Author Topic: तेव्हा आपल्या जवळ रडण्या पलीकडे काहीच उरलेलं नसतं.....  (Read 1828 times)

Offline Shraddha R. Chandangir

  • Jr. Member
  • **
  • Posts: 344
  • Gender: Female
                असं वाटतं... की कधी एके
काळी या विशाल आकाशा ला खूप गर्व असेल स्वतः वर.
स्वतः च्या विशालतेवर. कदाचित तो विसरला असेल
की त्याच्या या विशालतेला सुंदर बनवण्याचं खरं कारण
म्हणजे त्या लुकलुकत्या चांदण्या आहेत. जर आकाशात
ह्या चांदण्या आणि तारे नसतील तर
त्या आकाशाची सुंदरता ही नसेल.
कदाचित तो आपल्या गर्वामध्ये इतका बुडाला असेल
की या चांदण्यांचा विचारही त्याचा मनात
आला नसेल. आणि कदाचित हेच कारण असेल,
की तेव्हा पासून रोज
कुठली ना कुठली चांदणी,
कुठला ना कुठला तारा त्याला सोडून चाल्ला जातो. कदाचित त्या तार्यांमध्ये खरं प्रेम लपलं आहे, म्हणूनच जेव्हा एखादा तारा त्या आकाशाला सोडून जातो,
तेव्हा तो स्वतः ही तुटतो.
असंच रोज तार्यांचं आकाशाला सोडून जाणं
कधीतरी त्या आकाशाच्या लक्षात आलं असेल.
उशिरा का होईना, पण तार्यांचा विरह त्याला ही जाणवला असेल.
आणि कदाचित हेच कारण असेल,
की जेव्हा जेव्हा या तार्यांचा विरह त्याला सहन होत
नाही तेव्हा तो जोरात किंचाळतो. ओरडून ओरडून रडतो. कदाचित
या पावसाच्या थेंबांमध्ये ही त्याचेच अश्रु
असतील.
                 आपले खरे मित्र ही या तार्यांप्रमाणे
असतात. यांच्या असण्याने आपलंही जग सुंदर होतं. पण
कधी यशाच्या उंच शिखरावर पोहोचलो की आपण
ही त्या आकाशाप्रमाणे होतो.... या तार्यांसारख्या मित्रांचा विचार
ही मनात येत नाही. आणि या तार्यांप्रमाणेच
हळू हळू सगळे आपल्या पासून दूर व्हायला लागतात. दूर होऊन ते
ही कुठे ना कुठे तुटतातच. आणि जेव्हा आपल्या लक्षात येतं
तोपर्यंत सगळे तारे हळूहळू दूर होऊन तुटलेले असतात.
आणि तेव्हा आपल्या जवळ रडण्या पलीकडे काहीच उरलेलं नसतं.....
~ अनामिका

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):