Author Topic: अबोल..  (Read 953 times)

Offline Rohit Dhage

 • Jr. Member
 • **
 • Posts: 221
 • Gender: Male
 • Show me the meaning of being lonely....
अबोल..
« on: May 17, 2013, 12:54:40 AM »
नाही रे.. नाहीच
तुझ्याशी बोलून काही फायदाच नाही
आणि काय बोलणार ग आता एवढं सगळं झाल्यावर
आता तर माझे इथले शेवटचेच १५ - २० दिवस राहिलेत
गेल्या ८ महिन्यात जे झालं नाही ते आता होईल असं वाटणंसुद्धा गुन्हा आहे
कधी स्वतःहून पुढाकार घेतला नाहीस कि कधी स्वतःहून बोलायला आली नाहीस
जेवढ्या वेळा पाहतो mobile लाच चिकटलेली असतेस
काय बोलायचं, काय करायचं.. साधा Sense of Humor नाही.
उगाच देखण्या चेहऱ्यावर १०० पोरं ओवाळून टाकावी अशी तुझी झालेली गत..
गत म्हण किंवा झालेला फायदाच म्हण.. कुणाचं सुख कशात असतं ज्याची त्याची व्याख्या
आणि आता जरी मी बोलायला आलो तरी दुसऱ्या दिवशी तुझे पहिले पाढे पंचावन्न सुरु होतील
तू.. तू नाही रे सुधारणार.. तुझं विश्वच ते
चूक खरचंच माझिये
तुझ्याकडून फालतू अपेक्षा ठेवत आलो
तू अशीच होतीस.. अगदी पहिल्यापासून
मीच १०० वेळा बदलत गेलो.
मी नक्की काय होतो याचा मागमूसही लागला नसेल तुला
Nyways..
जशी तुझी तडफड झालीये.. होतीये
इथेही same condition आहे
तुला तरी यातून सावरायला दुसरा alternative आहे
मला तोही नाहीये.. आणि कदाचित असताच तर मी एवढा वाहवत गेलोच नसतो
या खुशमिजाज चेहऱ्यामागं सारं काही लपवण्याची कला फक्त अवगत आहे मला
मला तर तू काही कष्ट घेणार नाहीस.. उंटावरून फक्त उसासे सोडत राहशील अगदी शेवटच्या दिवसापर्यंत हेही ठाऊक.
So, हे शेवटचे काही दिवस थंडीतापासारखे अंगावर काढायचे,
आणि शेवटच्या दिवशी सारं काही या टेबलावर सोडून जायचं..
पुन्हा कधीही परत न आठवण्यासाठी.

- रोहित

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: अबोल..
« Reply #1 on: May 17, 2013, 09:57:39 AM »
awadala lekh.... :)