Author Topic: आनंद महत्वाचा की समाधान????  (Read 2386 times)

Offline Shraddha R. Chandangir

 • Jr. Member
 • **
 • Posts: 340
 • Gender: Female
                      आनंद आणि समाधान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्याप्रमाणे नाणं हवेत फेकल्यावर कुठलीतरी एकच बाजू जींकते, त्याप्रमाणे एकदा निर्णय घेतल्यावर एकतर समाधान मीळतं कींवा आनंद मीळतो.
                         माणसाच्या गरजा खूप क्षुल्लक आणि साध्या आहेत. ज्या पूर्ण करून तो समाधानी राहू शकतो. पण आनंद? त्याचं काय? मग आनंदी राहण्याच्या नादात, माणसाच्या गरजा वाढतात. श्रम वाढतात. सुरुवात होते ती आपल्या आई-वडीलांपासून. प्रत्येक पालकांना वाटतं की आपल्या मुलांनी खूप शीकावं, उच्च शिक्षण घ्यावं, मोठ्या पगाराची नौकरी करावी. आणि असं वाटून घेण्यात काही चूकीचही नाही आहे.
                         मग हे पालकांचे so called मोठे स्वप्न साकार करण्याच्या नादात चालू होते स्पर्धा. खूप अभ्यास करून घेणं, परिक्षेत चांगले गूण
मीळवण्यासाठी मुलांना सतत pressurised करणं यामागचा हेतू जरी चांगला असला, तरी चूकीचं आहे ते आपल्या ईच्छा,
आपली स्वप्नही बळजबरीने दुसर्यांवर थोपणं.13-14 वर्षांच्या मुलांमध्ये
तीतकी maturity पण नसते. या वयामध्ये आई-वडील जो मार्ग दाखवतील
तीकडेच मुलं जातात पण problem तेव्हा येतो,
म जेव्हा ही मुलं हळूहळू kids पासुन teenager
आणि teenager पासुन adult होत जातात. जेव्हा त्यांच्यात स्वतंत्र विचार
करण्याची क्षमता येते. त्यांना त्यांच्या आवडीनिवडी कळू लागतात.
मुलगा अभ्यासात खूप हुशार आहे, नेहमी चांगल्या मार्कांनी पास होतो; याचा अर्थ असा नाही की त्याला Doctor कींवा Engineer च व्हायचं असतं.
कींबहूना Doctor आणि Engineer च्या पलीकडे ही भरपूर career options असतात.
                 भरपूर मुलं आई-वडीलांच्या इच्छेसाठी,
त्यांच्या स्वप्नांसाठी आपल्या विचारांना मनातच मारून टाकतात. आणि जीकडे आयुष्य नेईल तसं जगत असतात. कारण असं केल्यामुळे त्यांच्या आई-वडीलांच्या चेहर्यावर एक विलक्षण असा आनंद झळकत असतो. आणि पर्यायाने आई- वडीलांना आनंदी बघून
मुलंही आनंदी असतात. असं करून आनंद तर मीळतो, पैसे ही भरपूर
मीळतात. पण "समाधान"? त्याचं काय? ते तर कधीच हरवलं असतं!!! अश्याच अनेक समस्या आयुष्यात पूढेही येत असतात.
                           माणूस जर समाधानी नसेल, तर आयुष्यातील
तणाव वाढत जातो. तणाव वाढत गल्याने माणसाच्या सवयी बदलत जातात. पर्यायाने Depression, दारू व्यसन यांच्या आहारी माणूस जायला लागतो.
                    कधी विचार करून बघा, आपण आयुष्यात दोन पैसे
कमी कमवले तर? multinational company मध्ये काम न करता मनाला आवडेल तसं छोट्या पगाराचं काम केलं तर? तर? बिघडेल का काही? हरवेल का काही? आज आपल्याला आपल्या जीवाचाच भरवसा नाही आहे. कधी काय होईल? कधी प्राणाला मुकावं लागेल? कधी आयुष्य गमवावं लागेल? हे कोणालाच माहित नाही. मग असं असतांना,
आपण थोडं मनापासुन जगायचं ठरवलं तर? दुसर्याला मीळालेलं यश बघून त्याचा हेवा न करता, त्याच्या आनंदात
आनंदी व्हायचं ठरवलं तर? आपापसातले मतभेद वीसरून एक नवीन सुरुवात
करायची ठरवली तर?
                        मीत्रांनो आयुष्य खूप छोटं आहे. जीवंतपणे
मरण्यापेक्षा, थोडं जगून बघा. कधी कोणावर मनापासुन प्रेम करून बघा. प्रेमात धोका मीळाला असेल तल त्याला माफ करून बघा.कधी कोणाशी भांडण झालं असेल तर त्या भांडणाचा शेवट करून नवीन सुरुवात करून बघा.
पश्चात्तापाच्या आगेत जळून झालं असेल तल स्वतःला एक chance देऊन
बघा. थोडं जगून बघा. "आनंदी"राहण्याची मजा लुटून
झालीच तर "समाधानाची"गोडी चाखून
बघा.

- अनामिका

Marathi Kavita : मराठी कविता


Offline सतिश

 • Jr. Member
 • **
 • Posts: 127
 • Gender: Male
Re: आनंद महत्वाचा की समाधान????
« Reply #1 on: November 05, 2014, 05:09:13 PM »
छान लिहिलेय.. पुढेही हितीत राहा... वाचक आहेत इथेसुद्धा..!!


Jawahar Doshi

 • Guest
Nicely written. I have read all your posts. They portray the real life happenings. Keep writing

Mr.Anil Pitekar

 • Guest
really your writing is 100% match or real ......

Offline Vedanti

 • Newbie
 • *
 • Posts: 34
 • Gender: Female
खूप छान!!!


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):