Author Topic: खरी भूक  (Read 1047 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
खरी भूक
« on: February 03, 2015, 03:27:08 PM »
एका गरीबाच्या झोपडीत सायंकाळचे सात वाजले की एका छोट्याशा देवळीत एक रॉकेलच्या तेलाचा दिवा पेटतो.
दिवसभर काबाड़ कष्ट करणारे, उन्हा तान्हात कधी भाकरीविना कधी पाण्याविना राब राब राबणारे ते दोन जीव त्या छोट्याशा दिव्याच्या मंद प्रकाशात विसावा घेतात. दिवसभर घामाने,मातीने माखलेले ते त्यांचे शरीर त्या झोपडीत दिव्याच्या प्रकाशात मंत्रमुग्ध होउन दगडाच्या भिंतीला टेका देऊन शांत पणे पडते.
दिवसभर भर उन्हात लोखंडाच्या  तिकासी,पहारीने दगड मातीचे काम करणाऱ्या त्या पोटाची भूक आपल्या पेक्षा न्यारीच. खरी भूक म्हणजे काय त्या पोटाला विचारावी !
                         दिवसभर AC च्या थंड्या हवेखाली व नरम गादीच्या खुर्चीखाली बसून चार वेळा चहा पिऊन दुपारचे भरपेट जेवण व मधेच मनात आले त्याची चव चाखणारे आपले पोट, जेंव्हा रात्री DINNER ला डाइनिंग टेबलवर बसतो, तेंव्हा मनाला एक प्रश्न पडतो  आज आपण काय खायायचे अन् का खायायचे ? 
कारण ज्या पोटाला भूक या शब्दाचा अर्थच कळत नाही ते पोट फक्त DINNER या नावासाठी पोटात काहीतरी घालण्याचा प्रयत्न करतो. दहा दहा ट्यूब लाइट असणाऱ्या त्या घरातल्या वेक्तीला काय माहीत अंधार म्हणजे काय ? खरतर त्या वेक्तीचे घर कितीही प्रकाशमय असले तरी त्यांच्या जीवनात अंधारच असतो. व त्या अंधाराला  डावलन्यासाठी तो सतत पळत असतो खरा प्रकाश शोधायला, खरे जीवन शोधायला !
             त्या झोपडीतील ते दोन जीव मात्र आपली पोटाची आग विझवन्यासाठी चुलीत लाकडे टाकून आग लावतात व त्याच्यात आपल्या पोटाला विसावा देणारे अन्न, वरण भात बनवून जर्मनच्या ताटात आनंदात वरपतात. आणि रात्रीचे 8: 30/9: 00 वाजता आपल्या झोपडीचे ते तुटके मूटके कवाड (दरवाजा )बंद करून ठिगळ्याच्या गोदड्यावर निवांत झोपतात शांतपणे बिना पंखा बिना AC अगदी गाढ झोपी गेलेले ते दोन जीव. आणि त्या देवळीतला दिवा अगदी शांतपणे डोलत डोलत त्यांना प्रकाश देत राहतो !
         इकडे आलीशान घरामध्ये AC च्या थंडगार हवेत नरम आलीशान बेडवर मात्र दुसऱ्या दोन जीवाला झोप येत नव्हती .
रात्रीचे  बारा वाजले होते तरी यांचे डोळे उघडेच होते. हे दोघे उद्याचा विचार करत होती, जो दिवस अजून उजेडलाच नाही.
दोघापैकी एक मधेच बोललं " डार्लिंग तुला काय वाटते उद्या कोणत्या कंपनीचे शेअर विकत घ्यावे ? . . . . . . . . . "


संजय बनसोडे
9819444028

Marathi Kavita : मराठी कविता


Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 307
  • Gender: Male
Re: खरी भूक
« Reply #1 on: February 06, 2015, 12:23:09 AM »
मस्तच
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर