Author Topic: टीचभर पोटासाठी-भाग -१  (Read 1243 times)

Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..
टीचभर पोटासाठी-भाग -१
« on: February 20, 2014, 08:08:03 PM »
[या स्टोरीचा कुणाच्याही व्यक्तिगत आयुष्याशी कसलाच संबंध नाही. आणि काही ठिकाणी वापरलेले शब्द थोडे वेगळे जरी असेले तरी प्रसंगानुरूप आहेत… आपला अमुल्य अभिप्राय जरूर कळवा ]

वातावरणात एक भयाण शांतता पसरली होती. बाहेर अंगणातबरेच लोक जमली होती. अन छपराच्या घरात मोडकळीला आलेल्या बाजेवर फाटक्या-तुटक्या सतरंजित एक बाई निपचित मरून पडली होती. तिचे तीन बछडे तिला बिलगून मोठ्यामोठ्याने रडत होते. त्यांच्यातील सर्वात थोरली मुलगी पूजा आपल्या भावंडांना सावरण्याचा प्रयत्न करत होती लहानपणीच बाप आणी आता आई सोडून गेल्यामुळे ती सुद्धा पार खचली होती. काळाने केलेला हा आघात त्या 18 वर्षाच्या मुलीला सहन होण्यासारखा नव्हता पण आपल्या लहान भावांकडे बघून ती कसबसं रडू आवरत होती. ज्या आईने आयुष्यभर आपल्यासाठी कष्ट उपसले तिच्या देहाला निट अग्नी देण्याइतकाही पैसा आपल्याकडे नाही, ही गोष्ट पूजाच्या मनाला खात होती. शेवटी कुणीच पुढ आलं नाही म्हणून ग्रामपंचायतीची गाडी बोलवून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती.

आईच्या जाण्यानंतर घराची व भावंडांची जबाबदारी पूजावर येऊन पडली. त्यामुळे तिने आपल पुढचं शिक्षण थांबवल व घर चालवण्यासाठी शेजारच्याच चाळीत दोन-चार घरी धुण्या-भांड्याची काम करू लागली. त्यामधून मिळणाऱ्या पैशातून ती घर व भावंडांच्या शिक्षणाचा खर्च भागवू लागली. असेच दिवस चालले होते. एक दिवशी पूजा कामाला जात असतांना शेजारच्या गल्लीतल्या मोठ्या शेठने तिला बोलावलं व म्हंटला की "मी तुला दररोज इथून जातांना बघतो ,तू शेजारच्या घरी काम करतेस ना ?, किती पैसे मिळतात तुला ?' त्यावर पूजाने घाबरत घाबरत सांगितल कि घर चालवण्या इतपत भेटतात साहेब.! त्यावर तो साहेब म्हणाला की मी शहरात नौकरी करतो,जर तुला जास्त पैसे मिळवायचे असतील तर तू माझ्यासोबत शहरात चल, मी माझ्या ओळखीने तुला मोठ्या घरची काम बघून देईल आणि मग एका महिन्यानंतर तुझ्या भावंडांना पण शहरात घेऊन ये आणि चांगल्या इंग्लिश स्कूल मध्ये शिकायला टाक" यावर पूजा म्हणाली "साहेब पण मी शहरात कामाला गेले तर माझ्या भावंडांना कोण सांभाळणार ?" मग साहेबांनी तिला सुचवलं कि एक महिन्यासाठी तुझ्या भावंडांना आश्रमशाळेत टाक मग नंतर पैसे आल्यावर तर तू त्यांना शहरातच घेऊन जाणार आहेस ना !

ठरल… !! उद्याची उदात्त स्वप्ने घेऊन पूजा एका दिवशी शहराकडे निघाली. जाता जाता त्यांना संध्याकाळ झाली म्हणून साहेब तिला म्हंटला कि आजची रात्र आपण माझ्या घरी थांबू मग उद्या सकाळी मी तुला नवीन काम दाखवायला घेऊन जाईल. तिला आपल्या घरात सोडून साहेब बाहेर कुठे तरी निघून गेला आणि उज्वल भविष्याची स्वप्ने रंगवता रंगवता तिला कधी झोप लागली कळलंच नाही. रात्री बाराच्या सुमारास दारावर अचानक धाड-धाड असा आवाज झाला. पूजा घाबरून उठली आणि "कोण आहे?" म्हणून विचारल तर दारावर साहेब आलेला होता म्हणून तिने दार उघडल आणि तो आत आला. त्याला दारू प्यायल्यामुळे निट चालता येत नव्हत,कसाबसा तो दिवान पर्यंत गेला आणि आडवा झाला. पूजाला काय चाललंय काहीच कळत नव्हत. मग साहेब तिला म्हंटला "पूजा इकड ये, आपण थोडा वेळ गप्पा मारू" म्हणून ती त्याच्या जवळ जाऊन बसली. थोडा वेळ गेल्यानंतर अचानक त्याने तिचा हात धरला, ती भेदरली भीतीने थरथरू लागली. साहेबाला हात सोडण्यासाठी विनवणी करू लागली. पण सगळच निष्फळ. शेवटी तिने आरडओरडा करायला सुरवात केली तर त्या साहेबाने तिला मारहाण केली. आणि शेवटी जे नको तेच झाला अजून एक अबला एका नराधमाच्या बळी पडली.

शब्द मर्यादेमुळे पुढील कथा स्वतंत्र भागात पोस्ट केली आहे नक्कीच वाचा......


@सतीश भूमकर....
19.02.2014
« Last Edit: February 20, 2014, 08:09:09 PM by सतीश भूमकर »

Marathi Kavita : मराठी कविता

टीचभर पोटासाठी-भाग -१
« on: February 20, 2014, 08:08:03 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):