Author Topic: कुची कुची कॅफे  (Read 1915 times)

Offline tanu

  • Jr. Member
  • **
  • Posts: 99
कुची कुची कॅफे
« on: November 11, 2009, 02:41:22 PM »
सीसीडी काय, बरिस्टा काय किंवा सब वे काय... प्रेमीजनांची हक्काची जागा. मक्का, मदिना, काशीच झालेत हे स्पॉट्स! कॉफी निव्वळ निमित्तमात्र. कॉफी टेबलाच्या
अवतीभवती इथे खूप काही घडत असतं.
......

A lot can happen over coffee...

'कॅफे कॉफी डे'ची ही पंचलाइन पहिल्यांदा वाचली तेव्हा ही काय नवीन भानगड, असं वाटायचं. कॉफीच तर प्यायचीय... मग आपलं नाक्यावरचं उडप्याचं हॉटेल आहे ना? त्यासाठी ही हायफण्डा कॉफीशॉप्स कशाला..?

पण जावे त्याच्या वंशा... हेच खरं!

ही दुनिया आपली नाही, हे कल्चर आपलं नाही, तिथलं जगही आपलं नाही... हे म्हणणं अगदी १०० टक्के मान्य. तरीही एकदा तिथे पाय ठेवला की, त्या दुनियेच्या प्रेमात आपण पडल्याशिवाय राहत नाही. निदान प्रेमात बुडालेली लव्हर्स की युनिटी तरी..! सीसीडी काय, बरिस्टा काय किंवा सब वे काय... प्रेमीजनांची मक्का, मदिना, काशीच झालेत हे स्पॉटस्. इथे कॉफी निव्वळ निमित्तमात्र आहे. कॉफी टेबलाच्या अवतीभवती खूप काही घडत असतं.

शीशमहालासारखी दिसणारी ती कॉफीशॉप्स. काचेच्या पारदशीर् खिडक्या आणि दारं. निळ्या गुलाबी रंगाचे साइन बोर्ड. व्हरांड्यात मस्तपैकी सजवलेली गुलाबी कपड्यातली टेबलं. टेबलांवरचं हायफाय पब्लिक. लो वेस्ट जीन्स आणि मेसेजवाले टी शर्टस् घालणारी टकाटक पोरंपोरी... फाडफाड इंग्लिश फाडत त्यांना सव्हिर्स देणारे झकपक कपड्यातले वेटर... कालपर्यंत स्टार मुव्हीज किंवा एचबीओ चॅनेलच्या हॉलिवूडपटांमध्ये पाहिलेले हे सीन आता रिअॅलिटीमध्ये उतरले आहेत. आपल्या घराच्या आजूबाजूला लोअर परळ, वरळी आणि प्रभादेवीच्या मराठमोळ्या वस्तीतल्या नाक्यापर्यंत हे सीसीडी, बरिस्टा आणि सब वेचं लोण पसरलंय. पंजाबी ड्रेसमधल्या पोरीही इथल्या टेबलांवर दिसू लागल्या तेव्हा मराठी पाऊल दबकत का होईना, पुढे पडत असल्याची खात्री पटली.

एरव्ही हॉटेलात दहा-वीस रुपयांना मिळणाऱ्या कॉफीसाठी इथे शंभराची नोटही कमी पडते. पण त्या शंभर रुपयांच्या बदल्यात जे काही पदरात पडतं, त्याला खरंच मोल नाही. निदान पैशात तरी ते मोजता येणार नाही.

सकाळ-संध्याकाळ ही कॉफीशॉप्स गदीर्ने ओसंडलेली असतात. दुपारी जरा ओहोटी असते. त्यामुळे प्रेमी कपल्ससाठी ही वेळ मस्तच. आत फक्त तीन-चार कपल्स. कोपऱ्याची टेबलं पकडून बसलेली. एक कपल छानपैकी सोफ्यावर विसावलेलं. टेबलावर कॉफीचा एखादा ग्लास... सोबत कुकीजचं पॅकेट. कुणी छोटासा केकही ऑॅर्डर केलेला. तो तिला आपल्या हातांनी केकचा तुकडा भरवतोय आणि ती हलकेच त्याच्या बोटाचा चावा घेत केकचाही बाइट घेतेय... त्याने पटकन चावलेलं बोटं स्वत:च्या तांेडात घातलेलं. मग ती एकदम खळखळून हसायला लागलेली.

