Author Topic: मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-85-गप्पा गणितज्ञाशी !  (Read 48 times)

Online Atul Kaviraje

  • Hero Member
  • *****
  • Posts: 8,903
                                   "मला आवडलेला लेख"
                                       लेख क्रमांक-85
                                  ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "गप्पा गणितज्ञाशी !"

                                 गप्पा गणितज्ञाशी ! --
                                -----------------

एका कॉलेजच्या विद्यार्थ्याला अजून तीन विषयांचे पेपर्स द्यावयाचे होते. अभ्यास झाला नव्हता. ज्ञानवर्धक गोळ्यांची जाहिरात त्याला वरदान ठरली. हा विद्यार्थी ताबडतोब जवळच्या मेडिकलच्या दुकानात गेला व अमुक अमुक कंपनीच्या गोळ्या आहेत का? याची विचारपूस केली.
"मला रसायनशास्त्राच्या गोळ्या हवेत.. "
काउंटरवरच्या सेल्समनने कपाटातून लाल गोळ्या दाखवत या गोळ्या "परीक्षेला जाण्यापूर्वी घेतल्यास तू सर्व प्रश्नांचे उत्तर लिहू शकशील. "
विद्यार्थ्याला ते काही पटले नाही. गोळीची चाचणी घेण्यासाठी त्यानी ती पटकन तोंडात टाकली. काही क्षणातच त्याच्या डोक्यात अणुरचना, प्रक्रियांचे समीकरण, व्हॅलन्स, कोव्हॅलन्स, बाँड, विकीरण... अशा गोष्टी तरंगू लागल्या.
"अद्भुत परिणाम..." विद्यार्थी आनंदित होऊन
"तुमच्याकडे इतिहासाच्या गोळ्या आहेत का?"
सेल्समनने शांतपणे एक निळी गुळगुळीत गोळी त्याच्या हातावर ठेवली. ती गोळी तोंडात ठेवून चिघळत असतानाच इतिहासातील राजे - महाराजे, सनावळ्या, युद्धाचे प्रसंग, तहनामा, बखरी इत्यादीनी त्याचे डोळे गच्च भरले.
"उद्या माझा गणिताचा पेपर आहे. गणिताची गोळी आहे का?"
"मला खात्री नाही. परंतु थांब, मी शोधतो."
कपाटाच्या कोपऱ्यातील एका बाटलीत काळसर अशी एकच गोळी शिल्लक होती. ही गोळी दिसायला विद्रूप, खडबडित असी काहीतरीच होती. विद्यार्थ्याला ती काही आवडली नाही.
"शी, असली कसली ही घाण गोळी..."
"ठीक आहे. नको घेऊस. तुझ्यासारखे अनेक जण असेच म्हणत गोळी न घेता परत गेले आहेत. गणित हे नेहमीच पचनी पडण्यास कठिण असते."

"अशा गोळ्यांचे पेटंट घ्यायला हवे. पुष्कळ पैसा कमवता येईल. पुन्हा भेटू" असे म्हणत डॉक्टर बाहेर पडले.

प्रश्न 1 चे उत्तर:
बीजगणितीय पद्धतीने याची मांडणी
43+क्ष = 2(16+क्ष) असे करता येईल.
समीकरण सोडविल्यास क्ष = 11 असे उत्तर येईल.
11 वर्षानंतर मुलाचे वय 27 व वडिलांचे वय 54 म्हणजे मुलाच्या वयापेक्षा दुप्पट होईल.

प्रश्न 2 चे उत्तर:
कदाचित विंबल्डनच्या टेनिस मॅचेसप्रमाणे जोड्यांचा हिशोब करत डोके खाजवत असाल. परंतु या स्पर्धेतील प्रत्येक डावात एक स्पर्धक बाद होणार व शेवटी एकही खेळ न हरता प्रत्येक डाव जिंकणारा विजेता ठरणार. त्यामुळे 14539 - 1 = 14538 डाव खेळल्या जातील.

अशा प्रकारे विचार करून उत्तर देण्यासाठीच्या पद्धतीला lateral thinking हे नाव आहे.

--प्रभाकर नानावटी
(February 28, 2013)
-----------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                     ------------------------------------------
 
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.01.2023-मंगळवार.
=========================================


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा वजा दहा किती ?  (answer in English):