Author Topic: एका ताऱ्याची भेट....  (Read 1246 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
एका ताऱ्याची भेट....
« on: January 27, 2013, 06:34:15 PM »
एका ताऱ्याची भेट....
 
मुंबई मध्ये राहणाऱ्या सर्वांनी कधी ना कधी एका तरी एकदातरी सेलेब्रेटीला पाहिलं असेल. तसं मीपण पाहिलंय पण ही भेट वेगळीच होती.
तर किस्सा असा आहे...
दिनांक : १७ - ०१ २०१३     
वेळ : ११.०० - ११.३० सुमारास
ठिकाण : गोरेगाव (पूर्व)  हब मॉलच्या मागील रोड.


           मी आणि माझे ऑफिसचे मित्र रोजनिशीप्रमाणे चहा पिण्यासाठी आलो होतो. त्याच रोड लगत चहाची टपरी आहे. तर आम्ही चहा घेत निव्वळ ऑफिसच्या महत्व नसलेल्या गोष्टींवर बोलत असताना एक गाडी आमच्या जवळ येवून थांबली. त्या गाडीतील व्यक्तीने आम्हाला हटकून
एका पत्त्याबद्दल विचारणा केली. अर्थात ती व्यक्ती त्या रोडवरील जवळचा एक पत्ता विचारत होती. आम्ही ५ मित्रांमधील मी आणि अजून एका मित्राने त्यांना प्रतिसाद दिला. माझा मित्र त्यांच्याशी बोलत असताना मला मात्र एक कोडं पडल यार यांना कुठेतरी पाहिलंय. आणि अचानक डोक्यात प्रकाश पडला
आणि थोडा पुढ होत त्यांना विचारलं तुम्ही " आशिष पवार " ना ? आणि त्यांनी " हो ". अरे सॉलिड म्हंटल आणि त्यांच्याशी हस्तांदोल करून त्यांना
नेमका पत्ता सांगितला आम्हाला जितका माहित होता. ते एका चित्रीकरण स्तळाबद्दल विचारत होते. ते घाईत असल्याने लगेच गेले. आणि आमचा ऑफिस चा तो विषय सोडून मग आम्ही "आशिष पवार " बद्दल बोलू लागलो, अर्थात जे लोक E -TV  वरील " Comedy Express " बघत असतील त्यांना कळले असेल " आशिष पवार " कोण आहे ते. पण छान वाटले तेव्हा खरच मराठी नटांमध्ये विनोदी जगतात " आशिष पवार  " याचं नाव खूप मोठ आहे. आणि त्यांच्याशी झालेली ही अचानक भेट खूप सुखद होती. - हर्षद कुंभार                       
 

Marathi Kavita : मराठी कविता