समुद्रावर जायला खूप आवडतं मला . फेसाळत्या लाटा ,भणाणता वारा , सरकती वाळू आणि क्षणाक्षणाला रंग बदलणारे असीम , अफाट आकाश .
सगळ्याचीच एक न ओसरणारी जादू पसरलेय मनावर . कायामसाठीच . कदाचित इतक्या जवळ समुद्र असुन देखील , आयुष्यात फार उशीरा बघितल्यामुळे असेल . आणि प्रथामाच बघितला तोही तुझ्या सोबतीने ,म्हणूनच कदाचित हे गारुड ओसरलं नसेल अजून . कुणास ठाऊक ?
थोडके काही दिवस गेले कि , मन उसळ्या मारू लागतं. अगदी लहान पोरांसारखा , “च्यल भुर्र” तसंच ..”चला समुद्रावर ”.काहीतरी अस्वस्थ वाटू लागतं .ही अस्वस्थता ,ही तळमळ आता फक्त समुद्राच्या दर्शनानेच थांबेल हे पक्कं माहित असतं.
मग सुरु होतं, ''चल न समुद्रावर " ,"जायचं?'' ,"आज जाऊयात न ?".जायचं, जायचं, अगदी जांयच्चचय.सातात्तच्या पाठ पुराव्याने तुही तयार होतोस. एखादी संध्याकाळ मग सोनेरी होऊन जाते. तू बाईक काढतोस .तू किक माराय्च्याही अगोदर मी उडी मारून मागच्या सीटवर बसलेली असते .तू हसून मान हलवतोस. मी एक हात तुझ्या खांद्यावर ठेवते .झाड झपाट्याने मागे पडू लागतात .रस्ता पुढे पळू लागतो .वाऱ्याचा वेग कानात भरायला सुरुवात होते.
" कतरा कतरा मिलती है
कतरा कतरा जीने दो
जिन्दगी है , बहने दो
प्यासी हूँ मैं , प्यासी रहने दो
रहने दो ना .. .."
ओठावर गाणं येतंच आपसूक .डोळे मिटू मिटू होतात. मी हट्टाने ते उघडेच ठेवते ,वर आकाशाकडे बघत बघत .
"कल भी तो कुछ एसा ही हुआ था
नींद में फिर तुम ने ज़ब छुआ था
गिरते गिरते बाहों में बची मै
सपने पे पाँव पड़ गया था
सपनों में बहाने दो ...."
क्षितिजावर उमटणारी नखभर चंद्रकोर माझ्याकडे हसून बघते .चटोर चांदणी डोळे मिचकावून दाखवते .मीही तिला डोळा घालते .
इतक्यात तुझे मऊ मऊ केस गालाला गुदगुल्या करतात. माझी बोटं तुझ्या पाठीवर आणखी रुततात .लाबवरन समुद्राची गाज ऐकू
येते. हलकस धुक जाणवायला लागतं. अंगावर अलगद शिर्शिरायला लागतं .
'' हलके हलके कोहरे के धुए में
शायद आसमान तक आ गयी हूँ
तेरी दो निगाहों के सहारे
देखू तो कहा तक आ गयी हूँ
कोहरे में बहाने दो ''
आणि.. आणि.. तो दिसतो .अचनक समोर उभा ठाकलेला.अखाच्या अखा.समुद्र . कधीपासून साद घालणारा . खुणावणारा .वाट पाहणारा .
आता तर पावलांना आवरण कठीणच असत .मी आवरतहि नाही.तू बाईक लावतोस कि नाही तोच मी उतरतेही .वळून तुझ्याकडे पाहत पाहत दगडांवरून उद्या मारत खाली पोचतेही.तुही येत असतोसाच.जपून.सुकी वाळू भसाभस चपलातुन पायांवर येत असते. मी चपला भिरकावून देते .धावत सुटते .सागराकडे. ओल्या वाळूची पुळण लागते.
ओलसर ,गार स्पर्श पायांना होतो.पावलं वाळूवर उमटत जातात . आणि शेवटी त्याचा स्पर्श होतो. उबदार . खारा तरी सुखावणारा.. पावलं बुडून जातात.लाटांवर लता येतंच राहतात .चुबुक चुबुक .एका लयीत .ती लय श्वासात भिनत जाते.पाणी पोटापर्यंत येत .पावलं डगमगायला लागतात . पण मन ऐकत नाही . हळूच म्हणत 'आहे, आहे,अजून पावलाखाली जमीन सुटली नाहीय '
"तुम ने तो आकाश बिछाया
मेरे नंगे पैरो में जमीन है
पाके भी तुम्हारी आरजू है
शायद अय्से जिन्दगी हसीं है "
तू? तू कुठहेस ? माझी नजर भिरभिरायला लागते .खरच कुठेय तू?तुझ अस्तित्व जाणवत का नाहीय ?अचानक एकट का वाटतं? तेदेखील भर समुद्रात ? कुठं तू? माझा जीव, माझा प्राण , माझा सखा?
आणि तू दिसतोस. किनाऱ्यावर. मोबाएलंवर काहीतरी टाईप करणारा दूर .कितीतरी दूर.किती कितीतरी दूर.
माझ्या मनापासून,माझ्याभावनापासून , माझ्या विचारापासून , माझ्या दुखापासून ,माझ्या अपमानापासून, माझ्या अवहेंलंनेंपासून,माझ्या अस्वस्थतेपासून ,.....माझ्यापासून....
खरच किती दूर आहेस तू माझ्यापासून .अशीच मी एकटी प्रश्नांच्या आवर्तात गळ्यापर्यंत बुडालेली असते .एकाकीपणे नाका तोंडात पाणी जाऊन गुदमरत असते .माझ्या प्रश्नांशी झगडत असते. हातपाय मारत असते . आणि तू उभा असतो दूर किनाऱ्यावर .त्रयस्थपणे .स्वतःच्याच विश्वात .
आता तो समुद्रही परका होतो .तुझ्यासारखाच . भणांण वारा कानात घोन्गावतो .डोळे भरून येतात .खऱ्या पाण्याने . गळ्याशी आवढा दाटतो .तोंडाला कोरड पडते.
"प्यासी हु मेँ ...
प्यासी रहेने दो.......
रहेने दो ना.... ..... "
- अनिता