Author Topic: विचार  (Read 1809 times)

Offline kavita.sudar15

  • Newbie
  • *
  • Posts: 28
विचार
« on: February 10, 2014, 08:02:16 PM »
विचार हे दोन प्रकारचे असतात एक चांगले आणि एक वाईट, आपण कधी एकटे असलो ना कि दोन्ही विचार मनात अगदी नकळत येउन जातात...... का कुणास ठाऊक पण आपण नेहमी चांगले विचार हे जास्त मनात ना आणता वाईट विचारांचा जास्तीत जास्त विचार करतो खरे आहे ना मित्रानो, खरे तर वाईट आणि चांगले विचार हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, लहान मुले कशी काटा छापा असे खेळत असतात तसेच काही आपण आपल्या विचारांशी खेळत असतो...... खेळताना हे विसरून जातो कि आपण आपल्या भूतकाळातील चुकांकडे पुन्हा एकदा डोकावून पाहत आहोत, त्याच आठवणी त्याच चुका, आणि त्याच जखमा असे हे चक्र आपण स्वताभोवती गुंफत असतो, हो ना! खरतर आपण जर ठरवले ना तर ते आपणच टाळू शकतो, आता कसे तर याचे उत्तर आपल्याच प्रश्नात असते......
आपण मनातूनच ठरवलेले असते कि आपण जुने विसरायचे नाहीच, पण मित्रानो असे करून आपण स्वताला किती शिक्षा देत असतो याचा आपण कधी विचार केला आहे का? नाही कारण आपण चिंततो मनी एक तर कसे प्रसन्न चित्त राहील. एकदा जर ठरवलेच आहे कि पुन्हा मागे वळून नाही पहायचे तरी नजर मागे का वळते? पावूल मागे का सरकते? कारण जबाबदार आपणच असतो आपण कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का कि आपण म्हटले कि हा विचार आज पासून करायचा नाही तर आपण तोच विचार जास्त करतो, कारण आपल्या ध्यानी मनी तोच एक विचार घोळत असतो.
त्याच गोष्टीने खूप आपण काळजीत असतो, मग जर आपण एक गोष्ट विसरू शकत नाही तर आपण असे ठरवायचे मनाकडे कि आपण असे केल्यावर चांगले कसे घडेल आणि जर चांगले करायचे आहे तर चुका कशा टाळू शकतो हे ठरवले तर कदाचित आपण थोडे सावरू शकतो, मी म्हणत नाही कि भूतकाळाला विसरावे पण त्या भूतकाळाला आपली कमजोरी न बनवता त्याला ताकद बनवून नवीन बदल कसे करू शकतो हे विचारात आणि कृतीत उतरावे, नक्कीच थोडा तरी फरक जाणवेल हि माझी
खात्री आहे........
विचार हे सर्वांनाच असतात मित्रानो पण त्या विचारातून चिंताग्रस्त न होता आपण येणाऱ्या भविष्याचा मार्ग सुकर करण्याचा नक्कीच एक प्रयत्न करू....... @ कविता @

Marathi Kavita : मराठी कविता


Offline drchandane

  • Newbie
  • *
  • Posts: 2
  • Gender: Male
Re: विचार
« Reply #1 on: March 19, 2014, 05:58:07 AM »
या दोन विचारांवर आता मला आणखी विचार येत आहेत.  ::)

खूप छन विचार आहेत तुमचे  :)