Author Topic: जीव धन्य करणारा जीवधन  (Read 758 times)

Offline prathamesh.manmode

  • Newbie
  • *
  • Posts: 44
जीव धन्य करणारा जीवधन
« on: July 08, 2014, 02:33:00 PM »
जीव धन्य करणारा जीवधन,

मी पाहिलेल्या किल्ल्यापैकी या किल्ल्याचा अनुभव थोडा वेगळाच होता, किल्ला नाणेघाटात वास्तव्यास आहे. बुलंद बळकट असा हा किल्ला जणू मनाला भुरळ घालणारच आहे,
मी जेव्हा किल्ल्याची माहिती वाचली मनात आले असा किल्ला सर करायलाच हवा क्षणाचा विलंब न करता तयारी चालू केली, मित्रांशी संपर्क साधून किल्ल्याबद्दल सांगितले मित्रही लगेच तयार..

पुढे दिवस ठरला निघालो ट्रेकर्स ची पंढरी कराया
किल्ल्यावर जाण्यासाठी घाटघर गावातून जाणारी वाट निवडली स्वनुभवानुसार हि वाट मध्यम श्रेणी ची म्हणता येईल. किल्ल्याचा आकार आयताकृती आहे आणि सोबतीला पेहरेदार वांदरलिंगी सुळका लक्ष वेधणारा आहे

उन्हाचा तडाखा होता म्हणून लवकरच चढाई चालू करायचे ठरवले पण काही कारणास्तव थोडा उशीरच झाला किल्ल्याची चढाई चालू केली, वाट थोडी सोपी आणि सोयीस्कर असली तरी २-३ ठिकाणी गिर्यारोहण (रॉक क्लाइंब)  करावे लागते आणि त्या साठी आम्ही साधन सामग्रीही सोबत बाळगली होती. पहिल्यांदा तर वाटेने थोडा घोटाळाच केला पण काही वेळानंतर वाट लक्षात आली आणि सर सर चढाई चालू केली १ तास चढाई करून किल्ल्याच्या गिर्यारोहणाच्या (रॉक क्लाइंब) भागापर्यंत पोहोचलो तिथे चढण्यासाठी थोडे जास्तच कष्ट लागले.. पुढे जाऊन राजदरवाजा नजरेस पडला..  दरवाज्याने गडावर पोहोचल्यावर समोरच गजलक्ष्मीचं शिल्प आहे तिथेच आसपास पाण्याची टाकी आहे आणि ते पाणी पिण्याच्या वापरातही येते गडाच्या अंतर्भागात एकात-एक अशी पाच-सहा धान्य कोठारे आहेत. कोठारीच्या अंतर्भागात विलक्षण असे कोरीव काम केले गेले आहे दक्षिणेस जीवाई देवीचे मंदिर आहे पण मंदिराची अवस्था बिकट होती गडाच्या माथ्यावर पोहोचलो तिथे थोडा आराम केला आणि पुढच्या  वाटचालीस लागलो काही अंतर सर केल्यावर आपण गडाच्या एका टोकाला जातो आणि समोरच जो २ हजार फूटांचा वांदरलिंगी सुळका पहिला मी तर पाहून थक्कच झालो आन काय तो नानाचा अंगठा तोही असा रुबाबदार उभा हरिश्चंद्रगड, हडसर, चावंड हे स्वराज्यातील प्रमुख किल्ले हि नजरेस पडले असा काही सह्याद्रीचं रुपडं पहिला कि सह्याद्रीवर जीव ओवाळून टाकावासा वाटतो...
तिथून पुन्हा गडाच्या माथ्यावर आलो थोडा आराम केला भगव्याला मुजरा करून आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अल्काब करून पुन्हा परतीच्या वाटचालीस लागलो..     

Marathi Kavita : मराठी कविता