Author Topic: प्रेमाची परीक्षा  (Read 3496 times)

Offline pratik sonune

 • Newbie
 • *
 • Posts: 23
 • Gender: Male
 • wachan premi
प्रेमाची परीक्षा
« on: December 02, 2012, 09:29:24 PM »
एक मुलगा आणि मुलगी एकमेकांवर खुप प्रेम करायचे.मुलगा मुलगी दोघेही मध्यमवर्गीय घरातले होते.एक दिवस मुलगी त्या मुलग्याची प्रेमाची परीक्षा घ्यायची ठरवते.
तो जेव्हा तिच्या घरी येतो, तेव्हा ति बेडवर झोपलेली असते आणि त्याच्या हातात दिला जातो एक कागद...तो कागद दुसरा तिसरा काही नसुन तिला डॉक्टरांनी दिलेलं एक सर्टिफिकेट असतं ज्यात लिहीलेलं असतं की तिला कॅन्सर झालाय तिच्याजवळ फक्त 16 तासाचा वेळ शिल्लक आहे.ती त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यास खुप आतुर झालेली असते, पण तो काहीही न बोलता तसाच निघुन जातो. तिला वाटतं की बहुतेक त्याला कळलंय की हे सर्टिफिकेट खोटं आहे.
तो चार तासातच परत येतो आणि तिला म्हणतो,चल आणि पुढचे बारा तास मलाकोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारायचं नाही मी सांगेल तेच करायचं.असं सांगुन तो तिला घेऊन जातो,सकाळच्या नयनरम्य वातावरणात ती हिरवीगार झाडी आणि त्यावर पडलेलं दव,बाईकवर असतानाचा तो थंडगार झोंबणारा वारा याच्या आनंदाने ती खुपच शहारुन गेलेली असते.दोन्ही हात लांब करुन तो वारा कवेत घेण्याचा ती प्रयत्न करत असते.तिचा हाच आनंद त्याला हवा असतो.त्यानंतर तो तिला प्राणीसंग्रहालय ­ात घेऊनजातो तिने आधी न पाहीलेले कितीतरी प्राणी तिथे पाहीले आणि जे तिला खुप आवडले.थोड्या वेळानंतर तो तिला esselworld मध्ये घेउन गेला.water games,उंचच उंच पाळणे,जलतरण तलावअशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ती इतकी रमुन गेली की या जगाचं तिला भानंच नाही राहीलं,तिच्या चेहर्यावरचा ओसंडुन वाहणारा आनंद त्याला खुपच मोहुन जातो.
संध्याकाळचे सहा सव्वासहा वाजता तो तिला समुद्रकिनारी घेऊन जातो,तिने कधीही आधी न पाहीलेला सनसेट पॉईँट तो तिला दाखवतो. ते पाहुन ती हळुच त्याच्या मिठीत विसावते...तिथे दोघेही एकत्र फोटो काढुन घेतात ते फोटो तो तिची शेवटची आठवण म्हणुन स्वतःजवळ ठेवुन देतो.काही वेळानंतर ते शॉपिंगला जातात तिला जे जे आवडतं ते ते सगळं ते दोघे खरेदी करतात तो स्वतःसाठी मात्र काहीही खरेदीकरत नाही.रात्र झाली नंतर ते तिच्या घरी जातात. दिवसभराच्या मिळालेल्या आनंदाच्या वातावरणातुन ती थोडी बाहेर येते मग ती विचारात पडते की याने इतके पैसे आणले कुठुन? हाच प्रश्न ती त्याला विचारते. तो म्हणतो, तुझ्यासा ठी मी माझं घर विकलं. हे ऐकल्यावर तिचा खुप संताप होतो.आणि ती त्याला म्हणते,अरे पण का विकलंस तु घर?
तोःतुझ्यासाठी तुझ्याकडे आयुष्यातील फक्त सोळा तास शिल्लकआहेत, जेव्हा हे मला कळलं तेव्हा खरंतर रडावसं वाटत होतं, पण तुझे उरलेले आयुष्य तु फक्त आणि फक्त आनंदाने जगावंस असं मला वाटत होतं. आणि तो आनंद जर मला तुला द्यायचा झाला तर मला माझं घर विकावं लागेल याची जाणीव मला झाली. म्हणुनच मी माझं घर विकलं. आता हेच बघ ना आज दिवसभरात तुला दुसरी कशाची आठवण आली का? नाही नाहेच तर हवं होतं मला... हे ऐकताच तिच्या हातातुन शॉपिंग केलेल्या बॅग्झ खाली पडल्या आणि तिने त्याला मिठीत घेतलं.
ती म्हणाली,मला माफ कर.. प्लीज मला माफ कर मी तुझी दोषी आहे तु मला सांगशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे.
तोःकशाबद्दल?
तीःमी तुझ्याशी खोट्याने वागले.मला कॅँसर वगैर काही झालेला नाही मी तर फक्त तुझी परीक्षा घेण्यासाठी खोट बोलले,खोट्याने वागले मला माफ कर........

Marathi Kavita : मराठी कविता


संतोष कदम

 • Guest
Re: प्रेमाची परीक्षा
« Reply #1 on: December 05, 2012, 03:21:53 PM »
खूपच छान कथा आहे.
कदाचित निसर्गानेच दिलेल्या व्यावहारिकपणामुळे मुलींना आपल्याला सर्वच गोष्टींची परतफेड मिळायला हवी असे वाटत असेल. कारण ज्यावेळी एखादा मुलगा मुलीच्या प्रेमात पडतो तेव्हा तो तिला भावनिकतेच्या आरशातून पाहत असतो आणि त्यावेळी मुली मात्र व्यावहारीकतेच्या आरशातून त्याच्याकडून अपेक्षांचे इमले बांधण्यात रममाण असतात... नंतर मात्र कालांतराने परिस्थिती बदलण्यास सुरुवात होते आणि त्याच निसर्ग नियमाप्रमाणे मुलगा व्यावहारिक आणि मुलगी भावनिक बंध जपण्यास सुरुवात करते...
म्हनुनच ह्या गोष्टी सतत आणि कधीही न संपणार्या प्रवाहाप्रमाने घडतच राहणार....

छान मांडणी आहे.
धन्यवाद !!!

Offline pratik sonune

 • Newbie
 • *
 • Posts: 23
 • Gender: Male
 • wachan premi
Re: प्रेमाची परीक्षा
« Reply #2 on: December 09, 2012, 12:27:02 AM »
Praytek weli ase asel ase kahi nahi ...... Kahi weles doghe hi bhawnic astil...

supriya shinde

 • Guest
Re: प्रेमाची परीक्षा
« Reply #3 on: December 13, 2012, 06:01:04 PM »
but i think mulini aas karu naye....... :-*