Author Topic: काय वाटत?  (Read 1400 times)

Offline Madhura Kulkarni

  • Full Member
  • ***
  • Posts: 578
  • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
काय वाटत?
« on: December 14, 2012, 12:40:45 PM »
जीवनात इतर कोणी असो वा नसो, तुमचे घरचे म्हणजे परिवारचे सगळे लोक तुमची सोबत असतात.... अगदी कुठल्याही परिस्थितीत. त्यामुळे इतर कोणापेक्षाही कायम आपल्या परिवारावर जास्त प्रेम करा. सर्वात जास्त महत्व कुटुंबालाच द्या अगदी देवापेक्षाही जास्त.....कारण जेव्हा देवही पाठ फिरवतो तेव्हा सोबत असत ते फक्त आपल हक्काचं कुटुंब.....त्यामुळे मनातल सगळ जपून ठेवलेलं प्रेम, माया परिवारवाल्यांना वाटून टाका. तुम्ही लकी माणूस आहात, कारण तुमचा परिवार तुमच्या सोबत आहे ; हे कधीच विसरू नका. परिवार, त्यातली नाती, नात्यातली माणस कायम जपा......हे वाचल्यावर विचार करा आणि एक करा साऱ्यांनी....कि आपल्याला घरच्यांना खूप काही म्हणायचं असत....सॉरी, थॅक्यू, मिस-यु-दीदी...वगैरे वगैरे ते सगळ म्हणून टाका...मनात नका दडवून ठेवू......घरचे खुश होतील आणि तुम्ही सुद्धा.
Just try  it. 
« Last Edit: December 17, 2012, 03:17:20 PM by Madhura Kulkarni »

Marathi Kavita : मराठी कविता