Author Topic: एक भयानक दिवस  (Read 734 times)

Offline किरण गव्हाणे

  • Newbie
  • *
  • Posts: 5
  • Gender: Male
एक भयानक दिवस
« on: March 20, 2015, 08:12:39 PM »
 [size=0pt]या घटनेला जवळ जवळ ४ वर्षे झाली. त्यावेळेला इंजीनरिंगच्या प्रथम वर्षाला होतो. तो दिवाळीचा महिना होता. दिवाळीच्या ५ दिवस आधी युनिट टेस्ट होती. परंतू सर्व विद्यार्थ्यांचे म्हणणे होते की दिवाळीनंतर ठेवा. पण शिक्षक काही ऐकायला तयार नव्हते. शेवटी एका गोष्टीवर शिक्कामोर्तब झाला. जे लांबचे आहे त्यांनी दिवाळीनंतर परीक्षा द्यायची. पण अनेकांना हे काही पटलेच नाही. काहीजण घरी निघून गेले तर काहीजण तिथेच हॉस्टेलवर राहिले. हॉस्टेलवर थांबलेल्यांपैकी मी एक होतो. आम्ही सुमारे ३०-४० जण हॉस्टेलवर होतो.        [/size]युनिट टेस्ट चालू झाली. पहिला पेपर संपला. दुपारी मस्तपैकी झोपायचं होतं. माझा मित्र प्रथमेश हा माझ्या रुममध्ये होता. दुसऱ्यादिवशी गणिताचा पेपर होता. त्यासाठी आम्ही एकत्रच अभ्यास करणार होतो. रात्री अभ्यास करावा या उद्देशाने दुपारी छानशी झोप घेण्याचे ठरले. मग रूमची कडी आतून बंद केली आणि आम्ही झोपी गेलो. प्रथमेशला हे माहितच होते की मी आतमध्ये आहे आणि त्यातल्या त्यात कडी त्याने स्वत:नेच लावली होती. दोघेही गाढ झोपेत होतो. अचानक मला घरून फोन आला. रूममध्ये रेंज नव्हती म्हणून बोलण्यासाठी बाहेर गेलो. बोलून झाल्यावर परत रूममध्ये आलो. बेडवर पडलो तोच डोक्यात एक कल्पना आली. प्रथमेशची जरा गंमत करावी असा विचार मनात आला. म्हणून पूर्ण योजनेशी एक रुमाल हातात घेऊन मी परत बाहेर आलो. प्रथमेश अजूनही गाढ झोपेत होता. मी बाहेरून रुमाल फक्त एक गाठ बांधून आतील कडीला बांधला. आणि दरवाजा ओढला व रुमाल हळूच ओढून घेतला. यात फार रिस्क होती. जर रुमाल तसाच कडीला राहिला तर योजना पूर्णत: फसणार याची कल्पना होतीच मला. पण तसे काही नाही झाले. मी बाहेरून आतील कडी व्यवस्थित लावली. थोडावेळ थांबलो आणि मग काय जोरजोरात दरवाजा वाजविला. गाढ झोपेत असलेल्या प्रथमेशने दरवाजा काही वेळानंतर उघडला. जरासा बिचकला आणि विचारले, “ का बे तू आत होता. आणि कडी कुणी लावली?”. आणि गाढ झोपेत असल्यामुळे परत झोपून घेतले. पण मी एवढ्यात हार मानणार नव्हतो.             त्याच संध्याकाळी आमचा आणखी एक मित्र भूषण माझ्या रुममध्ये आला. तो ही गणिताचा अभ्यास करण्यासाठी आला होता. प्रथमेशला दुपारी काय झाले हे आठवतच होते. त्याने रूममधील कडी मनानेच लागल्याचे भूषणला सांगितले. आणि मी सुद्धा त्याच्या हो मध्ये हो भरत  होतो. आणि चेहऱ्यावर एक भीतीचा देखावा आणत होतो. प्रथमेश जरासा घाबरलाच होता. पण भूषणला हे काही खरे वाटत नव्हतं. आमच्या रूममधेच  बाथरूम होते. परत डोक्यात दुपारची योजना फिरकटत होती. आता सगळे अभ्यास करत होतो. जरा बाथरूममध्ये जाऊन येतो असे सांगून मी बाथरूममध्ये गेलो. त्यावेळेला रूमची कडी आतून लावलेली होती. आणि आम्ही तिघेच रूममध्ये होतो. मग परत रुमालाने बाथरूमची कडी बाहेरून लावली आणि परत दरवाजा वाजवू लागलो. आता मी आतून दरवाजा वाजवत होतो. कडी बाहेरून लागली होती. भूषणने दरवाजा उघडला. आता बाहेरून कडी का लावली असे मी त्यांना विचारत होतो. प्रथमेश तर पुरता घाबरला होता. त्याच्या डोळ्यात चक्क पाणी आले होते. दुपारीपण असेच झाले होते असे तो भूषणला सांगत होता. आता भूषणसुद्धा घाबरला होता. मी सुद्धा भीतीचा हावभाव आणत होतो. मग प्रथमेश घाबरत घाबरत शेजारच्या रूममध्ये गेला आणि त्यांना ही गोष्ट सांगितली. त्याच्या रडणाऱ्या डोळ्यामुळे सर्वांना त्याचे म्हणणे खरे वाटले . सगळे जनं गणिताचा अभ्यास सोडून त्याच गोष्टीवर बोलत बसले. आणि शेवटी वार्डनला सांगण्याचे ठरल्यावर मी सगळे सांगून टाकले. पण तो पर्यंत सगळ्यांची अशी टरकली . नंतर आज हा विषय काढल्यावर अजूनही एकाच हशा पिकतो. ;D ;D :D ;) >:(
 

Marathi Kavita : मराठी कविता

एक भयानक दिवस
« on: March 20, 2015, 08:12:39 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):