Author Topic: आनंदाचं झाड  (Read 1580 times)

Offline designer_sheetal

  • Jr. Member
  • **
  • Posts: 64
आनंदाचं झाड
« on: December 20, 2013, 05:14:15 PM »
दिवाळी झाली कि चाहूल लागते ती ख्रिसमसची. ख्रिसमस म्हणजे नवीन वर्षाची चाहूल अन नवं वर्ष म्हणजे पुन्हा सगळ्या सणांची नांदी. ग्लोबलायझेशनला सणवारही अपवाद राहिलेले नाहीत ते हि आजकाल ग्लोबल झालेत. आनंद साजरा करायला माणसाला आजकाल कुठलही निमित्त पुरतं मग ते जोशी आणि दांडेकरांनी आणलेला ख्रिसमस ट्री असो वा खानांनी आणलेला गणपती. आनंद हा फक्त आनंद असतो.

असो! तर हे ख्रिसमस ट्री ... नाही.. आनंदाचं झाड आमच्याकडे हळूहळू कसं रुजत गेलं ते कळलंच नाही. लहान असताना ख्रिसमस ट्री फक्त मी चर्चमध्ये किवा क्रिश्चन लोकांच्या घरी पहिले होते. ते इतके देखणे दिसायचे कि ते आपल्याघरीहि असावे असं मनापासून वाटायचं. म्हणूनच शाळेत असताना बोट भर लांबीचे चकचकीत ख्रिसमस ट्री मी दर ख्रिसमसला शोकेसमध्ये आणून ठेवायचे नंतर पुढे कॉलेज मध्ये असताना त्याची लांबी अर्धा फुटांवर गेली. ते छोटंसं झाड मी खिडकीवर सजवून ठेवायचे. ते हि कापूस किवा घरी सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंनी. तेव्हा सजावटीसाठी खास खर्च करणं माझ्या पौकेटमनीला परवडणार नव्हतं. पण तरीही ख्रिसमस च्या दिवसात ते आजूबाजूला असणं हीच पुरेशी गोष्ट होती माझ्यासाठी. हळूहळू त्याच्या असण्याची सवय घरच्यांनाही झाली आणि झाडाची उंची वाढतच गेली. सध्या अडीज तीन फुटाच झाड आमच्या hall  मध्ये दिमाखात उभं आहे.

ख्रिसमस ट्री सजवायचा हा हि एक मोठा सोहळा असतो आमच्याकडे.... डिसेंबरच्या ५/६ तारखेलाच ते अडगळीतून बाहेर काढलं जातं (अहो पेशन्स कोणात आहेत एवढे २०/२५ पर्यंत थांबायचे) मग ते त्याच्या नेहमीच्या जागी विराजमान झालं कि त्याची सजावट सुरु होते. सजावटीसाठी सुद्धा हल्ली मार्केट मध्ये इतक्या छान छान वस्तू आल्यात कि कोणती घेऊ आणि कोणती ठेवू हा प्रश्न पडतो. असो! तर आधी मी त्याला दिव्यांचे तोरण गुंडाळून घेते म्हणजे त्यातल्या वायरी वर दिसत नाही...मग त्यावर ४/५ झगमगीत माळा चढवल्यावर ते इतकं रुबाबदार दिसू लागतं कि घरात येणारा प्रत्तेक माणूस "वाव" म्हटल्याशिवाय पुढे जात नाही. त्यावर मग छोट्या चांदण्या, रंगीत बॉल, बेल्स लावल्याकी आमचं आनंदाच झाड सज्ज होतं.. येणाऱ्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी!

आमचं आनंदाच झाड आता मोठं झालं असलं तरी मौल्स आणि हॉटेल्स मधले मोठाले ख्रिसमस ट्रीज पहाता त्याला उंच व्हायला अजूनही बराच स्कोप आहे आणि येत्या काही वर्षांत त्याची उंची ५ ते ६ फुटांवर जाइल याची काळजी मी नक्की घेणार आहे.

शीतल

http://designersheetal.blogspot.in
http://kaladaalan.blogspot.in
« Last Edit: December 20, 2013, 05:17:14 PM by designer_sheetal »

Marathi Kavita : मराठी कविता