इथे एक बरं असतं. दुसऱ्या टेबलवर काय चाललंय, याच्याशी बाकीच्यांना काहीच कर्तव्य नसतं. एखाद्या कपलकडे बाकीचे पाहताहेत, असला गावठीपणा कॉफीशॉप्सच्या सो कॉल्ड कल्चरमध्ये शोभत नाही. अलिखित नियम म्हणा किंवा एथिक्स. पब्लिक प्लेसमध्ये प्रायव्हसीचा स्वर्ग, हेच तर या कॉफीशॉप्सचं महत्त्वाचं वैशिष्ट्यं. इथे तुम्ही एक कॉफी ऑॅर्डर केली आणि दोन-अडीच तास बसलात तरी कुणीही हटकत नाही. हॉटेलसारखा डोक्यावरचा पंखाही बंद होत नाही. मुळात पंखाच नसतो, सारं कसं एअर कंडिशण्ड... ठंडा ठंडा कूल कूल... पण हे कूल वातावरण कधी कधी फारच हॉट होतं. म्हणजे कोपऱ्यातल्या टेबलावर कॉफीचा आस्वाद घेत 'कुची कुची' करणारं कपल अचानक सोफ्यावर येऊन विसावतं. बहुतेक कॉफीचा कैफ त्यांच्यावर चढलेला असतो. तो तिला अलगद ओढून घेतो आणि मोठ्ठासा किस घेतो. या कल्चरमध्ये त्याला स्मूचिंग म्हणतात... हे सगळं बिनदिक्कतपणे सुरू असतं. कुणी सोफ्यावर, कुणी बिन बॅग्जवर... जणू शेजारी कुणी नाहीच, अशा थाटात त्यांचे राऊण्ड्स रंगतात. सोफ्यावरची ही रासलीला कुणाच्या गावीही नसते. तिथल्या वेटर्सच्याही... त्यांची समाधीवस्था भंग न करताच ते निमूटपणे ऑॅर्डर टेबलावर ठेवतात आणि निघून जातात. दुपारी एक ते संध्याकाळी पाच-साडेपाच ही वेळ म्हणजे अशा प्रेमात बुडालेल्या कपल्ससाठीचे हॅप्पी अवर्सच..!

लालसर मंद प्रकाश, कानावर पडणारं पाश्चात्य संगीत, कधीमधी टीव्हीवर सुरू असलेला रॉक शो... या वातावरणात आणखी वेगळे रंग भरत असतात. कॉलेजमध्ये लेक्चर बंक करून आलेल्या पोरापोरींचं खिदळणं एकीकडे... कुणी गेल्या वषीर् याच ठिकाणी आपल्या प्रेयसीला पहिल्यांदा प्रपोज केलं म्हणून, प्रपोजल अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करणारं... कुणाचा तरी बर्थ डे... कुणी आपल्या ऑॅफिस कलीगला घेऊनआलेलं... तर कुणी पहिल्यांदाच डेटसाठी मैत्रिणीसोबत आलेलं... वाफाळलेल्या कॉफीचे घुटके घेत लॅपटॉपवर कसलीशी आकडेमोड करत बसलेला एखादा एकटा जीवही याच गदीर्त... पण एका टेबलचं दुसऱ्या टेबलशी काहीही नातं नसतं. प्रत्येक टेबलची निराळी स्टोरी.

A lot can happen over coffee! खरोखरच...

- सुनील घुमे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

  • Administrator
  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,511
  • Gender: Male
  • MK Admin
    • marathi kavita
Re: कुची कुची कॅफे
« Reply #1 on: November 11, 2009, 03:43:20 PM »
इथे एक बरं असतं. दुसऱ्या टेबलवर काय चाललंय, याच्याशी बाकीच्यांना काहीच कर्तव्य नसतं. एखाद्या कपलकडे बाकीचे पाहताहेत, असला गावठीपणा कॉफीशॉप्सच्या सो कॉल्ड कल्चरमध्ये शोभत नाही.
   :D  8)  :P  ;D

Offline samikshak

  • Newbie
  • *
  • Posts: 8
Re: कुची कुची कॅफे
« Reply #2 on: September 10, 2012, 05:14:53 AM »
dhanyavaad
eka vegalya (adnyat)  jagachi olakh karunn dilyaabaddal..

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा अधिक दोन किती ? (answer in English):