सध्या तरी प्रकर्षाने दिसतो आहे. परंतु खर्या अर्थाने सोशल, माणसे जोडून-जपणारी माणसेही आहेत. अनेकांच्या आयुष्यात असतील ! पण ती ओळखण्याची नैतिक जबाबदारी ओळखून वागणे , हा यामागील उद्देश. प्रगती केवळ पैशात तोलता येत नाही. माणूस म्हणून झालेली प्रगती आपण ओळखणे , आणि पुढच्या पिढीला अशा प्रकारचे एक्स्पोजर मिळणे काळाआड जाऊ नये यासाठी डोळसपणे सोशल होणे गरजेचे आहे. ज्याने - त्याने आपली आवड , गरज, उपयुक्तता , मानसिक लवचिकता जोखून स्वतःसाठी उपयुक्त ठरेल अशा प्रकारे सोशल ठरणे म्हण्त्वाचे.
सोशल साईट ला addict होणे, डिप्रेशन येणे , एकटे वाटणे, बोर होणे, सकारात्मक विचार्न्सार्नीचा आभाव , स्वतःच्या समस्यांची तीव्रता अधिक वाटणे, निराशावाद या सार्यांचे मूळ अनेकदा आपल्या सहज लक्षात येण्यापेक्षा काहीसे वेगळेही असू शकते. विरंगुळा हा गुन्हा नाही. पण "गुंता" फार वाईट. गुंतागूंत ....ते फक्त एक मानसिक Cycle नव्हे....It's a complicated "Web"....!
--Submitted by Diet Consultant
(6 September, 2012)
-----------------------------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली.कॉम)
----------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.02.2023-बुधवार.
=========================================