Author Topic: मी मोबईल बोलतोय....।।।  (Read 1134 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,257
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
मी मोबईल बोलतोय....।।।
« on: May 17, 2015, 03:16:03 PM »
मी मोबईल बोलतोय....।।। भाग-१

हॅलो, हॅलो... अरे!  आवाज जात नाहीं वाटतं... पलीकडे ? काय करावं...? काहीच लक्षात येत नाही...? ठीक आहे... काही दुसरा पर्याय शोधुया !...

काय, मित्र हो, कोडयात पडलात ना? तुम्हाला वाटत असेल कि हा आवाज कुठुन येतोय? मी तुमचा मित्र, तुमचा सहचर आहे, तुमच्या सोबत गप्पा करू इच्छितो. पण दुर्दैव। माझ, तुम्हाला माझी काळजीच नाही... ठिक आहे, नाराज नाही होणार मी , ना ही मी गप्प रहाणार. मी माझं म्हणणं मांडणारच... काय हे, एवढया जवळ  असुन सुध्दा अजुनही ओळखलं नाही?  खरच माझं दुर्दैवं, आता मात्र तुम्ही माझं म्हणणं ऐकाल आणि समजाल कि मी कोण आहे?

मी तर तुमचा मोबाईल फोन आहे, आता असं म्हणु नका कि कोणतेही बटन न दाबता हा कसा बोलु लागला? बाबांनो मी मी तर केव्हाचा तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होतो, पण तुम्ही ऐकतच नाही... असो, आता ऐका लक्षपुर्वक....

तसा माझा इतिहास फारच जुना आहे, सर्वप्रथम श्री अलेक्ज़ेंडर ग्राहम बेल यांनी 1876 साली माझा शोध लावला, त्यांनीच मला तुमच्याशी बोलण्या योग्य तयार केलं, आणि त्याच कारणांमुळे मी मुळ (बेसीक) फोनला स्वतःचा पुर्वज मानतो, आणि त्या अर्थाने श्री अलेक्ज़ेंडर ग्राहम बेल यांना माझा जनक....

माझ्या आजच्या हया आधुनिक स्वरूपाची कहाणी रोमहर्षक आहे, आणि माझ्या हया रूपाचे जनक श्री मार्टिन कूपर हे आहेत, ज्यांनी चाळीस वर्षां पुर्वी 3 एप्रिल 1973 रोजी सा-या जगासमोर आणले, त्यावेळी 'मोटोरोला' कंपनी मार्फत माझ्या रूप रंगाचे आयोजन केले होते व तेंव्हा श्री मार्टिन कूपर  यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपनीच्या कार्यालयात फोन करून माझ्या हया चलत्या फिरत्या स्वरुपाची घोषणा  केली होती.
1973 मध्ये माझे रूप सर्वांसाठी नविन होते, त्यावेळची माझी भाषा तांत्रिक द्रष्टया थोडी कठीण असल्या कारणाने ती सर्वाना समजत नसे आणि त्याच मुळे माझ्याशी तेव्हा लोकांची जवळीक नव्हती. तेव्हाचा माझा आकार सुध्दा आजच्या प्रमाणात खुप मोठा असल्या कारणाने पटकन कुणीही माझा उपयोग करीत नसत. तेव्हाची एक मजेशीर गोष्ट अशी कि त्यावेळी माझ्या डोक्यावर एक रबरी आकाशग (Antennae) असे जी अगदि शिंग असल्या सारखी भासत असे, काही लोकांसाठी ती सुध्दा खेळण्याची बाब होती. पुढील दहा वर्षात साधारणता 1973 ते 1982 च्या काळात माझ्या रुप रंगात लक्षणिय बदल झाले. ब-याच तांत्रिक भाषांचा प्रयोग होवु लागला होता, आणि त्यासोबत माझीही प्रगती होत गेली. आज अनेक क्षेत्रांमध्ये जसे शिक्षण, आरोग्य, साहित्य, कला वगैरे ठीकाणी माझा उपयोग प्राथमिक स्तरावर होत आहे व विकास कार्यात सर्व जगभर माझा उपयोग महत्वपूर्ण मानला जात आहे.

प्राथमिक अवस्थेत माझा उपयोग मोटार कार मध्ये व्हायचा, आणि गमतीची गोष्ट अशी कि तेव्हा एकावेळी एकच व्यक्ति बोलु शकत असे, जसे कि एकजण अगोदर बोलेल तेव्हा दुसरा फक्त ऐकेल, नंतर दुसर बोलेल तेव्हा पहीला व्यक्ति ऐकेल अशी अवस्था होती. तद् नंतर एकाच वेळी दोन व्यक्ति एकमेकांशी बोलतील अशा सुविधेचा शोध लागला. तेव्हा माझी प्रणाली एनालॉग स्वरूपात होती व अनेक अडचणी सुध्दा, त्यामुळे माझे कार्य फारच मंद गतीने होत असे. नंतर मात्र माझे अंतरग बदलु लागले, मी अंकात्मक (Digital) झालो, माझ्या मध्ये माइक्रो प्रोसेसर, मेमरी इत्यादि घटक जोडले गेले, ज्याच्यामुळे आवाज, चित्र, वीडियो, गेमिंग इत्यादीची स्पष्टता वाढली आणि हया सर्व क्षेत्रात माझा जास्त  वापर होवु  लागला आणि नंतर मोबाईल क्षेत्रात क्रांति झाली, अनेक कार्यात उपयोग होत होत होत मी ख-या अर्थाने स्मार्ट होत गेलो.


= शिवाजी सांगळे,
मो.+९१ ९४२२७७९९४१/+९१ ९५४५९७६५८९ ई.मेल.sangle.su@gmail.com   

Marathi Kavita : मराठी कविता