Author Topic: गिलीची क्रिकेटमधून अखेर सांगता  (Read 740 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार


गिलीची क्रिकेटमधून अखेर सांगता

गिलख्रिस्ट एक असे नाव ज्याने विकेट कीपर या नावाभवती आपल वलय तयार केले होते. आस्ट्रेलिया मधून खेळणारा जरी गिली असला तरी जगभर तो लोकांचा चाहता होता हे सर्वाना माहित असेल , कारण तो खेळाडू सोबत एक चांगला प्रतिस्पर्धी म्हणून नावाजलेला होता. आक्रमक फलंदाजी आणि उत्तम
यस्टीरक्षण याचे समतोल उदाहरण म्हणजे गिली.
आज गिलीबद्दल लिहाव वाटल कारण IPL चा आज पंजाब आणि मुंबईचा सामना झाला . जो कि गिली चा संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीतला अखेरचा सामना होता. क्रिकेट कारकिर्दीत ज्याने Ball फक्त यस्टी मागे हातात घेतला आजवर, पण त्याने आयुष्यात प्रथमच गोलंदाजी करून पहिल्याच चेंडूवर बळी पण मिळवला. विलक्षण असा क्षण काहीसा भावनाप्रधान पण झाला. गिलीच्या या गोलंदाजीमुळे आज मला लिहावं असे वाटल त्यामुळे हा छोटासा लेख. गिलीला आपण सगळे नेहमीच मिस करू. - हर्षद कुंभार
[/size] [/size]