Author Topic: माझी मुंबई  (Read 604 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,240
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
माझी मुंबई
« on: May 17, 2015, 04:42:04 PM »
माझी मुंबई

मुंबई, शहर स्वप्नाच, तुमच, आमचं, सगळ्याच ! ज्यांनी पाहिलं त्यांच, नाही त्यांच्या स्वप्नातलं ! जगातील प्रत्येकाला वाटत, एकदा तरी इथ याव, इथले लोकं, बस, ट्रेनची गर्दी पहावी ! वडा पाव, कटींग चहाची मस्त चव घ्यावी! अविरत धावणार, कधीही न थांबणारं, जगातील सांर काहि एकवटलेल शहर म्हणून याचं सर्वांना कौतुक आणि आकर्षण, हिच मुंबईची कालपर्यंतची ओळख.

नंतर, मुंबईत खुप बदल झाले, बरेच चढउतार आले ! पिढी बदलली, लोकहि  बदलले, मुंबईने जुन्या नव्यांना सामावून घेतलं, आपलसं केलं, त्यामुळे मुंबई मात्र स्वत: बदलली. आता, मुंबईत आहेत उंच गगनचुंबी ईमारती, सतत वाहणारे उड्डाणपूल, गर्दीने तुडूंब भरलेल्या बसेस, लोकल ट्रेन्स, आणि सतत धावणारी, दडपणाखाली जगणारी माणसं.

पूर्वी इथ मिल होत्या, कारखाने होते, म्हणतातना जीवंतपणा होता, पण आता... ते सारं गेलं, उरलेत ते फक्त त्यांचे भग्न अवशेष ! त्यात होताहेत अपराध आणि सामुहिक बलात्कार. अशी नवी ओळख आता मुंबईची होवू लागली आहे.

पण, आजहि खुप लोकांना जुन्या मुंबईची आठवण आहे, ज्याकाळी कशाची भीती नव्हती, एकमेकांची काळजी होती, दुसऱ्यासाठी जगणं होतं, बरचस आनंदाचं होत, सुखाच होतं, आणि आपलेपणाच होत...! त्याच आठवणीचा हा एक काव्यात्मक प्रवास.............“ माझी मुंबई “  A poetic Journey of Mumbai …

माझी मुंबई ...

दुध केंद्रावर बाटल्यांची,
नाक्यावर पेपरवाल्यांची 
शाळेत जाणाऱ्या मुलांची,
पाळीवाल्या कामगारांची
गर्दी असायची तेंव्हा मुंबईत !

मुलांना वर्गात मास्तरांची,
भुरटयांना गुप्त पोलिसाची,
उचल्यांना सावध दुकानदारांची,
माणसाला रोज देवधर्माची,
भीती असायची तेंव्हा मुंबईत !

दुपार नंतर केंव्हाही,
आंटीच्या अड्ड्यावर पिणाऱ्याची,
रस्त्यावर गंडेरी वाल्यांची,
चौपाटीवर मालिश वाल्यांची,
गर्दी असायची तेंव्हा मुंबईत !

चौका, वाड्यांमधून खेळांची,
संध्याकाळी चाकरमान्याची,
त्यानंतर उशीरा शौकीनाची,
रात्री पोलिसाच्या गस्तीची,
गर्दी असायची तेंव्हा मुंबईत !

सणासुदीला प्रेमळ शुभेच्छाची,
दिवाळीला चमकत्या कंदिलांची,
ईदला शीर - कुर्म्याची,
शेजाऱ्याला शेजार धर्माची,
जाणिव असायची तेंव्हा मुंबईत !

दगड बनलेल्या ह्रदयांची,
चाकं लागलेल्या पायाची,
पाठीशी उभ्या अतिरेक्यांची,
संवेदनशून्य मनोऱ्याची,
सावली असते आता मुंबईत !

नारी भक्षक नरांची,
शंकेखोर घाबरट डोळ्यांची,
आभाळ पाडणाऱ्या सशांची,
गर्दी असते आता मुंबईत !
गर्दी असते आता मुंबईत !

Watch short film….”Mhaji Mumbai” on You Tube……


by शिवाजी सांगळे ९४२२७७९९४१ / ९५४५९७६५८९

Marathi Kavita : मराठी कविता

माझी मुंबई
« on: May 17, 2015, 04:42:04 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):