Author Topic: ६ तास झोप आवश्यक  (Read 2135 times)

Offline janki.das

  • Jr. Member
  • **
  • Posts: 76
६ तास झोप आवश्यक
« on: November 25, 2009, 09:53:30 AM »
लहान मुलांच्या जवळ खुप वेळ असतो, एनर्जी असते पण पैसा नसतो..

तरुणांच्या जवळ पैसा असतो, एनर्जी असते पण वेळ नसते…

म्हाताऱ्यांजवळ खुप वेळ आणि पैसा असतो, नसते ती फक्त एनर्जी….

आता असलेले सगळे रिसोअर्सेस व्यवस्थित वापरुन आपलं आयुष्य जगलं तर सगळे प्रॉब्लेम्स सुटतात. नाहीतर ……………??

दोन तिन दिवसांच्या पुर्वी एक बातमी वाचली होती. त्यात हों की एसएपी चे भारतातले मॅनेजिंग डायरेक्टर श्री रंजन दास यांचा अनपेक्षित पणे वयाच्या ४२ व्या वर्षी झालेला मृत्यु काय दर्शवतो?? काळ हा नेहेमीच पाठलाग करित असतो.. तुम्हाला सगळी कामं ठराविक वेळात संपवायची आहेत, काळ पाठलाग करतोय , तरुण वय आहे, वेळ कमी पडतोय….. काय करणार??

रंजन दास ह्यांच्याबद्दल हे पण वाचण्यात आलं, की ह्यांचा स्वतःच्या खाण्यापिण्यावर पण खुपच कंट्रोल होता. कधीच वाजवी पेक्षा जास्त खाणं, किंवा हाय कॅलरी इनटेक न घेणं. दररोजचा व्यायाम, फिरायला जाणे , जिम या मधे कधिच खंड पडु दिला नाही त्यांनी. आणि इतक असतांना सुध्दा त्यांचा असा आकस्मित मृत्यु व्हावा??

दिवसातले २० तास हा माणुस जागा असायचा. म्हणजे झोप फक्त ४ तास.. आणि प्रत्येक पार्टीमधे, किंवा मित्रांच्यामधे आपल्या कमी झोपेबद्दल गर्वाने सांगायचा. तुम्ही कितीही काम करा , पण शरिराची झिज भरुन येण्यासाठी कमित कमी ६ तास झोप आवश्यक आहे. तेवढीपण झोप तुम्ही घेतली नाही, तर मग इतर गोष्टीत तुम्ही कितीही रेग्युलराइझ राहिलात तरीही शरीर साथ देणं थांबवु शकतं.

मला वाटतं की कमामधे अती जास्त गुंतलेल्यांच्या साठी, आणि प्रकृतीची हेळसांड करणाऱ्या ( वर्कोहोलिक ) लोकांसाठी श्री रंजन दास यांचा मृत्यु हे उदाहरण आय ओपनर ठरावं..

इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो..


--
!! जय हिंद जय महाराष्ट्र !!! 

Marathi Kavita : मराठी कविता