तुम्ही आमच्याबरोबर आहात म्हणजे तुमचं आमच्यावर प्रेम असायलाच हवं! आणि, रोजच्या रोज 'माझं तुझ्यावर प्रेम आहे' हे सांगायला विसरू नका.
आम्ही मटेरिअलिस्टिक अजिबात नसतो. आमच्या पैशाने शॉपिंग करणं आम्हाला चांगलंच येतं. पण, ही शॉपिंग करताना तुम्ही आमच्याबरोबर असलं, तर बिघडलं कुठे? आम्ही जे काही खरेदी करतो, ते आम्हाला चांगलं दिसतंय, की नाही हे तुम्ही आम्हाला सांगावं एवढीच तर आमची इच्छा असते.
यू मस्ट हॅव गुड सेन्स ऑफ ह्युमर. इट्स मस्ट!
पुरुष म्हणजे कसा हिंमतवान मर्द गडी. आमच्या मनातली भिती काढून टाकणारा, इतरांपासून आमचं रक्षण करणारा असा धाडसी पुरुष त्याने असलंच पाहिजे.
कामावरून घरी दमूनभागून आल्यावर आम्ही तुमचं स्वागत करतो नं. मग, आमचा दिवस कसा होता एवढं तरी किमान विचारायला हरकत काय?
कधीतरी चुकूनमाकून आमच्यासाठी चहा, नाश्ता बनवला तर आम्हाला खूप आनंद होतो.
'कर्तव्या'च्या नावाखाली घरातली आणि तुमची सगळी कामं आमच्यावर थोपवू नका. स्वत:ची कामं स्वत: करता यायलाच हवीत.
भांडणं सगळ्यांचीच होतात हो. पण, किती काळ भांडत राहणार? म्हणूनच कोणती गोष्ट किती ताणून धरायची, ही अक्कल असलेली बरी.
तुमच्या दिसण्यापेक्षा तुमच्या स्वभावाचं महत्त्व आम्हाला अधिक असतं. त्यामुळे दिसण्यावर खर्च करतानाच माणुसकीची तत्त्वं अंगी बाणवायला विसरू नका.
आईवडिलांच्या जीवावर आणखी किती काळ मजा मारणार? स्वत:च्या पायावर उभं राहण्याची वेळ आता आली आहे, याकडे दुर्लक्ष करू नका. कुणाला इम्प्रेस करायचं, तर स्वकर्तृत्वावर काही अचिव्ह करून दाखवा.
Author Unknow