Author Topic: श्रीहरी विष्णूंचे बावीस अवतार  (Read 1599 times)

Offline pomadon

 • Moderator
 • Jr. Member
 • *****
 • Posts: 140
 • Gender: Male
 • प्रमोद पवार...एक मनुष्य प्राणी...

  ***** सांस्कृतिक भारत *****
       श्रीहरी विष्णूंचे बावीस अवतार
 श्रीहरी विष्णू हे पृथ्वीवरील सकल प्राणीमात्रांचे पालनकर्ते.
 विधातानिर्मित सर्वोत्कृष्ठ प्राणी मानव हा पृथ्वीवरील निवासी.
 तो सदाचरणी,सत्यप्रिय,सुसंस्कारित असावा.
 त्याचे शांत आणि संयमी जीवन परस्परपूरक असावे.
 मानववंश परस्परप्रेमाने वृद्धिंगत व्हावा,त्यातच सर्वांचे कल्याण आहे.
        
  हा विष्णूंचा दृष्टीकोन स्वार्थासाठी सज्जनांना छळणार्‍या दुराचारी,
उन्मत्त,पापी असुरांना अर्थातचं घटक वाटतो. त्यांच्या अत्याचारांची
परमाधवी होते आणि सामान्य जणांच्या तोंडून आर्त हाक उमटते.
 "प्रभू,आता अवतार घ्या" कोटी कोटी जनतेची हार्दिक इच्छा श्रीविष्णूंच्या
कानी पोहोचते आणि धर्मसंस्थापन व्हावे म्हणून श्रीहरी अवतार घेतात.

  श्रीहरी विष्णूंच्या बावीस अवतारांचा जनसामान्यांना संदेश

१) सतनकुमार :- ब्रम्हचर्यव्रत पालनाने अंत:करण शुद्ध होतो.

२) वराह :- संतुष्ट्वृत्ती जीवन सुखी-समृद्ध बनविते.

३) नारद :-अन्याय निवारण करून सकल कल्याणार्थ वाणीचा सदुपयोग.

४) नरनारायण :-विकार,वासनांतर नियंत्रण ठेवून संयमी जीवन जगावे.

५) कपिल :-'स्व' रूप जाणावे आणि आत्मज्ञान प्राप्त करावे.

६) दत्तात्रय :-गूननीत होऊन इतर प्राण्यांकडून ज्ञान प्राप्त करावे.

७) यज्ञ :-शत्रू-मित्र भेद न ठेवता सर्वांसाठी कपटरहित व्यवहार.

८) वृषभदेव :-संयमात जीवनाचा खरा आनंद उपभोगता येता.

९) पृथु :-क्षुधाशरणार्थ आवश्यक असलेले अन्न सर्वांना उपलब्ध करून द्यावे.

१०)मत्स्य :-वेद हे संस्कृतीचे अमूल्य धन त्यांचे रक्षण व प्रसार करावा.

११) कूर्म :-स्वत: अपार कष्ट सोसून संघटीत प्रयत्नांना सहकार्य करावे.

१२) धन्वंतरी :-नियमन जीवनासाठी सर्वांना साहाय्य करावे.

१३)मोहिनी :-संयमाने विकारवासनांचे शमन करावे.

१४)नृसिंह :-सामार्थ्य्शालीबाणून दीन दुर्बलांचे सहाय्य करावे.

१५)वामन :-संस्कृती रक्षणार्थ संघटीत प्रयत्न उपयुक्त ठरतात.

१६)परशुराम :-राष्ट्र रक्षणार्थ क्षात्रतेज आणि ब्रम्हतेजाचा समन्वय आवश्यक.

१७)व्यास :-ज्ञानमंदिरांची विभिन्न दलानेसार्वांसाठी मुक्त असावीत.

१८)राम :-राष्ट्रव्यापी आंदोलनास सामान्यजन सहयोग आवश्यक असतो.

१९)बलराम :-राष्ट्रनायकांचे हितचिंतक बनून सर्वतोपरी सहकार्य करावे.

२०)श्रीकृष्ण :-जाती-धर्म वर्ग विरहीत, अपेक्षा रहित प्रेम सर्वांना द्यावे.

२१)बुद्ध :-तृष्णा त्यागाने जीवन सुखी होते.

२२)कल्की :-आडंबररहित परोपकारी वृत्तीने संघटन उभारावे.
« Last Edit: September 21, 2009, 02:53:38 AM by pomadon »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
good.......thanks for sharing