नातं म्हणजे चांदण..जसा रात्री पडणा-या चांदण्यात
एकटा चंद्र दिसतो ना तस काही आपण असतो इतके जवळ असुनही भरवसाचं कुठलच
चांदण नसतं त्याच्यासाठी...आणि हे चांदण म्हणजे तु करत असलेल्या प्रवासात
तुला क्षणभराची..काही काळापुरती सोबत..मग ते कुठलही असो आइ-बाप,
भाऊ-बहीण, मित्र-मैत्रीणी, प्रेयसी-बायको, मुलं-बाळं, आणि बरेच काही
..एका ठराविक वेळेपुरते ही आपल्याला या प्रवासात कंपनी देतात, आपल्या
सोबत हसतात, रडतात, जगतात, त्यांनाही आपला प्रवास असतो रे..आपण फ़क्त ती
सोबत एंजॉय करायची...सुख: दुख: वाटुन घ्यायचे..जशी तुलाही त्यांची गरज
असते तशी त्यांनाही तुझ्या सोबतीची गरज असते..
त्यात गुंतण, न गुंतण हे सर्वस्वी तुझ्या हातात असतं, तुझ्या
म्हणण्यापेक्षा तुझ्या मनाच्या हातात...!! मी बघ तसच करतो...अरे आज आहे
उद्या नाही, कशाचाही भरवसा नसतो हे शापित सत्य आहे मित्रा..आपलं इथ काही
नसतं ना कुठली वस्तु, ना पैसा, ना कूठली माणसं...मग कशाला उगाच या
गोष्टींच ओझं घेउण फ़िरायचा हे माझं ते माझं, हा माझा तो माझा, हे काहीच
नसतं तुष्या..इथं फ़क्त आपण असतो आपण..आपणच आपल्यासाठी जगायचं असतं...
मी तर म्हणतो अश्या गोष्टीत गुंतण्यापेक्षा समोरचा प्रत्येक क्षण, दिवस
मजेत घालवायचा....आणि हसत शेवटापर्यंतचा प्रवास करायचा...सोबतच्या
असलेल्या चांदण्याबरोबर.... याच प्रवासाला जगणं आणि त्या चांदण्याला नातं
म्हणतात...
"चांदण्यांनी भरलेल्या आभाळाला नजर लागावी आणि त्याला हवा असलेला
त्याच्या जवळचा एक-एक तारा त्याच्या नकळत असा निखळून खाली पडावा....आणि
त्यांनी फ़क्त ओल्या डोळ्यांनी ते पहात रहावं...निखळलेला तो प्रत्येक तारा
कुठल्याश्या सरोवरात पडल्यानंतर शात होऊन आपल्या नव्या अस्तित्वात
स्वछ्चंदी जगणं जगत राहीलेला चंद्रानं पाहयचं अन, त्यातच आपलं सुख
मानायचं असतं." हा नियतीचा नियम आहे...नियतीचा नियम..त्याच्यापुढे
माझ्यासारख्यांच काय ?
hummmm ......... मला हि ह्या ओळी खूप खूप खूप आवडल्या............. हि कथा मी orkut वरच्या शब्दांजली community वर वाचली होती ...आवडली म्हणून इथे post केली .....
