Author Topic: खाद्यसंस्कृती टिव्हीतली  (Read 1193 times)

Offline designer_sheetal

  • Jr. Member
  • **
  • Posts: 64
जेवण हा माझा इतका जिव्हाळ्याचा विषय आहे कि या विषयावर मी कितीहि वेळ बोलू शकते. असं म्हणतात कि आपली भारतीय खाद्यसंस्कृती फार महान आहे...नाही आहेच ती पण जागतिक खाद्यसंस्कृतीही आता दुर्लक्ष करण्यासारखी राहिलेली नाही. परिपूर्ण जेवण कसं असावं हे  जगाने भारतीयांकडून शिकावं अन Presentation कसं असावं हे आपण त्यांच्याकडून शिकायला हवं. असं म्हणतात कि जेवणाने आधी डोळे तृप्त झाले पाहिजेत अन नंतर पोट. हाच तर ग्लोबल खाद्यसंस्कृती चा मूलमंत्र आहे.

जेव्हा पासून कुकरी शोज टेलीव्हीजनवर  यायला लागले, तेव्हापासून जागतिक खाद्यसंस्कृती अजून विकसित झाली. नाहीतर फॉरेनच्या भाज्या कुठे मिळत होत्या इथे...आणि मिळत असल्याच तरी क्वचित ठिकाणी. आजकाल प्रत्तेक गल्लीच्या टोकावर चेरी टोम्याटोज, ब्रोकोली, अवोकाडो सर्रास  दिसतात. इम्पोर्टेड भाज्यांसाठी आजकाल विशेष दुकानही सुरु झाली आहेत, विशेषकरून Malls मध्ये.  मागे एकदा Food Mall मधून मी २ भली मोठी लिंब आणली होती अन तीसुद्धा सीडलेस.. आपल्या ३ लिंबांच्या बरोबरीचं  ते एक लिंबू  होतं (७० रुपयांची २ लिंब आणली म्हणून आई ओरड्लीही होती मला :) ).  नंतरच्या खेपेस तिथे मला त्याहिपेक्षा  मोठाली लिंब पहायला मिळाली. काफिर लेमन नावाचा जो एक लिंबाचा प्रकार असतो तो दिसायला फार ओबडधोबड असतो पण चवीला फार strong असतो, त्याची पानंसुद्धा आपल्या काडीपत्यासारखी जेवणात वापरली जातात. शतावरी जी आपण केवळ पावडरच्या स्वरुपात पहिली होती त्याच शतावरीच्या शेंगा (asparagus) आजकाल सगळीकडे उपलब्ध आहेत ज्याचा salad मध्ये जास्ती वापर केला जातो. रेड करंट, ब्ल्याक करंट, ब्लू बेरीज हि नावं जी पुस्तकात वाचली होती तीही आपल्या मार्केट मध्ये दाखल झालेली आहेत.  नुसत्या भाज्या आणि फळच नाहीतर वेगवेगळ्या कुकिंग प्रोसेससाठी लागणारी भांडी आणि इलेक्ट्रोनिक्सच्या वस्तूहि आपल्या इथे मिळू लागल्या आहेत. यामध्ये टेलीव्हीजनचा खूप मोठा वाटा आहे. जर या गोष्टी कशा वापरायच्या हे जर सर्वसामान्य माणसाला समजल्याच नसत्या तर त्याची आवक सुद्धा वाढली नसती.

आपल्या इथे खानाखजाना पासून याची सुरुवात झाली असावी कारण इतरही कुकरी शोज होते पण popular अन प्रत्तेक घरात पोहोचलेला हाच एक tv शो होता...ज्याने कुकिंगची सगळी समीकरणच बदलून टाकली होती. तेव्हापासून लोकांना अलिशान व सुसज्ज किचन पहायची सवय (चटक) लागली. अर्थात जे जे चांगलं ते घ्यायची सवय कधीही चांगलीच. असल्या प्रोग्राम्समुळे आपल्याला फक्त देशोदेशीचे चटकदार पदार्थच पहायला मिळतात असं नाही तर त्यानिमिताने आपल्याला त्यांची एकंदर खाद्यसंस्कृती म्हणजे त्यांची किचन्स, किचनमध्ये वापरली जाणारी भांडी, त्यांच्या खाण्याच्या पद्धती आदी गोष्टींची माहिती मिळते. बर्याचवेळा हेही  पहायला मिळतं कि त्यांच्या आणि आपल्या बहुतेक डिशेसमध्ये बरेच साम्य आहे.. आपले copyright उकडीचे मोदक साउथ एशिअन countries मध्ये मोमोज म्हणून प्रसिद्ध आहेत. सारण जरी वेगळं असलं तरी त्याच जातकुळीत बसणारं. Noodles हा प्रकार chinese कुझींसमध्ये फेमस असला तरी आपल्या इथेही शेवया हा प्रकार फार पूर्वीपासून प्रचलित आहे...अन त्याचा आपण जास्त चांगल्या (आणि पौष्टिक) प्रकारे उपयोग करतो. तुर्कस्थान येथे प्रचलित असलेला बाबा गनुश नावाचा पदार्थ आपल्या वांग्याच्या भरीताशी बराच मिळताजुळता आहे. मोरोक्को मध्ये होणारा कुसकुस हा प्रकार आपल्या इथल्या पुलाव/ बिर्याणी सारखा आहे. तसंच थाई जेवणाची पद्धत आपल्या इथल्या केरळी आणि कोंकणी पद्धतीशी बरीचशी मिळती जुळती आहे.. ओला नारळ अन लाल मिरच्या हे त्यातले common elements . मलेशिया, थाईलंड येथे आपल्या सारखं दगडाच्या खलबत्यामध्ये वाटण वाटलं जातं.

माझी आई उत्तम केक करते ...एकदा अशाच एका फूड शोमध्ये तिने केकच्या रेसिपीमध्ये लेमन झेस्ट (लिंबाच्या सालीचा कीस) वापरताना पाहिलं..घरचा केक बेक होताना आधीच खूप छान वास येतो त्यात लिंबाच्या सालीने अजूनच चार चांद लावले (लिंबाच्या वासाने अंड्याचा वास येत नाही). एकदा माझ्या एका सिंगापूरच्या मित्राने मला चॉपस्टिक्स भेट म्हणून दिल्या होत्या. तेव्हापासून आमच्या घरातली बच्चे कंपनी चॉपस्टिक्सने म्यागी खाते:). अशा बर्याच गोष्टी असतात ज्या कधी आपण वापरलेल्या नसतात पाहिलेल्या नसतात. त्यासाठी तरी कुकरी शोज आवर्जून बघा.   
 शीतल  
http://designersheetal.blogspot.in, http://kaladaalan.blogspot.in/
 
 

Marathi Kavita : मराठी कविता


Kiran Patil

  • Guest
Re: खाद्यसंस्कृती टिव्हीतली
« Reply #1 on: January 21, 2013, 04:02:40 PM »
Chan lekh aahes