Author Topic: कटु सत्य  (Read 1995 times)

Offline Rahul 741

  • Newbie
  • *
  • Posts: 5
कटु सत्य
« on: September 01, 2014, 03:02:16 PM »
व्हाट्सअपच्या ग्रुप मधे पोरांच्या वायफळ
गप्पा चालु असताना त्याच ग्रुप
मधील एकाचे वडिल समोरुन
येताना दिसतात, ज्याचे वडिल आहेत
तेच पोरग म्हणत "आमचं म्हातारं आल
बघ". यावर सगळे जण हासतात. तो पण
हासतो कारण त्यानं मोठा जोक
मारलेला असतो. वडिल नजरे आड
होतात
. पुन्हा यांच्या गप्पा सुरु होतात,
तोच तिथून एका भ्रष्ट व
चारित्र्यहिन
नेत्याची गाडी निघालेली असते.
मगाशी ज्या मुलानं
जन्मदात्याला म्हातारा म्हणून
संबोधल होतं तेच पोरग
त्या चारित्र्यहिन नेत्याला "आपले
साहेब निघाले बघ" अशा गोंडस
शब्दात संबोधतं
तेव्हा त्या हरामखोराला सगळे
ग्रुपवाले
उत्स्फूर्त प्रतिसाद देतात.
शिव-शंभुंच्या या महाराष्ट्रात
जन्मदात्या वडिलांना म्हातारं
आणि लायकि नसलेल्याला साहेब
म्हणनार्या आवलादी जन्मतात याचचं
दु:ख आहे.
घडलेली अन् मी अनुभवलेली सत्य
परस्थिती आहे ही.
वडिलांनी लहान पणीच हातात
शिवचरित्र-शंभुचरित्र दिलं असतं तर
आज ही वेळ त्यांच्यावर अन्
या मातीवर कधीच आली नसती.
॥जय शिवराय॥

Marathi Kavita : मराठी कविता