Author Topic: शोध आणि बोध  (Read 832 times)

Offline virat shinde

  • Jr. Member
  • **
  • Posts: 82
शोध आणि बोध
« on: October 17, 2014, 09:41:20 AM »

माझ्या जिवंत ह्रदयाच्या व शाबूत डोक्याच्या मित्र-मैत्रीणींनो..
      मला याची पुरेपूर जाणीव आहे की प्रेम हे नात, हा बंध, हा अनमोल जिव्हाळा व त्यातून निगणार्या शब्दांचा हंबरडा अविरत आहे. मित्रांनो आपण प्रेमावर, भ्रमनिरास करणार्या कल्पनांवर, विद्रूपतेवर, अंधश्रध्देवर, अविवेकावर, व अज्ञानावर ईतक सार लिखान केलय व ते सार लिखान बहुतांशी अज्ञानरचनेला वाढवनार आहे. सद्यस्थितीत पहता प्रेम वा ईतर कुठल्याही विषयाची व्याख्या नेमकी कोणती ही द्विधा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आशा अनभिन्न लिखाणा मुळे अज्ञानरचनेचा प्रसारक वर्ग एका उच्चतम पातळीवरून बहुतांच्या भावनेशी खेळ खेळतोय. ज्यामुळे जात्यातून दाने रगडावे तसे बहुतांचे अचार, विचार व भावना रगडल्या जात आहेत. आणि बहुतांतील सुज्ञ मंडळी या अज्ञानरचनेच्या गुलामीत चाकरी करण्यात धन्यता मानता. म्हणून बहुतांनो आपण आपल्या समाजाचा विचार कधी केला का?  आपला समाज कुठल्या ठोकरा खतोय कधी न्याहाळत आहात का? या अज्ञानरचनेचा मुख्य सुत्रधार कोण हे कधी शोधलय का? या मागचा त्याचा हेतू काय आहे याचा कधी अंदाज मांडलाय का? या चौसुत्री प्रश्नांच्या उकलेतूनच तुम्ही खर्या स्वातंत्र्य अवस्थेची अनुभूती कराल. इथे "स्वातंत्र्या" या शब्दाचा उल्लेख करण्याच कारण बहुतांनो आपला समाज कधीच "जाणं आणि भाणं" हरवून बसलेला आहे. मानवतेच्या साखळ्या कधीच पसार झाल्या आहेत, जिव्हाळा या शब्दास मानवाच्या डिक्शनरीत जगा मिळत नाही. आपुलकीचा र्‍हास झाला आहे. समतेच्या बोंबा मारणारेच समता तोडीस आणताहेत. प्रेम म्हणजे फक्त लफडच झालय. प्रेमाचा गोडवा कधीच कडवट झालाय. माणुस या शब्दाचा अर्थ बदलला आहे. मनवतेचा बलात्कार होत आहे. मनवाची धडपड मानवते कडे नसुन सैर-वैर अज्ञानी काळोखाकडे आहे. गुन्ह्यांची वाढ पुलीसस्टेशनचेच रेकॉर्ड वाढवत जातोय. धर्मांधता, जातीभेद व वर्ण व्यवस्थेने राक्षसी थैमान मांडले आहे.
अज्ञानरचना बळकट झाली आहे. ज्ञानरचनेला इथे थारा नाही. माणस परागंधा झाली आहेत. जगण्यासाठी मरायच आणि पोटा भांडायच एवढाच त्यांच्या जगण्याचा उपक्रम बनवला आहे. आणि हे सार अज्ञानरचनेच कर्तृत्व आहे.  आपल्या देशातील सत्ताधारी वर्गाने कधीच अज्ञानरचनेची प्रोग्रामींग बहुतांच्या डोक्यात ईन्स्टॅल केली आहे. आता त्या प्रोग्रामला अणईन्स्टॅल करणं अशक्यच झालय. कारण यानी आज्ञानरचनेचा व्हायरस ईतका पसरवला आहे कि त्यामुळे बहुतांचे सॉफ्टवेअर हँग झाले आहेत. त्यानी खुप जुनाट व कुळचट भ्रमक गोष्टींचे आसे जाळे निर्माण केले आहे ज्यात बहुतांना अडकवल आहे. यामुळे ते प्रगती पथावर आणि आम्ही मागासच राहीलो.
           या बांडगुळांना धडा शिकवन्या साठी बहुतांनो उठा जागेव्हा शिक्षणाने प्रगती साधा. शिक्षित झालात तरच विकशीत व्हाल. आज्ञानरचनेला झिडकरून आपण ज्ञानरचनेचे पाईक व्हावे. आपल्या समजास प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, समता, एकोपा व माणुसकी या गुणांचा सुगंध द्या. खळखळनार्या जर्याचा खळखळाटाचा आनंद घ्या. आज्ञानाला लाथाडुन विज्ञानाकडे माथा न्या. आंधाराकडुन उजेडाकडे प्रवास करा. जित आपलीच होईल हे बहुतांनो लक्षात घ्या. माझा या मागचा उद्देश बहुतांना सत्य असत्याची जाण करून देण्यासाठी आहे. कारण सत्य ही आशी मिरची आहे जि कोसो दुरवरच्यालाही झोंबते. त्यामुळे हे सुज्ञ बहुतांनो तुमच्या लेखनीला धार येउद्या पण ती बहुतांच्या हितगुजासाठी असवी. बहुतांना ती आंधारातून प्रकाशकडे घेउन जाणारी असावी. हिच वाट बहुतांनी चालावी व यश शिखरावर मजाल मारावी.


लेखक-विराट शिंदे.  (9673797996)

« Last Edit: October 19, 2014, 02:41:55 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता

शोध आणि बोध
« on: October 17, 2014, 09:41:20 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):