Author Topic: S . T . महामंडळातील काही मायकल शुमाकर  (Read 1403 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 806
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
                      S . T . महामंडळातील काही मायकल शुमाकर
                 लेख लिहायला मलाना काहीही विषय पुरेसा असतो. एखादी गोष्ट मनात घर करून बसली की झाले त्यावर काहीतरी लिखाण करायचे हे नक्कीच होते माझे. आता हा लेख लिहायचे कारण माहित नाही पण जेपण लिहीन ते तुम्हाला आवडेल हे खात्रीने मी सांगू शकतो. पण म्हणतात ना प्रत्येक गोष्टीला कारण हे असतेच. तर हा लेख लिहायचे कारण आहेत S . T . महामंडळातील काही चालक. आता तुम्ही म्हणाल यात काय लिहायचे लेखाच्या नावावरून कळतेच आहे की ते फास्ट चालवत असणार गाडी म्हणून.
                मला ही माहित आहे या एका ओळीतल्या गोष्टीला मी माझ्या शब्दात बांधून मांडेल तेव्हा तुम्ही नक्कीच म्हणाल वा काय लिहिले आहे.आता बघा ना अजून मुळ मुद्द्याला सुरुवात झाली नाही तरी किती लिहून झाले. बर बर आता जास्त पण पकवत नाही तुम्हाला. तर करूया सुरुवात
          मला जॉब लागला तेव्हा पासून माझा आणि  S . T . महामंडळाचा संबंध आला आहे. म्हणजे गेले ३ वर्ष मी S . T . महामंडळाच्या सेवेचा वापर करतो आहे. महामंडळात खूप चालक आहे जे आता ओळखीचे झाले आहेत , हो म्हणजे चालकाला ओळखून आम्ही समजतो ही आपली गाडी आहे ते. माझा प्रवास हा भिवंडी ते बोरीवली असा आहे रोजचा ज्यात साधारण १.५ तास हा लागतोच, म्हणजे हे एकदम सरासरी आहे बरे. हान आता ट्राफिक असेल तर मात्र २ तासाच्या वरच लागतो.
            काही चालक तर अक्षरशा वैताग आणतात त्या प्रवासाला , हो अहो ते इतके स्लो चालवतात की वीट येतो नुसता वाटते कधी पोचतो देव जाणे. आणि हे असे चालक २ तास घेतातच इच्छित स्थळी पोचवायला. खरतर आम्ही ना चालक बघून गाडीत बसतो कारण नंतर उगाच बोर होण्यापेक्षा न बसलेलेच बरे नाही का. पण कधी कधी नाईलाज असतो आमचापण.
           हान आता  S . T . महामंडळातील खरे हिरो ज्यांना आम्ही पायलट नाहीतर मायकल शुमाकर असे बोलवतो. अर्थात त्याला संदर्भ पण तसाच आहे. अहो हे पायलट न खरच कुशल आणि तरबेज आहेत गाडी चालवायला. हे सरासरी ज्या रोडने १.५ तास लागतो न त्याच रोडने १ तासाच्या आत गाडी आणतात बोला. आणि हे गाडी चालवत असताना तुम्हाला कितीही झोप आली असेल तरी तुम्ही झोपूच शकत नाही कारण ते इतके फास्ट चालवत असतात की कुठेतरी धरून बसावे लागते. ह्याला मागे टाक त्याला टाक करताना जी रेसिंग पाहायला मिळते ती वेगळीच आणि जोश भरणारी असते. जर तुम्ही कुठे धरून बसले नाही ना तर वळण मार्गावर बसल्या जागेवर आडवे झालात म्हणून समजा. आणि मुख्य म्हणजे यातल्या काहीना तर  २५ वर्ष गाडी कुठे न धडकावता वा ठोकता S . T . महामंडळामध्ये  सेवा केल्याबद्दल त्यांना बक्षीस मिळालेले आहे.           
            खरतर या गोष्टी तुम्हाला इतक्या महत्वाच्या नसतीलही पण माझ्या सारख्या रोज प्रवास करणाऱ्या मित्रांसाठी असेल कारण लवकर इच्छित स्थळी लवकर उतरणे सर्वात महत्वाचे नाही का. कालच मी फास्ट रेसिंग चा अनुभव घेतल्याने हा लेख लिहावा हे निश्चित झाले होते माझे. मला अशा आहे की तुम्हाला लेख नक्की आवडला असेल आणि तुम्ही हे वाचताना बोर झाला नसेल. चला परत भेटू नवीन विषयासोबत नाहीतर माझ्या कविता तर आहेतच तुमच्यासाठी. - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)


   


         

« Last Edit: March 10, 2012, 09:00:14 PM by हर्षद कुंभार »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline pomadon

 • Moderator
 • Jr. Member
 • *****
 • Posts: 140
 • Gender: Male
 • प्रमोद पवार...एक मनुष्य प्राणी...
धन्यवाद ........!!!!!!!!!!! :) :) :) :) :)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):